लग्नाला नकार : तरुणीची फेसबुक अकाउंटने बदनामी

By Admin | Updated: December 28, 2015 02:03 IST2015-12-28T02:03:33+5:302015-12-28T02:03:33+5:30

१५ लाख रुपये हुंडा मागितला म्हणून लग्नाला नकार देणाऱ्या तरुणीचे बनावट फेसबुक अकाऊंट उघडून त्यावर अश्लिल फोटो लोड करून तिची बदनामी करणाऱ्या दिल्लीतील विकृत

Denial of marriage: The girl's Facebook account slandered | लग्नाला नकार : तरुणीची फेसबुक अकाउंटने बदनामी

लग्नाला नकार : तरुणीची फेसबुक अकाउंटने बदनामी

वसई : १५ लाख रुपये हुंडा मागितला म्हणून लग्नाला नकार देणाऱ्या तरुणीचे बनावट फेसबुक अकाऊंट उघडून त्यावर अश्लिल फोटो लोड करून तिची बदनामी करणाऱ्या दिल्लीतील विकृत तरुणा विरुद्ध तुळींज पोलिसठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शंकर श्रीवास्तव (२७) असे तरुणाचे नाव असून तुळींज पोलिसांनी त्याच्या अटकेसाठी दिल्ली पोलिसांशी संपर्क साधला आहे.
त्या अकाऊंटवर तिचा मोबाईल नंबर टाकण्यात आल्यामुळे तिला अनेक फोन येत होते. त्यामुळे त्रस्त झालेल्या तरुणीने तुळींज पोलीस ठाण्यात धाव घेतली होती. नात्यातलेच प्रकरण असल्याने बदनामीला घाबरून वधूपक्ष हुंडा देण्यास तयार होईल अशी वर पक्षाची अपेक्षा होती. याप्रकरणी तरुणीच्या तक्रारीवरुन तुळींज पोलिसांनी शंकर याच्यावर आयटी अंतर्गत २००८ प्रमाणे ६६ सी आणि ६७ प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे. शंकर दिल्लीतील ज्या कंपनीत कामाला आहे त्या कंपनीला पत्र पाठवून त्याला पोलीस ठाण्यात हजर राहण्यास कळवण्यात आले, असल्याची माहिती पोलीस निरिक्षक किरण कबाडी यांनी दिली. (प्रतिनिधी)

Web Title: Denial of marriage: The girl's Facebook account slandered