राजीव गांधीनगर येथील हद्दपार गुंडाला अटक
By सदानंद नाईक | Updated: January 29, 2024 18:50 IST2024-01-29T18:50:06+5:302024-01-29T18:50:33+5:30
पोलिसांनी तडीपार गुंडाला अटक करून उल्हासनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.

राजीव गांधीनगर येथील हद्दपार गुंडाला अटक
उल्हासनगर: कॅम्प नं-१, राजीव गांधीनगर येथे राहणाऱ्या तडीपार गुंडाला गोलमैदान येथील मोकळ्या जागेत अंमली पदार्थ सेवन करीत असतांना पोलिसांनी रविवारी रात्री साडे आठ वाजता अटक केली. पोलिसांनी तडीपार गुंडाला अटक करून उल्हासनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. उल्हासनगर कॅम्प नं-१, राजीव गांधीनगर झोपडपट्टी परिसरात राहणाऱ्या विनोद भीमराव मोरे यांच्यावर विविध पोलीस ठाण्यात गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल आहेत.
पोलिसांनी त्याला मुंबई शहर, उपनगरे, ठाणे जिल्हासह रायगड जिल्ह्यातील पनवेल, कर्जत तालुक्यातून हद्दपार केले. रविवारी उल्हासनगर पोलीस ठाण्याचे पोलीस पेट्रोलिंग करीत असतांना गोलमैदान येथील मोकळ्या जागेत विनोद मोरे हा अंमली सेवन करीत असतांना रात्री साडे आठ वाजता आढळून आला. पोलिसांनी अधिक चौकशी केली असता, तो तडीपार गुंड असल्याचे उघड झाले. पोलिसांनी अटक करून गुन्हा दाखल केला आहे.