शहरं
Join us  
Trending Stories
1
'त्या' ५ जागांबाबत राजनाथ सिंह आणि शरद पवारांमध्ये फोनवरून चर्चा; प्रकाश आंबेडकरांचा दावा
2
पवार वि. पवार वादाला मतदार कंटाळला; बारामतीत टक्का घसरला
3
आजचे राशीभविष्य - ८ मे २०२४; धन - मान - सन्मान मिळतील, सरकार कडून फायदा होईल
4
ऐन लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर भाजप सरकार कोसळणार? हरयाणामध्ये तीन अपक्ष आमदारांनी काढला पाठिंबा
5
तीन ईव्हीएम जाळण्याचा प्रयत्न; तरुणावर गुन्हा दाखल; सोलापूर जिल्ह्यातील बागलवाडी येथील बूथवरील प्रकार
6
‘सेक्स स्कँडल’च्या २५,००० पेन ड्राइव्हचे पोलिसांनीच वाटप केले; कुमारस्वामी यांचा आरोप, मोदीही प्रथमच बोलले
7
अरविंद केजरीवाल यांना जामीन देण्यास सुप्रीम कोर्ट अनुकूल; पण...
8
'तुला सहानंतर कोण आहे? बारामतीचा कोण येत नाही'; आमदार दत्ता भरणेंची शरद पवार गटाच्या कार्यकर्त्याला शिवीगाळ
9
मतदानाच्या दिवशी बारामतीत नात्यांचा ट्विस्ट, सुप्रिया सुळेंनी घेतली अजित पवारांच्या आईची भेट; तर अजित पवार म्हणाले... मेरी माँ मेरे साथ है!
10
‘मुस्लीम आरक्षण’ नवा मुद्दा; प्रचारात होतोय वारंवार उल्लेख, मोदींच्या जाळ्यात विरोधक अडकले
11
१० लाख इनाम असलेल्या बासित दारसह ४ अतिरेकी चकमकीत ठार
12
४ जून ‘इंडिया आघाडी’ची एक्स्पायरी डेट : पंतप्रधान मोदी 
13
घराण्याचा वारसा जिंकणार की नव्या चेहऱ्याला कौल मिळणार? विखे-लंके लढत : महसूलमंत्र्यांची प्रतिष्ठा पणाला
14
‘बंगाली प्राइड’वर अन् विकास-अराजकतेमध्ये संघर्ष; दक्षिण बंगालच्या जागांवर तृणमूलची मदार
15
डाॅक्टरांच्या मनाईनंतरही धोनी खेळतोय आयपीएल; याच्या मांसपेशी फाटल्या
16
दिल्लीच्या प्ले ऑफच्या आशा कायम; राजस्थानचा २० धावांनी पराभव; संजू सॅमसनची अपयशी झुंज
17
बीअर शॉपीच्या परवान्यासाठी लाच; उत्पादन शुल्क अधीक्षकासह तीन अधिकारी जाळ्यात
18
‘मॅट’ने केले राज्य सरकारचे पोस्टमार्टेम; वैद्यकीय शिक्षण संचालकांची नियुक्ती तत्काळ संपुष्टात आणण्याचे आदेश; नवीन संचालक नेमा
19
उपनगरांतील मतदार दिलदार, शहरात कंजुषी; मुंबईतील सर्व मतदारसंघांचे आकडे काय सांगतात...
20
दौडा दौडा... भागा भागा सा... प्रचार करताना दमछाक

नीळकंठ ग्रीन्सवासीयांची ठामपाविरोधात निदर्शने

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 19, 2018 3:44 AM

नीलकंठ ग्रीन्स सोसायटीच्या मागील बाजूस असलेल्या ठाणे महापालिकेच्या जागेवर लवकरच महाविद्यालय सुरू होत आहे. त्यासाठी रहदारीचा रस्ता हा ग्रीन्सच्या आवारातूनच दिला जाणार असून, त्यामुळे सोसायटीची सुरक्षितता धोक्यात येऊ शकते

ठाणे : नीलकंठ ग्रीन्स सोसायटीच्या मागील बाजूस असलेल्या ठाणे महापालिकेच्या जागेवर लवकरच महाविद्यालय सुरू होत आहे. त्यासाठी रहदारीचा रस्ता हा ग्रीन्सच्या आवारातूनच दिला जाणार असून, त्यामुळे सोसायटीची सुरक्षितता धोक्यात येऊ शकते याच्या निषेधार्थ नीळकंठ ग्रीन्सवासियांनी रविवारी सकाळी सोसायटीच्या गेटवर निदर्शने केली. निदर्शनाद्वारे त्यांनी महापालिका आणि विकासकाचा निषेध केला.मानपाडा येथील नीळकंठ ग्रीन्स सोसायटीत सुमारे ८०० हून अधिक फ्लॅटस् आणि ६००० पेक्षा अधिक रहिवासी राहतात. या सोसायटीच्या मागच्या बाजूस बांधण्यात येणाऱ्या महाविद्यालयात अनेक विद्यार्थी येण्याची शक्यता आहे आणि त्यांना रहदारीसाठी ग्रीन्सच्या आवारातील रस्ता दिल्यास सुरक्षा राहणार नाही. गेल्या अनेक वर्षात विकासकाने आम्हा रहिवाशांना किंवा नव्याने घर खरेदी करणाºया ग्राहकांपैकी कोणालाही कल्पना दिली नाही. उलट या जागेवर भविष्यात गार्डन किंवा अ‍ॅम्फिथिएटर होऊ शकते, असे सांगितले होते. मात्र येथे होणाºया महाविद्यालयासाठी सोसायटीच्या आवारातून रस्ता जाणार असल्याची बाब आम्हाला काही दिवसांपूर्वी समजली. त्यामुळे बिल्डर आणि ठाणे महापालिकेच्याविरोधात मोर्चा काढला. यावेळी त्यांनी ‘सेव्ह सोसायटी’, ‘महाविद्यालय चांगले पण सोसायटीच्या आवारातून नको’ असे फलक दिसले.आम्ही रहिवाशांनी याबाबत विकासकाला निवेदनाद्वारे विचारणा केली मात्र याठिकाणी काय उभे राहणार, याची नेमकी कल्पना मलाही नव्हती, असे विकासकाने सांगितले. या संदर्भात ठाणे महानगरपालिकेलाही निवेदन दिले होते. त्याला अनुसरून याबाबत सोमवारी चर्चा करू असे आश्वासन महापौरांनी दिल्याचे सगिना देशमुख यांनी सांगितले. जोपर्यंत यावर समाधानकारक उत्तर मिळत नाही, तोपर्यंत आम्ही याविरोधात लढा देणार आहोत, असे प्रकाश बोंदरे म्हणाले.रस्ता दिल्यास सुरक्षा नाही>रस्ता दिल्यास सुरक्षा नाहीनीळकंठ ग्रीन्स सोसायटीत ६००० पेक्षा अधिक रहिवासी राहतात. सोसायटीच्या मागच्या बाजूस बांधण्यात येणाºया महाविद्यालयात अनेक विद्यार्थी येण्याची शक्यता आहे आणि त्यांना रहदारीसाठी ग्रीन्सच्या आवारातील रस्ता दिल्यास सुरक्षितता राहणार नाही.