मीरा रोडला अद्ययावत यंत्राद्वारे क्षयरोग निदान

By Admin | Updated: December 22, 2016 05:48 IST2016-12-22T05:48:20+5:302016-12-22T05:48:20+5:30

मीरा रोड येथील पालिकेच्या भारतरत्न स्व. इंदिरा गांधी रुग्णालयात जेन-एक्स्पर्ट हे क्षयरोग निदान करण्याचे अद्ययावत

Diagnosis of tuberculosis through Mira Road | मीरा रोडला अद्ययावत यंत्राद्वारे क्षयरोग निदान

मीरा रोडला अद्ययावत यंत्राद्वारे क्षयरोग निदान

भार्इंदर : मीरा रोड येथील पालिकेच्या भारतरत्न स्व. इंदिरा गांधी रुग्णालयात जेन-एक्स्पर्ट हे क्षयरोग निदान करण्याचे अद्ययावत यंत्र बसवण्यात आले असून त्याद्वारे रुग्णांनी मोफत क्षयरोग निदान करून घ्यावे, असे आवाहन पालिकेने केले आहे. या यंत्राद्वारे अवघ्या एका तासात रुग्णाची तपासणी होत असल्याने रुग्णांवर त्वरित उपचार करणे सोयीस्कर ठरत असल्याचे क्षयरोग विभागाचे प्रमुख डॉ. प्रमोद पडवळ यांनी सांगितले.
शहरात असे १०० रुग्ण आढळले असून त्यांच्यावर पालिका आरोग्य केंद्रांसह रुग्णालयात मोफत उपचार सुरू आहेत. तसेच या आजाराचे निदान त्वरित करण्यासाठी राज्य सरकारने सर्व पालिका व सरकारी रुग्णालयांना जेन-एक्स्पर्ट हे अद्ययावत यंत्र उपलब्ध करून दिले आहे.
या यंत्राद्वारे केवळ एका तासातच क्षयरोगाचे निदान करते. त्यामुळे रुग्णांच्या आजाराचे वर्गीकरण करून त्यांच्यावर तातडीने उपचार सुरू केले जातात. (प्रतिनिधी)

Web Title: Diagnosis of tuberculosis through Mira Road