सदानंद नाईक/उल्हासनगर : कॅम्प नं-१ परिसरात राहणाऱ्या एका सेवानिवृत्त वृद्ध महिलेला डिजिटल अरेस्टच्या नावाखाली धमकावून एका टोळक्याने ६० लाख २० हजार रुपयांची फसवणूक केल्याची घटना उघडकीस आली. व्हॉट्सॲपवर पोलिसांचा स्टेटस लावून तसेच बनावट सरकारी कागदपत्रे आणि समन्स वापरून ही फसवणूक करण्यात आली असून याप्रकरणी उल्हासनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.
उल्हासनगर कॅम्प नं-१, दयाळू आयस्क्रीम दुकान परिसरात सेवानिवृत्त विद्या परसराम रामानी कुटुंबासह राहतात. १७ ते २९ नोव्हेंबर २०२५ दरम्यान मोबाईल व्हॉट्सॲपवर एका टोळक्याचा फोन आला. रिया शर्मा, प्रदीप जैस्वाल, विश्वास पाटील आणि एका अनोळखी व्यक्ती असे नाव सांगण्यात आले. या टोळक्याने व्हॉट्सॲपवर पोलिसांचा स्टेटस ठेवला होता. बनावट पोलीस ओळखपत्रे व्हॉट्सॲपवर पाठवून त्यांनी स्वतःची ओळख पोलीस म्हणून करून दिली. इतकेच नव्हे तर, सुप्रीम कोर्ट, डायरेक्टरेट ऑफ एन्फोर्समेंट आणि भारतीय रिझर्व्ह बँक यांच्या नावाने बनावट नोटिसा व समन्स तयार करून रामानी पाठवले.
या टोळक्यानी बनावट कागदपत्रांच्या आधारे, डिजिटल अटकेची भीती दाखवून त्यांनी रामानी यांना 'व्हेरिफिकेशन'साठी त्यांच्या विविध बँक खात्यात एकूण ६० लाख २० हजार रुपये आरोपींनी स्वतःकडे वळवून घेवून त्यांची आर्थिक फसवणूक केली. विद्या रामानी यांना फसवणूक झाल्याचे लक्षात येताच, त्यांनी उल्हासनगर पोलीस ठाण्यात धाव घेत गुन्हा दाखल केला. पोलीस निरीक्षक लक्ष्मण कांबळे यांच्या मार्गदर्शनाखाली सध्या पोलीस या डिजिटल फसवणूक करणाऱ्या टोळीचा शोध घेत असून चार जणा विरोधात गुन्हा दाखल झाला.
नागरिकांनी सतर्क राहण्याचे आवाहन अलिकडे 'डिजिटल अरेस्ट, फेक पार्सल आणि सरकारी एजन्सीच्या नावाने होणारे सायबर गुन्हे मोठ्या प्रमाणावर वाढले आहेत. पोलीस किंवा बँक कधीही व्हॉट्सॲपद्वारे समन्स पाठवत नाहीत किंवा 'व्हेरिफिकेशन'च्या नावाखाली थेट बँक खात्यातील रक्कम ट्रान्सफर करण्यास सांगत नाहीत. अशा प्रकारच्या कोणत्याही धमकीच्या कॉलला बळी न पडता, तातडीने जवळच्या पोलीस स्टेशनमध्ये संपर्क साधण्याचे आवाहन पोलिसांनी केले.
Web Summary : A retired woman in Ulhasnagar lost ₹60.2 lakh to fraudsters using fake police IDs and court documents via WhatsApp. Police are investigating the cybercrime, urging vigilance against such scams.
Web Summary : उल्हासनगर में एक सेवानिवृत्त महिला को व्हाट्सएप पर फर्जी पुलिस आईडी और अदालती दस्तावेज भेजकर ₹60.2 लाख की ठगी की गई। पुलिस साइबर अपराध की जांच कर रही है, ऐसे घोटालों के खिलाफ सतर्कता बरतने का आग्रह किया है।