शहरं
Join us  
Trending Stories
1
कर्तृत्वशून्य लोकांकडूनच जाती-धर्माच्या नावे राजकारण केले जाते: नितीन गडकरींचा टोला
2
अजित पवार गटाच्या आमदाराच्या स्वीय्य सहाय्यकाचा भिवंडीजवळ महामार्गवरील अपघातात मृत्यू
3
कोलकाता नाईट रायडर्स अव्वल स्थानी! LSG ला नमवून प्ले ऑफची जागा जवळपास केली पक्की 
4
रक्तानं आपलं चित्र रेखाटणाऱ्या कलाकाराचं आधी फडणवीसांकडून कौतुक अन् नंतर दिला प्रेमळ सल्ला!
5
निवडणूक रोख्यांमुळे पंतप्रधान कार्यालय वसुलीचे कार्यालय बनल्याचे स्पष्ट- प्रकाश आंबेडकर
6
महायुतीचे उमेदवार उज्ज्वल निकम यांच्यासाठी मुलगा अनिकेत निकम यांचा घरोघरी जाऊन प्रचार
7
लोकसभा निवडणुकीतील तिसऱ्या टप्प्याचे मतदान जवळ येताच सोशल मीडियावर रायगड पोलिसांची करडी नजर
8
डॉक्टर प्रविण अग्रवाल विरुद्ध विनयभंगाचा गुन्हा दाखल; रुग्ण महिलेसोबत अश्लील वर्तनाचा आरोप
9
अपघात की..? वांद्रे येथे नारळाचे झाड अचानक कोसळले! रिक्षाचालक जखमी, दुकानही जमीनदोस्त
10
मागील दोन महिन्यात झपाट्याने वाढलेल्या सोने-चांदीच्या किंमती घसरल्या, जाणून घ्या भाव
11
ठाण्यात अजब घटना! धक्का लागल्याचा जाब विचारल्याने मद्यपीचा वृद्धावर चाकूने हल्ला
12
धक्कादायक घटना! दहा लाखांमध्ये घराचे आमिष दाखवून एक कोटी ४८ लाखांची फसवणूक
13
Sharad Pawar Health Update: शरद पवारांचे उद्याचे सर्व कार्यक्रम, सभा रद्द! घसा बसला, प्रकृती अस्वास्थ्यामुळे घेतला निर्णय
14
दारूची वाहतूक अन् वाटपावर 'एक्साईज'ची करडी नजर; रात्रंदिवस सोलापुरात पथके राहणार तैनात
15
ठाणे जिल्ह्यातील निवडणूक प्रक्रिया शांततेत पार पाडण्यासाठी गांभीर्यपूर्वक काम करण्याचे अधिकाऱ्यांना धडे
16
कर्तव्यावर असलेले पोलीस अंमलदार ३८ वर्षीय बाळासाहेब नंदुर्गे यांचा पिंपरीत हृदविकाराने मृत्यू
17
रामललाचे दर्शन घेऊन पंतप्रधान नरेंद्र मोदींचा अयोध्येत रोड शो! रॅलीला आला मोठा जनसमुदाय
18
सोलापुरात भाजपा, काँग्रेस, बसपाच्या  प्रचाराबद्दल आचारसंहिता भंगचे गुन्हे 
19
अजितदादांना वेळ मिळाला, प्रचार फिरवला, 'अजेंडा' दिला; 'सुनेत्रा वहिनीं'ना फायदा होणार?
20
युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की यांचा रशियाच्या Most Wanted यादीत समावेश; अहवालात करण्यात आलाय दावा

भाईंदर मध्ये सदानंद बाबांच्या जन्मगावी भक्तांचा रोको  

By ऑनलाइन लोकमत | Published: August 29, 2019 11:10 PM

संतप्त भक्तांनी आज गुरुवारी सायंकाळी अचानक रास्ता रोको आंदोलन केले. दोन वेळा रास्ता रोको करण्यात आला.

