शहरं
Join us  
Trending Stories
1
ज्योतिरादित्य शिंदेंच्या ४०,००० कोटींच्या संपत्तीच्या वादावर मोठी अपडेट; तीन आत्यांसोबत मिळून वाद सोडवावा लागणार
2
भारताला घेरण्याचा प्रयत्न? सौदीनंतर कतार-UAE देणार पाकला साथ? MEA ची पहिली प्रतिक्रिया आली
3
जीएसटी नंतर MRP वर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; सामान्यांच्या थेट खिशावर परिणाम होणार...
4
आयटीआर भरताच आरबीआयचा मोठा निर्णय; क्रेडिट कार्डद्वारे करता येणार नाही हे काम...
5
"20 रुपयांच्या 6 ऐवजी फक्त 4 च पाणीपुरी दिल्या..."; गुजरातमध्ये भररस्त्यात महिलेनं सुरू केलं आंदोलन, अन् मग...!
6
लाडकी बहीण योजना: यापुढेही १५००₹ हवे असल्यास ‘हे’ काम करणे अनिवार्य; पाहा, संपूर्ण प्रक्रिया
7
'लवकरच व्यापार करार...', ट्रम्प टॅरिफबाबत परराष्ट्र मंत्रालयाने दिली महत्वाची माहिती
8
IND vs PAK: "जसप्रीत बुमराहला मैदानात.."; सुनील गावसकरांचा एक सल्ला, पाकिस्तानची निघाली लाज
9
“१०० वर्षे पूर्ण करणाऱ्या RSSने आता संविधान अन् गांधी विचार स्वीकारावा”: हर्षवर्धन सपकाळ
10
"सकाळी उठा, व्होटर डिलीट करा अन् पुन्हा झोपी जा...", राहुल गांधींचा ECI वर पुन्हा हल्लाबोल; BJP चा पलटवार!
11
हायव्होल्टेज ड्रामा! २० रुपयांत ६ ऐवजी दिल्या ४ पाणीपुरी; 'ती' ढसाढसा रडली, रस्त्यामध्येच बसली अन्...
12
लवकरच नवी Thar लाँच करण्याच्या तयारीत महिंद्रा, आधीच्या तुलनेत मोठे बदल होणार; जाणून घ्या, किती असणार किंमत?
13
फिटनेस मंत्र! सरळ तर सर्वच चालतात, कधीतरी उलटं चालून पाहा; फक्त ५ मिनिटंही पुरेशी
14
Navratri 2025: प्रतापगडावर नवरात्रीत का बसवले जातात दोन घट? जाणून घ्या शिवकालीन परंपरा
15
१८ वर्षांनी पुनरावृत्ती, आता मीनाताई ठाकरे पुतळा रक्षणासाठी मोठा निर्णय; ठाकरे गट काय करणार?
16
"तरीही त्याला कुत्रा चावतो.."; पाकिस्तानी सलामीवीर सॅम अयुबबाबत नेमकं काय बोलला माजी खेळाडू?
17
वसईत ट्रॅफिकमुळे गेला २ वर्षाच्या मुलाचा बळी; मुंबई अहमदाबाद महामार्गावर पाच तास अडकून होती रुग्णवाहिका
18
पितृपक्ष २०२५: चतुर्दशी श्राद्धाला असते विशेष महत्त्व, पण असे का? पाहा, काही मान्यता
19
टॉस पूर्वीची ती चार मिनिटे...! भारत सरकारची मंजुरी अन् BCCIचा मॅच रेफरींना संदेश पोहोचला...
20
'या अली' गाण्यामागचा आवाज हरपला, प्रसिद्ध गायक जुबीनचा स्कुबा डायव्हिंग करताना मृत्यू

