शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रशांत किशोर यांना बिहारच्या आरा येथील रॅलीमध्ये गंभीर दुखापत, उपचारासाठी पाटणाला रवाना
2
छांगुर बाबावर EDची मोठी कारवाई! मुंबई, लखनौमध्ये छापे; ६० कोटींहून जास्तीचे मनी लाँड्रिंग उघड
3
"मी कोणाला छेडत नाही; पण मला कुणी त्रास दिला तर..."; एकनाथ शिंदेंचा उबाठा गटाला इशारा
4
महाराष्ट्र मराठी माणसाच्या बापाचाच! इथे कुणी वेडंवाकडं वागायचा प्रयत्न केला तर...- राज ठाकरे
5
"आता दुकाने नाही शाळाच बंद करेन"; त्रिभाषा सूत्रावरुन राज ठाकरेंनी सरकारला दिला इशारा
6
वैभव सूर्यवंशीच्या 'त्या' कृत्यामुळे मोठा गोंधळ; विराट कोहलीचे चाहते प्रचंड संतापले, कारण...
7
"जो भारताचा नागरिक नाही...", बंगालमधील दुर्गापूरमध्ये पंतप्रधान मोदींची सभा; घुसखोरांना इशारा दिला
8
भाजपा आमदाराच्या काकांना पालिका कर्मचाऱ्यांकडून लाठ्याकाठ्यांनी बेदम मारहाण, कारण काय?  
9
करुण नायरला दोन्ही टेस्टमध्ये संधी मिळेल! फ्लॉप शोनंतरही कोचला त्याच्यावर 'भरवसा'
10
"विधिमंडळात हे माझे ३६वे वर्ष, पण एवढ्या वर्षात..."; जयंत पाटील यांना नेमकी कसली खंत?
11
काल युद्धाचा इशारा, आज राजधानी सोडून पळून गेले... सिरियाचे राष्ट्राध्यक्ष अल-शारांचा अजब कारभार
12
नारायणपूरमध्ये सुरक्षा दलांना मोठे यश, चकमकीत ६ नक्षलवादी ठार
13
IND vs ENG ...तर रिषभ पंतला प्लेइंग इलेव्हनमध्ये खेळवू नका! शास्त्रींनी दिला गिल-गंभीर जोडीला सल्ला
14
ITI प्रवेशासाठी 'अनुसूचित जाती' व 'अल्पसंख्याक'चा दुहेरी लाभ घेणाऱ्यांवर होणार कारवाई
15
Dukes Ball Controversy : विषय हार्ड! चेंडूच्या क्वॉलिटी संदर्भातील मुद्द्यावर कंपनी घेणार रिव्ह्यू
16
"कुणाचा बाप आला... बापाचा बाप आला... आजोबा आला तरी मुंबई...", CM देवेंद्र फडणवीसांनी ठणकावलं
17
भीषण अपघातात ट्रकखाली चौघे शंभर फूट फरफटत गेले, पित्यासह दोन चिमुकल्यांचा मृत्यू
18
बौद्ध भिक्षूंचे 80 हजारहून अधिक अश्लील फोटो-व्हिडिओ; ब्लॅकमेल करून थायलंडमधील महिलेनं कमावले 102 कोटी
19
कॅनडामध्ये विमान हायजॅक! अधिकाऱ्यांमध्ये घबराट; मागून पाठवले F-35 लढाऊ विमान पण...
20
"CM फडणवीसांनी ४० फोन केले पण..."; ठाकरेंनी मतांची माती केली म्हणत एकनाथ शिंदेंनी सगळचं काढलं

आगीच्या १८४ घटनांमध्ये वनसंपदा जळून खाक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 27, 2021 04:41 IST

लोकमत न्यूज नेटवर्क भातसानगर : शहापूर तालुका जसा डोंगरदऱ्या असणारा तसाच तो जंगलांनी भरलेला तालुका आहे. मात्र गेल्या काही ...

लोकमत न्यूज नेटवर्क

भातसानगर : शहापूर तालुका जसा डोंगरदऱ्या असणारा तसाच तो जंगलांनी भरलेला तालुका आहे. मात्र गेल्या काही दिवसांपासून या जंगलांना लागणाऱ्या वणव्यामुळे ही वनसंपदा आता धोक्यात आली असून ती वाचविण्यासाठी गावपातळीवर प्रयत्न करण्याची गरज निर्माण झाली आहे. अनेक वनौषधी असून शिकारीच्या हेतूने वा अनावधानाने लागलेल्या आगीमुळे किंवा नैसर्गिक आपत्तीमुळे, लावल्या जाणाऱ्या वणव्यांमुळे ही संपदा आता धोक्यात आली आहे. गेल्या ‌‌‌वर्षभरात १८४ घटनांमध्ये वनसंपदा खाक झाली आहे.

कसारा, वाशाळा, डोळखांब, वासिंद, शहापूर या सर्वच परिसरात दररोज वणवे लावले जात असून यामुळे मोठमोठी झाडे पेटल्याने उन्मळून पडत आहेत. शिकारीच्या उद्देशाने तर काही जंगले तस्करीच्या उद्देशाने तर अगदी बोटावर मोजण्याइतकेच वणवे नैसर्गिक आपत्तीतून निर्माण होत आहेत. मात्र हे वणवे विझविण्यासाठी गावकरी पुढे येताना दिसत नसल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे. याची कारणमीमांसा केल्यानंतर आज शेतीचे प्रमाण कमी झाले असून त्यासाठी लागणारे गवत लागत नसल्याने नागरिक वणवे विझविण्यासाठी पुढे येत नसल्याची बाब उघड झाली आहे.

नागरिकांनी वणवे विझविण्यासाठी वनविभागाला सहकार्य करण्याकरिता व वने किती महत्वाची आहेत, त्यांचे संगोपन व संरक्षण किती महत्त्वाचे आहे हे पटवून देण्यासाठी कीर्तनाची जोड दिली जात असून गाव परिसरात जनजागृती केली जात आहे. त्यासाठी उपवनसंरक्षक वसंत घुले, प्रकाश चौधरी, प्रियांका उबाळे, संदीप तोरडमल, प्रशांत निकाळजे, मयूर बोठे व वन क्षेत्रपाल जयवंत फर्डे प्रयत्न करीत आहेत.

----------------------------------------------

शहापूर वनविभागातील २०२० मधील घटना

महिना - आगीच्या घटना - जाळीत क्षेत्र हेक्टर

जाने - २०. १६. १३३००.

फेब्रुवारी- १८.२३.९. ११६५०

मार्च - ३४. ४६.७. ३१७५०

एप्रिल - ६१. ८७.३५. ५०६००

मे - १७. १९.६. ६८५०

जून - ००. ००. ००

जुलै - ००. ००. ००

ऑगस्ट - ००. ००. ००

सप्टेंबर - ००. ००. ००

ऑक्टोबर - ००. ००. ००

नोव्हेंबर - ०१. ०१. ७००

डिसेंबर - १३. १५. १०६००

एकूण. १८४. २०६.५५. १२७२८०

जानेवारी २०२१

जानेवारी ११. १०.५. ७३५०

फेब्रुवारी. १८. १५.२५०. ८६७५.