दलित वस्त्या फोडल्याचा उपमहापौरांचा आरोप; उल्हासनगरात प्रभाग रचनेवरून भाजप-रिपाइं आक्रमक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 14, 2022 19:12 IST2022-02-14T19:12:30+5:302022-02-14T19:12:35+5:30
उल्हासनगर महापालिका निवडणुक प्रभाग रचनावरून सोमवारी भाजप व रिपाईने आक्रमक भूमिका घेतली आहे.

दलित वस्त्या फोडल्याचा उपमहापौरांचा आरोप; उल्हासनगरात प्रभाग रचनेवरून भाजप-रिपाइं आक्रमक
- सदानंद नाईक
उल्हासनगर : महापालिका प्रभाग रचना मध्ये दलित वस्त्यां फोडल्याचा आरोप पत्रकार परिषद घेऊन रिपाइंचे शहराध्यक्ष व उपमहापौर भगवान भालेराव यांनी केला. तसेच हरकती घेतल्यानंतर प्रभाग रचना निवडणूक आयोगाच्या नैसर्गिक नियमानुसार न झाल्यास न्यायालयाचा दरवाजा ठोटावणार असल्याचा इशारा त्यांनी दिला. दरम्यान आमदार कुमार आयलानी, गणपत गायकवाड, भाजपचे शहाराध्यक्ष जमनुदास पुरस्वानी, उपमहापौर भालेराव यांनी एकत्र येऊन आक्रमक भूमिका घेऊन प्रभाग रचने बाबत निवडणूक विभागाला निवेदन दिले.
उल्हासनगर महापालिका निवडणुक प्रभाग रचनावरून सोमवारी भाजप व रिपाईने आक्रमक भूमिका घेतली आहे. आमदार कुमार आयलानी, आमदार गणपत गायकवाड, भाजपचे शहराध्यक्ष जमनुदास पुरस्वानी, रिपाइंचे शहाराध्यक्ष व उपमहापौर भगवान भालेराव यांनी एकत्र येत प्रभाग रचनेवर आक्षेप घेऊन निवेदन दिले. सत्ताधारी शिवसेना, राष्ट्रवादी पक्षाच्या नेत्यांनी अधिकाऱ्यांना हाताशी धरून सोयीप्रमाणे प्रभाग रचना केल्याचा आरोप यावेळी त्यांनी केला. तसेच हरकती घेतलेल्या प्रभाग दुरुस्ती होणे गरजेचे असल्याचे मत आमदार कुमार आयलानी यांनी व्यक्त केले. दरम्यान रिपाईचे शहराध्यक्ष व उपमहापौर भगवान भालेराव यांनी उपमहापौर कार्यालयात पत्रकार परिषद घेऊन प्रभाग रचनेत दलित वस्त्या फोडल्याचा आरोप केला. हरकती नंतर नैसर्गिक नियमानुसार प्रभाग रचना झाली नाहीतर, न्यायालयाचे दार ठोटावणार असल्याचा इशारा त्यांना दिला आहे.
उपमहापौर भगवान भालेराव यांच्या आरोपाचा रोख निवडणूक उपायुक्त यांच्याकडे आहे. याप्रकारने उपायुक्त विरुद्ध उपमहापौर असा वाद रंगण्याची शक्यता आहे. दरम्यान स्थायी समिती सभापती टोनी सिरवानी यांनीही निवडणूक उपायुक्त यांच्या बदलीसाठी वरिष्ठ स्तरावर पाठपुरावा केला. महापालिका निवडणूकी दरम्यान असे वादग्रस्त अधिकारी नकोत. अशी भूमिका घेऊन येणाऱ्या महासभेत असे अधिकारी हटावचा प्रस्ताव आणणार असल्याचे सिरवानी म्हणाले. दुसरीकडे सत्ताधारी शिवसेना, राष्ट्रवादी, काँग्रेस पक्षाने निवडणूक प्रभाग रचनेवरून काही एक बोलण्यास नकार दिल्याने, प्रभाग रचनेला त्यांचा विरोध नसल्याचे बोलले जात आहे.