शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी: दहशतवादी हल्ल्यात भारताचा १ जवान शहीद, एकाची प्रकृती गंभीर, तर तिघं..
2
नरेंद्र मोदी हे आठवडामंत्री झाले आहेत, कारण...; शरद पवारांचा घणाघात
3
रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने सहज जिंकला सामना, गुजरात टायटन्सला नमवून Mumbai Indians ला दिला धक्का 
4
२५ धावांत ६ विकेट्स ! RCB ने पायावर धोंडा मारला, जॉश लिटल GT चा नायक ठरला 
5
विराट कोहलीचा भीमपराक्रम! उत्तुंग षटकार पाहताच भारी होती अनुष्का शर्माची रिॲक्शन, Video
6
मोठी बातमी: लैंगिक शोषण आणि अपहरण प्रकरणात एचडी रेवन्ना यांना SITकडून अटक
7
विझण्यापूर्वी RCB ची फडफड! गुजरात टायटन्सविरुद्ध दाखवली 'पॉवर'; यंदाच्या पर्वात रचला इतिहास
8
अरे तुला फरक पडत नाही, मग कशाला उत्तर देतोस? सुनील गावस्कर संतापले, विराट कोहलीला सुनावले
9
PHOTOS : क्रिकेट म्हणजे जीवन आणि क्रिकेट हेच जीवन; IPL मध्ये जान्हवी कपूरचा जलवा!
10
'घेऊद्या तारीख, ईडीच्या प्रकरणात कुठे जामीन मिळतो'; न्यायाधिशांचे कोर्टरुमबाहेर धक्कादायक वक्तव्य
11
"अरविंद केजरीवालांनी वाराणसीतून नरेंद्र मोदींच्या विरोधात निवडणूक लढवावी"; सपा नेत्याची मागणी
12
मला धमक्या देऊ नका, मी मनात आणलं तर..., नारायण राणे यांचा उद्धव ठाकरेंना इशारा
13
पाकिस्तानच्या माजी मंत्र्यांकडून दुसऱ्यांदा राहुल गांधींचं कौतुक; भाजपानं घेरलं
14
IPL 2024 मधील दोन भारतीय स्टार गोलंदाज स्पर्धेत आता पुढे कदाचित नाही खेळू शकणार 
15
NSE Share : एकावर ४ बोनस शेअर्स, ९०००% डिविडंड; 'या' एक्सचेंजनं गुंतवणूकदारांना दिलं डबल गिफ्ट
16
"हार्दिक पांड्याबद्दल आदर दिसत नाही", इरफान पठाणकडून MI च्या कॅप्टनची बिनपाण्याने धुलाई
17
T20 World Cup : यजमान विडिंजने उतरवला तगडा संघ; IPL गाजवणाऱ्यांना संधी, नवे चेहरेही मैदानात!
18
रोहित शर्माबद्दल 'ती' अफवा पसरवली; आकाश चोप्रा भडकला, दिली संतप्त प्रतिक्रिया
19
कांदा निर्यातबंदी उठवण्याच्या निर्णयावर काँग्रेसची टीका, बाळासाहेब थोरात म्हणाले...
20
Kotak Mahindra Bank Q4: नफा वाढून ४१३३ कोटींवर, व्याजातून होणारी कमाई १३.३% वाढली

खाजगीकरणाविरोधात कामगार संघटनेची निदर्शने

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 14, 2018 11:27 PM

कल्याण-डोंबिवली महापालिकेने चार प्रभागक्षेत्रांतील कचरा उचलण्याचे १०७ कोटींचे कंत्राट खाजगी कंपनीला दिले आहे.

कल्याण : कल्याण-डोंबिवली महापालिकेने चार प्रभागक्षेत्रांतील कचरा उचलण्याचे १०७ कोटींचे कंत्राट खाजगी कंपनीला दिले आहे. या खाजगीकरणाविरोधात म्युन्सिपल कर्मचारी कामगार सेनेतर्फे शुक्रवारी महापालिका मुख्यालयात निदर्शने करण्यात आली.या आंदोलनात कामगार सेनेचे उपाध्यक्ष रवी पाटील, प्रकाश पेणकर, सुनील पवार, कार्याध्यक्ष अजय पवार आदी कामगार सहभागी झाले होते. यावेळी कामगारांनी महापालिकेविरोधात घोषणाबाजी केली. कंत्राटीपद्धतीने कामगार भरले जातात. तसेच खाजगी कंत्राटदाराला कचरा उचलण्याचे काम दिले जाते. त्यावर कोट्यवधी रुपये खर्च केले जातात. कामावर असताना मृत्यू झालेल्या महापालिकेच्या कामगारांच्या वारसांना कामावर घेतले जात नाही. निवृत्तीनंतर रिक्त झालेली पदे पुन्हा भरली जात नाहीत. त्यामुळे सफाई कामगारांची संख्या लोकसंख्येच्या निकषानुसार ५० टक्केच आहे. उर्वरित ५० टक्क्यांचा अनुशेष महापालिका भरत नाही. त्यासाठी खासगीकरण करून कंत्राटदारांचे खिशे भरले जातात. या भ्रष्टाचारात अधिकारी असून त्यांची चौकशी केली झाली पाहिजे, अशी मागणी संघटनेने यावेळी केली.कंत्राटी पद्धतीसह खाजगीकरणास विरोध करणाऱ्या संघटनेतर्फे कामगारांना आश्वासित प्रगती योजनाचा लाभ दिला जावा, कामगारांचे वेतन बँकेत जमा करण्यात यावे, कामगारांचा आकृतिबंद तयार करावा, शिपाई, सुरक्षा रक्षक व कामगारांना लिपिक पदावर पदोन्नतीबरोबच त्यांना गणवेश, गमबूट, चप्पल, झाडू, छत्री आदी साहित्य वेळेत दिले जावे, सेवा शर्ती भरतीविषयी सरकारने तात्काळ मंजुरी घ्यावी, सेवानिवृत्त होणाºया कामागारांची देय रक्कम त्याच दिवशी दिली जावी, त्यांना निवृत्ती वेतन लागू करण्यात यावे या विविध मागण्यांचे निवेदन संघटनतर्फेआयुक्त गोविंद बोडके यांना देण्यात आले.

टॅग्स :kdmcकल्याण डोंबिवली महापालिकाMuncipal Corporationनगर पालिका