एकनाथ शिंदेंच्या बालेकिल्ल्याला सुरुंग लावण्यासाठी शिवसेनेची वेगळी रणनीती, रश्मी ठाकरे मैदानात
By अजित मांडके | Updated: September 29, 2022 16:20 IST2022-09-29T16:19:09+5:302022-09-29T16:20:36+5:30
Thane News: काही वेळातच रश्मी ठाकरे टेंभी नाक्याच्या देवीचे दर्शन घेणार आरती करणार. आणि शक्ती प्रदूषण करत एकनाथ शिंदे गटाला एका प्रकारचे चॅलेंज देणार यासाठी सकाळीच ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांनी तयारी सुरू केली होती.

एकनाथ शिंदेंच्या बालेकिल्ल्याला सुरुंग लावण्यासाठी शिवसेनेची वेगळी रणनीती, रश्मी ठाकरे मैदानात
- अजित मांडके
ठाणे : काही वेळातच रश्मी ठाकरे टेंभी नाक्याच्या देवीचे दर्शन घेणार आरती करणार. आणि शक्ती प्रदूषण करत एकनाथ शिंदे गटाला एका प्रकारचे चॅलेंज देणार यासाठी सकाळीच ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांनी तयारी सुरू केली होती. परंतु शिंदे गटाकडून मात्र आमच्या देवीचे दर्शन कोणीही घेऊ शकतो यात आम्ही राजकारण करणार नाही अशी भूमिका घेतली आहे.
दोन गट आमने-सामने येथील अशी अशी चर्चा सुरू होती परंतु शिंदे गटाने समंजसपणाची भूमिका घेतल्यामुळे होणारा वाद शमला आहे. ठाकरे गटाला यानिमित्ताने ठाण्यामध्ये वातावरण निर्मिती करायची होती ती त्यांनी केली अशी चर्चा एकीकडे सुरू असताना दुसरीकडे मात्र शिंदे गटाने समंजसपणा दाखवलेला आहे. आणि जो आमने-सामने येण्याचा जो वाद होता तो टाळलेला आहे याचीही चर्चा चांगलीच रंगली आहे.