शहरं
Join us  
Trending Stories
1
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
2
पाकिस्तानवर मोठा प्रहार करा! पहलगाम हल्ल्यानंतर जगभरातील भारतीयांची निषेध आंदोलने
3
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
4
आनंदाच्या भरात पायाला लागलंय ते विसरला! वैभवच्या शतकी खेळीला द्रविडनं अशी दिली दाद (VIDEO)
5
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
6
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
7
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
8
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
9
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
10
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
11
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
12
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
13
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
14
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
15
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
16
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
17
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
18
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय
19
मुलगी आयएएस अधिकारी झाली, आनंदोत्सवात वडिलांना ह्रदयविकाराचा झटका
20
युरोपात ब्लॅकआउट! फ्रान्स, स्पेनसह अनेक देशांमध्ये वीजपुरवठा खंडित; विमान, मेट्रोसेवा ठप्प

बाजूने लिहिणारे भक्त; विरोधी देशद्रोही! व्यंगचित्रकार संमेलनात राज ठाकरे याचे ‘फटकारे’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 22, 2018 03:46 IST

आताची परिस्थिती अशी आहे की, सरकारच्या बाजूने लिहिले की भक्त आणि विरोधात लिहिले की देशद्रोही समजले जाते. व्यंगचित्रकारांनी जे चुकते ते दाखविले पाहिजे आणि योग्य त्याचे कौतुक झाले पाहिजे, असे प्रतिपादन मनसे अध्यक्ष, व्यंगचित्रकार राज ठाकरे यांनी ठाण्यात केले.

ठाणे : आताची परिस्थिती अशी आहे की, सरकारच्या बाजूने लिहिले की भक्त आणि विरोधात लिहिले की देशद्रोही समजले जाते. व्यंगचित्रकारांनी जे चुकते ते दाखविले पाहिजे आणि योग्य त्याचे कौतुक झाले पाहिजे, असे प्रतिपादन मनसे अध्यक्ष, व्यंगचित्रकार राज ठाकरे यांनी ठाण्यात केले.कार्टुनिस्ट कंबाइन आयोजित अखिल भारतीय मराठी व्यंगचित्रकार संमेलन व हास्यप्रदर्शनात रविवारी ज्ञानराज सभागृह येथे राज यांची विशेष उपस्थिती होती. व्यंगचित्रकारांना उद्देशून ते म्हणाले की, तुम्हाला एखादी गोष्ट पटत नाही, तिथे प्रहार करा, प्रत्येक व्यंगचित्रकाराने त्याची जबाबदारी पार पाडली पाहिजे, योग्य भूमिका घेतली पाहिजे. व्यंगचित्रकार, साहित्यिक, पत्रकार, संपादक हे समाजाची मशागत करीत असतात. माझे काम मी बजावतोय. तुम्हाला जे म्हणायचे आहे ते व्यंगचित्रातून दाखवा. तुम्ही जगभर पोहोचत आहात. सर्व परिस्थितीवर तुम्ही भूमिका घ्यावी, ती कठोर, कडवट घ्यावी. सरकार व इतरांना काय घडतेय, काय चुकतेय हे समजले पाहिजे. व्यंगचित्रकलेची परंपरा जुनी असून, ती सर्वाधिक महाराष्ट्रात आहे. आजची राजकीय परिस्थिती पाहता, मी दिलेली व्यंगचित्रे वर्तमानपत्रात छापली जाणार नाही आणि ती त्यांना परवडणारही नाही. त्यामुळे मी स्वत:चे फेसबुक पेज सुरू केले आहे, तिथे मी माझी व्यंगचित्रे टाकतोय. वर्तमानपत्रात तुमची व्यंगचित्रे छापली काय, नाही छापली काय याचा विचार न करता, सोशल मीडियाचा वापर करा, असे आवाहन त्यांनी व्यंगचित्रकारांना केले.वर्तमानपत्रात व्यंगचित्र छापून येण्याची मजा वेगळी असते. व्यंगचित्रकला सर्वसामान्यांमध्ये रुजणे याचा लंडन येथे आलेला स्वानुभव राज ठाकरे यांनी या वेळी कथन केला. प्रत्येक जण व्यंगचित्रकार होऊ शकतो असे नाही, परंतु ही कला मुरण्यासाठी व्यंगचित्रकारांनी प्रयत्न केले पाहिजे, तसेच ज्यांना हौस आहे, त्यांनी या कलेत आले पाहिजे, असे सांगत व्यंगचित्रातील ताकद वाढो आणि वृद्धिंगत होवो, अशा सदिच्छा दिल्या.या वेळी ज्येष्ठ व्यंगचित्रकार प्रभाकर झळके यांना ‘जीवनगौरव’ पुरस्काराने सन्मानित करून, दिवाळी अंकांच्या संपादकांचे सत्कार करण्यात आले. कार्यक्रमाप्रसंगी ज्येष्ठ व्यंगचित्रकार शि. द. फडणीस, संमेलनाध्यक्ष विवेक मेहेत्रे, राजेश मोरे, स्थानिक नगरसेविका रुचिता मोरे उपस्थित होते.अध्यक्षीय भाषणात मेहेत्रे म्हणाले की, व्यंगचित्रकारांना साहित्यिकाचा दर्जा द्यावा, असे १०० वर्षांनंतरही कोणाला वाटत नाही. मराठीतील उत्तम खपाच्या दिवाळी अंकांमध्ये विनोदी अंकांचे स्थान वरचे आहे, ज्यामध्ये अनेक हास्यचित्रे रसिकांचे मनोरंजन करीत आहेत. ही परंपरा फार वर्षांपासून असूनही साहित्य संमेलनातील कार्यक्रमांच्या व्यासपीठांवर व्यंगचित्रकारांना निमंत्रण नसते. चित्रकार, नवचित्रकार, स्थापत्य रचनाकारही अजूनही व्यंगचित्रकारांना आपल्या सोबत घेत नाहीत, त्यामुळे व्यंगचित्रकारांची स्थिती ‘ना घर का ना घाट का’ अशी झालेली आहे, अशी खंत त्यांनी व्यक्त केली.आपल्या मुलांनी सिनेनट, खेळाडू, राजकारणी, आय.ए.एस. अधिकारी किंवा बिल्डर व्हावे, असे हल्लीच्या पालकांना वाटते, पण त्याचे हास्य-व्यंगचित्रकार होऊन उत्तम नाव व भरपूर पैसा मिळवावा, असे वाटत नाही, अशी नाराजीही मेहेत्रे यांनी व्यक्त केली.उपाध्याय, मोरे, चारोळे टीम अव्वल-सुरुवातीला आमच्यासारखेच आम्हीच या स्पर्धेचा पारितोषिक वितरण समारंभ पार पडला. यात सतीश उपाध्याय, संजय मोरे, उमेश चारोळे यांना प्रथम पुरस्कार टीम, अतुल पुरंदरे, योगेंद्र भगत, अशोक सुतार यांना द्वितीय पुरस्कार टीम तर विवेक प्रभुकेळुस्कर, अमोल ठाकूर, वैजनाथ दुलंगे यांना तृतीय पुरस्कार टीमद्वारे गौरविण्यात आले. चारुहास पंडीत, जगदीश कुंटे, सुरेश क्षीरसागर यांनी परीक्षक म्हणून काम पाहिले.

टॅग्स :Raj Thackerayराज ठाकरेMNSमनसेNarendra Modiनरेंद्र मोदी