मीरारोड - तुंगारेश्वर अभयारण्यातील बालयोगी सदानंद महाराज आश्रमाच्या भक्तनिवासाची इमारत पाडल्यानंतर आता बाबांचा आश्रम देखील तोडतील असे संदेश सदानंद बाबांचे जन्मगाव असलेल्या भार्इंदरच्या राई सह मोर्वा, मुर्धा गावात पसरल्याने संतप्त भक्तांनी आज गुरुवारी सायंकाळी अचानक रास्ता रोको आंदोलन केले. दोन वेळा रास्ता रोको करण्यात आला. या मुळे परिसरात तणावाचे वातावरण आहे.सदानंद बाबा यांचा अभयारण्यातील आश्रमसह अन्य बेकायदा बांधकामे तोडण्याचे आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिल्या नंतर कारवाईसाठी मोठा पोलीस बंदोबस्त आश्रम व परिसरात ठेवण्यात आला आहे. कारवाई दरम्यान अन्य ठिकाणी भक्तांचा उद्रेक होण्याच्या शक्यतेने मीरा भार्इंदर मधील मोर्वा, राई, मुर्धा सह आगरी समाज बहुल गावां मध्ये बुधवार पासुन पोलीसांचा बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.तुंगारेश्वर अभयारण्यातील भक्त निवासाची इमारत आश्रमाच्या ट्रस्टींनी स्वत:च तोडायला घेतली होती. पण आज गुरुवारी पोकलेनच्या सहाय्याने शासनाने ती जमीनदोस्त केली. भक्त निवासची इमारत तोडली आता आश्रमावर कधीही कारवाई होईल, वाट बघु नका त्वरीत तुंगारेश्वरला या अशा आशयाचे संदेश सोशल मिडीयावरुन व्हायरल होऊ लागले.बाबांचे जन्मगाव असलेल्या राई गावात याचे त्वरीत पडसाद उमटले. सायंकाळी सव्वा पाचच्या सुमारास राईगावातील महिला मोठ्या संख्येने मुख्य रस्त्यावर आल्या . महिलांनी रस्त्यातच ठाण मांडली. तरुण आदी देखील यात सहभागी झाले. भार्इंदर - उत्तन मार्गावरील दोन्ही बाजुची वाहनं रास्ता रोको मुळे अडकुन पडली. शाळांच्या बस मध्ये विद्यार्थ्यांसह महिला, प्रवाशी आदी वाहतुक कोंडीत अडकले.भार्इंदर व उत्तन सागरी पोलीसांनी घटनास्थळी धाव घेऊन आंदोलकांना समजवण्याचा प्रयत्न केला. शाळेच्या बस मध्ये विद्यार्थी अडकले आहेत याची जाणीव करुन दिली. यावेळी भक्तांनी बाबांचा जयघोष करत घोषणा दिल्या. राई गावात भक्त रस्त्यावर उतरल्याचे कळताच पुढे असलेल्या मोर्वा गावातील भक्तगण देखील रस्त्यावर उतरले. रास्ता रोको मुळे दोन्ही दिशेला वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या. सुमारे तासा भराच्या रास्ता रोको नंतर पोलीसांनी आंदोलकांना बाजुला घेत रस्ता मोकळा केला.परंतु त्या नंतर रात्री पुन्हा भक्त महिलांसह पुरुषांनी रस्त्यावर बसत आरती म्हणायला सुरवात केली. त्यामुळे पुन्हा वाहतुक ठप्प झाली. अखेर पोलीसांनी पुन्हा समजुत काढल्या नंतर भक्तांनी रस्ता मोकळा करुन दिला. रात्री गावात आश्रमा बाबत बैठक घेण्यात आली. दरम्यान शुक्रवारी सर्वोच्च न्यायालयात सुनावणी असल्याने आश्रमा बाबत काय निर्णय होतोय या कडे भक्तांचे लक्ष लागुन आहे.

टॅग्स :mira roadमीरा रोडbhayandarभाइंदर