उपमहापौरांच्या प्रभागात स्वच्छतागृहच नाही
By Admin | Updated: September 26, 2015 22:54 IST2015-09-26T22:54:16+5:302015-09-26T22:54:16+5:30
केडीएमसीतील बहुतांशी वॉर्डमध्ये मुलभूत सुविधांची वानवा आहे. एकही वॉड आयएसओ प्रमाणित नाही ही शोकांतिका. तरीही स्मार्ट सिटीच्या दिशेने महापालिकेची वाटचाल सुरु आहे

उपमहापौरांच्या प्रभागात स्वच्छतागृहच नाही
अनिकेत घमंडी, डोंबिवली
केडीएमसीतील बहुतांशी वॉर्डमध्ये मुलभूत सुविधांची वानवा आहे. एकही वॉड आयएसओ प्रमाणित नाही ही शोकांतिका. तरीही स्मार्ट सिटीच्या दिशेने महापालिकेची वाटचाल सुरु आहे हा विरोधाभास नाही का असा सवाल जनतेला आहे.
डोंबिवलीतील उपमहापौरांच्या वॉर्डात कोट्यवधींची कामे प्रस्तावीत असून त्यांना त्यांचा वॉर्ड आयएसओ प्रमाणित करायचा होता. परंतु, तो झालेला नाही. या ठिकाणी एमएमआरडीच्या माध्यमातून एका झोपडपट्टीत शौचालय बांधले असून ते एका खासगी मंडळाने चालवायला घेतले आहे. परंतु, त्या ठिकाणी प्रचंड गैरसोय असून तेथे शौचाला जाणे म्हणजे रोगाला आमंत्रण आहे. त्यासंदर्भात नगरसेवकाने वेळोवेळी ते महापालिकेकडे हस्तांतरीत करा अशा सूचना दिल्या. परंतु त्यासाठी कोणीही पुढे आलेले नसल्याने तो पेच सोडवतांना त्यांच्या नाकीनऊ आले. पेंडसेनगरच्या भागात गल्लोगल्ली सिमेंट काँक्रीटच्या होत आहेत, एलईडी दिवे लागले आहेत, काही ठिकाणी प्रस्तावीत आहेत. मात्र जे दिवे लावले होते, त्यातील ११४ पैकी काही तांत्रिक कारणाने बंद आहेत. एका गल्लीतील काँक्रीटचे काम झाले. त्यानंतर बाजूच्या रस्त्यावर पेव्हरब्लॉक न बसवल्याने रहिवाशांना दगडांमधून मार्ग काढतांना अडथळे येत आहेत. याच ठिकाणी पंचायत बावडी परिसरातील पारंपारीक विहिर स्वच्छ करण्यात आली. त्यातून दिवसाला ४० हजार लिटर पाणी मिळू शकते, परंतु, केवळ तांत्रिक बाबींची पूर्तता न झाल्याने ते पाणी वापरात नाही. यामुळे ते ड्रेनेजच्या टाक्या स्वच्छ करण्यासाठी वापरण्याचा प्रस्ताव कागदावरच आहे. या ठिकाणी पोलीस चौकी बांधली. परंतु रामनगर पोलीस ठाण्याकडून तेथे पोलीस पाठवले जात नाहीत. त्यामुळे ती बंद असल्याची टीका नागरिकांनी केली. या ठिकाणी अनेकदा चेन स्रॅचिंगच्या घटना घडतात. त्यामुळे नागरिक त्रस्त आहेत. व्ही.पी.रोड एलईडी दिव्याचा करायचा होता तो अद्याप झाला नसून निवडणुकीच्या तोंडावर त्यासाठी ५० लाखांची तरतूद केली आहे का असा नागरिकाचा सवाल आहे. रोटरीच्या उद्यानात ओपन जीमची सोय असून तेवढाच काय तो नागरिकांना विरंगुळा आहे.