ओबीसी जनमोर्चाची आज ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 18, 2023 13:09 IST2023-09-18T13:09:27+5:302023-09-18T13:09:27+5:30
मराठा समाजाची आरक्षणासाठी राज्यभर आंदोलने सुरु आहेत. त्यांना ओबीसीतूनच आरक्षण हवे आहे.

ओबीसी जनमोर्चाची आज ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने
ठाणे- मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण हवे आहे. या मागणीला विरोध करण्यासाठी तसेच राज्यात जातनिहाय जनगणना झालीच पाहिजे, या मागणीसाठी ओबीसी जनमोर्चाने सोमवार, दि. 18 सप्टेंबर रोजी ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने आंदोलन करण्यात आले.
मराठा समाजाची आरक्षणासाठी राज्यभर आंदोलने सुरु आहेत. त्यांना ओबीसीतूनच आरक्षण हवे आहे. ओबीसी समाजाच्या ताटात मुळातच चतकोर भाकरी आहे. तेही आरक्षण हिरावले जात आहे. ओबीसी समाजाचे आरक्षण वाचवले पाहिजे तसेच राज्यात जातनिहाय जनगणना झालीच पाहिजे, या मागण्यांसाठी ओबीसी जनमोर्चाच्यावतीने ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर तीव्र निदर्शने करण्यात आली.
ठाणे- मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण हवे आहे. या मागणीला विरोध करण्यासाठी तसेच राज्यात जातनिहाय जनगणना झालीच पाहिजे, या मागणीसाठी ओबीसी जनमोर्चाने आज ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने आंदोलन करण्यात आले. (व्हिडिओ- विशाल हळदे, लोकमत) pic.twitter.com/LdDx6bdxNp
— Lokmat (@lokmat) September 18, 2023