लोकसहभागातून शहापुरात घडविली डिजिटल शाळा
By Admin | Updated: March 1, 2016 02:25 IST2016-03-01T02:25:48+5:302016-03-01T02:25:48+5:30
शहापूर तालूक्यातील आदीवासी अतिदुर्गम ग्रामीण भागातील शालेय विदयार्थ्यांना आधुनिक शिक्षण मिळावे तथा समाजाची नाळ शाळेशी जोडली जावी

लोकसहभागातून शहापुरात घडविली डिजिटल शाळा
वसंत पानसरे, किन्हवली
शहापूर तालूक्यातील आदीवासी अतिदुर्गम ग्रामीण भागातील शालेय विदयार्थ्यांना आधुनिक शिक्षण मिळावे तथा समाजाची नाळ शाळेशी जोडली जावी या मुख्य उद्देशाच्या आधारावर शासकीय अनुदानाशिवाय समाजसहभागातून सृजनशील शाळा उभारण्याचा पुरेपुर प्रयत्न शहापुरात केला जात असून जि प ची मुगाव शाळाही यात मागे नाही अतिदुर्गम आदीवासी ग्रामीण भागातून राज्यात पिहल्या डिजीटलायझेशनचा मानांकन पटकावलेल्या पष्टेपाडा या शाळेचा आदर्श समोर ठेवत आजतागायत ७० शाळा डिजीटल शाळा म्हणून नावारूपाला आल्या असून ७१ व्या मुगाव जि प शाळेतही आधूनिक शिक्षणाचे धडे गिरवण्याचा प्रयत्न केला गेला असून या डिजीटल शाळेचे उद्घाटन आमदार पांडूरंग बरोरा यांच्या हस्ते सोमवारी करण्यात आले
शहापूर पंचायत समतिीच्या शिक्षण विभागा अंतर्गत ४६८ शाळांपैकी ७१ शाळा आजघडीस नाविण्यपुर्ण अभ्यासक्र मातून शिक्षण देणारी आधुनिक तंञज्ञाद्वारे विकिसत झाल्या आहेत किन्हवली केंद्रातील मुगाव येथील जि प च्या उच्च प्राथमिक शाळेत १ ली ते ७ वी पर्यंतचे एकूण १८२ विदयार्थी शिक्षण घेत आहेत २७ मार्च १९२९ रोजी स्थापित झालेल्या जीवनशिक्षण विदयामंदीर मुगाव या शाळेचे १ जून १९६५ रोजी उच्च प्राथमिक शाळेत रूपांतर झाले आहे.
शैक्षणिक गुणवत्तेत कायम अग्रेसर असलेल्या या शाळेत १ ली व ५ वी तील विदयार्थ्यांकरिता सेमी इंग्रजीचे वर्ग सुरू करण्यात आले असून शा?ेतील विद्यार्थ्यांना आधूनिक शिक्षण मिळावे याकरिता शाळा व्यवस्थापन समतिी व लोकसहभागाचा आर्थिक हातभार लावल्याने ही शाळा डिजीटल शाळा करण्यात येथील शिक्षकांना यश आले सोमवारी या शाळेचा उद्घाटन सोहळा पार पडला.