‘धूम’ स्टाईलने चेनची चोरी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 1, 2021 04:27 IST2021-07-01T04:27:18+5:302021-07-01T04:27:18+5:30
---------------- चॉपर बाळगणाऱ्याला अटक उल्हासनगर : कॅम्प नं. १ महात्मा फुले चौकात मंगळवारी सकाळी साडेनऊ वाजता उभा असलेल्या बादल ...

‘धूम’ स्टाईलने चेनची चोरी
----------------
चॉपर बाळगणाऱ्याला अटक
उल्हासनगर : कॅम्प नं. १ महात्मा फुले चौकात मंगळवारी सकाळी साडेनऊ वाजता उभा असलेल्या बादल पटेल याची गस्त घालणाऱ्या पोलिसांनी अंगझडती घेऊन त्याच्याकडून चॉपर जप्त केला. या प्रकरणी उल्हासनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला असून, पोलीस अधिक तपास करीत आहेत.
--------------------
शिलाई मशीनचे वाटप
उल्हासनगर : खासदार सुप्रिया सुळे यांच्या वाढदिवसानिमित्त शहर राष्ट्रवादी पक्षाच्या शहराध्यक्षा किरण धामी-कौर यांच्यासह पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी शहरातील गरीब व गरजू महिलांना शिलाई मशीनचे वाटप केले. या वेळी पक्षाचे गटनेते, नगरसेवक, पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
------------------------
गावठी दारू विकणारा गजाआड
उल्हासनगर : कॅम्प नं. २ शास्त्रीनगरमधील गावठी दारूच्या अड्ड्यावर मंगळवारी दुपारी साडेतीन वाजता पोलिसांनी छापा मारून माजित रजा शेख याला अटक केली. त्याच्याकडून गावठी दारूचे साहित्य व रोख रक्कम जप्त केली असून, अधिक तपास उल्हासनगर पोलीस करीत आहेत.