कोविन ॲपमुळे लसीकरणात ग्रामीण भागात अडचणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 6, 2021 04:42 IST2021-05-06T04:42:34+5:302021-05-06T04:42:34+5:30
ठाणे : ग्रामीण भागातील इंटरनेटच्या अपुऱ्या सुविधांचा विचार करून ग्रामीण भागातील तरुणांसह ज्येष्ठ नागरिकांचे वेगाने लसीकरण करण्यासाठी कोविन ॲपमध्ये ...

कोविन ॲपमुळे लसीकरणात ग्रामीण भागात अडचणी
ठाणे : ग्रामीण भागातील इंटरनेटच्या अपुऱ्या सुविधांचा विचार करून ग्रामीण भागातील तरुणांसह ज्येष्ठ नागरिकांचे वेगाने लसीकरण करण्यासाठी कोविन ॲपमध्ये बदल करावा किंवा अन्य पर्यायांचा अवलंब करून स्थानिकांना प्राधान्य द्यावे, अशी मागणी जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष सुभाष पवार यांनी राज्याच्या आरोग्य सेवेच्या संचालकांकडे पत्राद्वारे केली आहे. शहरी भागातील नागरिक लसीकरणासाठी आल्यानंतर संसर्गाबरोबरच स्थानिक ग्रामस्थांबरोबर संघर्षही उद्भवण्याची शक्यता असल्याकडे त्यांनी लक्ष वेधले आहे.
कोविन ॲपद्वारे नागरिकांना कोणत्याही केंद्रातून लस घेण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. मात्र, शहरी भागापेक्षा ग्रामीण भागात इंटरनेटच्या सुविधा कमी आहेत. बहुसंख्य वेळा नेटवर्क नसल्यामुळे ग्रामस्थांना नोंदणी करता येत नाहीत. त्या उलट शहरी भागात चांगल्या नेटवर्कचा फायदा घेऊन ग्रामीण भागातील केंद्रावर शहरातील नागरिक नोंदणी करीत आहेत. त्यामुळे ग्रामीण भाग हा लसीकरणापासून वंचित राहण्याची भीती त्यांनी व्यक्त केली आहे.