प्रचार करायचा की, लग्नाला हजेरी लावायची?; लोकप्रतिनिधी संभ्रमात

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 22, 2019 05:47 IST

निवडणुकीचा आणि लग्नाचा हंगाम एकत्र आल्याने वाढली डोकेदुखी

ठाणे : ऐरवी ढुंकुनही न पाहणारे राजकीय नेते निवडणूक जवळ आली की मतदारांच्या घराचे अक्षरश: उंबरे झिजवतात. त्यांच्या प्रत्येक सुख-दु:खात वाटेकरू होऊ पाहतात. कारण, तो त्यांचा हुकुमी जनसंपर्काचा एक भाग असतो. लग्न ही त्यातील एक महत्त्वाची घटना. विभागाचे नगरसेवक किंवा आमदारांनी लग्नाला हजेरी लावली की, त्या कुटुंबालाही समाधान वाटते. त्यामुळेच राजकीय नेते मतदारसंघातील लग्न सहसा चुकवत नाहीत. यंदा मात्र ऐन निवडणुकीच्या हंगामात सलग लग्नाचे मुहूर्त आल्याने नेत्यांची चांगलीच दमछाक होऊ लागली आहे. निवडणुकीचा प्रचार करायचा की, लग्नाला हजेरी लावायची, असा प्रश्न त्यांना पडू लागला आहे.मुंबई-ठाणे परिसरांत येत्या २९ एप्रिल रोजी निवडणूक होत आहेत. त्याचा प्रचार सध्या ऐन भरात आला आहे. त्यात सलग लग्नाचे मुहूर्त आल्याने राजकीय नेत्यांची पंचाईत होऊ लागली आहे. लोकसभेनंतर काही महिन्यांतच विधानसभा निवडणुका येणार आहेत. त्यामुळे लोकसभेचा प्रचार करताकरता विद्यमान आमदारांना आपल्या भवितव्याचीही काळजी आहे. लग्नसोहळा हा राजकीय नेत्यांना लोकांच्यात मिसळण्याची मोठी संधी असते. लोकप्रतिनिधी ती साधतात. एकाच दिवशी अनेक मुहूर्त असले, तरी त्यातील काहींना हळदी समारंभाला, काहींच्या लग्नाला तर काही ठिकाणी पूजेला हजेरी लावण्याचा प्रयत्न नेतेमंडळी करतात. यंदा निवडणुकीच्या १० दिवस आधी जवळपास दररोज लग्नाचे मुहूर्त आहेत. त्यामुळे या लग्नकार्याच्या निमित्ताने लोकसभेच्या उमेदवाराचा प्रचार करत असताना आगामी काळात येणाऱ्या विधानसभा निवडणुकांना तोंड द्यावे लागणार असल्याने विद्यमान आमदारसुद्धा या लग्नावळीला जातीने हजेरी लावताना दिसू लागले आहेत.मतदानापर्यंत लग्नाचे ३१ मुहूर्तसर्वसाधारणपणे शाळा-महाविद्यालयांना सुट्या लागल्या की, लग्नाचे मुहूर्त ठरवले जातात. यंदा गेल्या वर्षीच्या तुलनेत अधिक मुहूर्त आहेत. निवडणूक काळात तर हे प्रमाण अधिक आहे. १९ एप्रिल ते २८ एप्रिलदरम्यान लग्नाचे तब्बल ३१ मुहूर्त आहेत. २१ आणि २५ एप्रिलचा अपवाद वगळता दररोज ते आहेत. त्यामुळे लगीनसराईत मतदार व्यस्त होणार असल्याने त्यांना मतदानासाठी बाहेर काढण्याची कसरतही नेते मंडळींना करावी लागणार आहे.धार्मिक कार्यक्रमांनाही भेटीहनुमान जयंती आणि त्याच दिवशी आलेल्या गुड फ्रायडेच्या निमित्ताने ठाण्यातील उमेदवारांनी अनेक चर्चना भेटी दिल्या होत्या. तर, हनुमान जयंतीनिमित्ताने ज्याज्या ठिकाणी भंडारा ठेवला होता, त्यात्या ठिकाणी सुमारे एक ते दोन हजारांचा जमाव हजर असतो. अशा ठिकाणीही उमेदवारांनी हजेरी लावल्याचे दिसून आले.

टॅग्स :Lok Sabha Election 2019लोकसभा निवडणूकMaharashtra Lok Sabha Election 2019महाराष्ट्र लोकसभा निवडणूक 2019marriageलग्न