शहरं
Join us  
Trending Stories
1
घसा बसला, कंठ दाटला अन् ७ मिनिटांत आवरलं भाषण; बारामतीतील सभेत पवारांनी काय आवाहन केलं?
2
रामललाचे दर्शन घेऊन पंतप्रधान नरेंद्र मोदींचा अयोध्येत रोड शो! रॅलीला आला मोठा जनसमुदाय
3
सुनील नरीनची आतषबाजी, एकाना स्टेडियमवर KKR चा विक्रम; LSGच्या घरी जाऊन धुलाई
4
राजनाथ सिंह यांचा PoK बाबत मोठा दावा; अब्दुल्ला म्हणाले- 'पाकिस्तानने बांगड्या घातल्या नाहीत'
5
एक ऑस्ट्रेलिया, बाकी ३ कोण याची पर्वा नाही; वर्ल्ड कप विजेत्या पॅट कमिन्सचा कॉन्फिडन्स पाहा, Video 
6
शरद पवारांच्या बारामतीतील प्रचाराच्या सांगता सभेत अचानक अजितदादांची एंट्री; नेमकं काय घडलं?
7
मालवाहू जीप व मोटरसायकलचा भीषण अपघात, माय-लेकाचा जागीच मृत्यू
8
"एका पठ्ठ्याने अश्रू काढले, घ्या मी पण रडतो, मला मत द्या", अजित पवारांनी केली नक्कल
9
मागे रिकामे कॅरेट अन् समोर चंदनाच्या गोण्या, 'पुष्पा' स्टाईल चोरी उघडकीस, 2 कोटींचे चंदन जप्त
10
भाजपा, महायुतीच्या उमेदवारांची उमेदवारी रद्द करा, कारण...; काँग्रेसची निवडणूक अधिकाऱ्यांकडे तक्रार
11
श्रीराम मंदिरात गेल्यामुळे पक्षातून तीव्र विरोध; काँग्रेस नेत्या राधिका खेरा यांचा राजीनामा...
12
पक्षफुटीनंतर शरद पवारांचे 'ते' शब्द आठवून रोहित पवार गहिवरले; ढसाढसा रडताना पाहून सारेच स्तब्ध
13
अगं बाई तुला आम्हीच निवडून आणत होतो; प्रचाराच्या शेवटच्या दिवशी अजितदादांचा सुप्रिया सुळेंवर निशाणा
14
'सोढी' १० दिवसांपासून बेपत्ता, आदल्या दिवशी नेमकं काय घडलं होतं? वडिलांनी केला खुलासा
15
निवडणुकीच्या तोंडावर मुद्दाम बदनामीचा प्रयत्न, 'त्या' प्रकरणाशी माझा संबंध नाही- सुनिल तटकरे
16
MS Dhoni चा त्रिफळा उडवताच हर्षल पटेलनं केलं असं काही; निराश फॅन्सची जिंकली मनं
17
'...तर मी मोदींचा जाहीर प्रचार करेन'; उद्धव ठाकरेंचं भरसभेत आश्वासन
18
सई ताम्हणकर अन् जितेंद्र जोशी झळकणार एकाच हिंदी सिनेमात, फरहान अख्तरने केली घोषणा
19
जम्मू-काश्मीर: दहशतवादी हल्ल्यात एकुलता एक मुलगा शहीद; चिमुकला पोरका झाला
20
इंग्लंडच्या सर्वात वजनदार व्यक्तीचा मृत्यू, पुढच्या आठवड्यात होता वाढदिवस, वजन होते...

112 डायल करा, दहाव्या मिनिटाला पोलिसांची मदत!

By ऑनलाइन लोकमत | Published: January 20, 2022 11:04 AM

रोज येतात १५० कॉल : हाणामारी, वाहतूककोंडीत मदतीची मागणी

- जितेंद्र कालेकरठाणे : कोणत्याही संकटग्रस्ताने पोलीस नियंत्रण कक्षाच्या ११२ या टोल फ्री क्रमांकावर फोन केल्यानंतर तत्काळ पोलिसांच्या व्हॅनसह बिट मार्शलचे पथक रवाना केले जाते. छेडछाड, हाणामारी किंवा लूटमार अशा वेळी तत्काळ ही कुमक पाठविली जाते. ठाणे शहर नियंत्रण कक्षाकडे दिवसाला १५० ते २०० कॉल येतात. यात ९६ ते १०० टक्के कॉलवर कारवाई होत असल्याची माहिती सूत्रांनी दिली.डायल ११२ ही योजना ४ सप्टेंबर २०२१ रोजी ठाण्यात सुरू झाली. याचे मुख्य नियंत्रण कक्ष नागपूर आणि नवी मुंबईत आहे. तिथून ठाण्यात हे कॉल आल्यानंतर जवळच्या पोलीस ठाण्याच्या ११२ ची यंत्रणा असलेल्या व्हॅनवर तो दिला जातो. त्यानंतर ही व्हॅन घटनास्थळी जाऊन कारवाई करते.

 कॉल रोजडायल ११२ ही योजना कार्यान्वित झाल्यापासून नियंत्रण कक्षाकडे दिवसाला किमान १५० कॉल येतात. याप्रमाणे चार महिन्यांत १८ हजारांहून अधिक कॉल अटेंड झाल्याची माहिती सूत्रांनी दिली. यामध्ये हाणामारी, छेडछाडीसह वाहतूक समस्यांच्याही कॉलचा समावेश आहे.मोबाइल डाटा टर्मिनलची होते मदतडायल ११२ च्या व्हॅनमध्ये मोबाइल डाटा टर्मिनल (एमडीटी) बसविले आहे. त्यावर कॉल देणाऱ्याच्या माहितीसह  ठिकाणाचीही माहिती मिळते. व्हॅनद्वारे काय कारवाई झाली ही माहिती मिळते. कारवाईचे प्रमाणपोलीस नियंत्रण कक्षाकडे कॉल आल्यानंतर त्यावर ठाणे शहर आयुक्तालयातील ३५ पोलीस ठाण्यांमधून कारवाईचे प्रमाण हे ९६ ते १०० टक्के आहे. कार्यक्रमांमध्ये स्पीकरचा चढा आवाज आणि हाणामारीबाबत माहिती देणाऱ्या कॉलची संख्या यात लक्षणीय असते.४५ चारचाकी, ६० दुचाकी आयुक्तालयातील ठाणे, भिवंडी, कल्याण, उल्हासनगर आणि वागळे इस्टेट या  परिमंडळातील ३५ पोलीस ठाण्यांमध्ये ४५ चारचाकी तर ६० दुचाकी कार्यरत आहेत. ग्रामीणमध्येही अशी सात वाहने आहेत.कोणत्याही अडचणीच्या प्रसंगी पोलिसांशी ११२ क्रमांकावर नागरिकांनी संपर्क केल्यास तत्काळ मदत दिली जाईल. पोलिसांनी काय कारवाई केली त्यावर वरिष्ठ अधिकारी आणि नियंत्रण कक्षाकडूनही नियंत्रण ठेवले जाते.     - गणेश गावडे,     पोलीस उपायुक्त, मुख्यालय, ठाणे शहर३०० कर्मचाऱ्यांचा ताफासंकटग्रस्तांना मदतीसाठी अत्याधुनिक सामग्रीसह चारचाकीमध्ये चार तर दुचाकीमध्ये दोन कर्मचारी तैनात आहेत. ठाणे आयुक्तालयात अशा ३०० कर्मचाऱ्यांचा ताफा सज्ज आहे.

टॅग्स :Policeपोलिस