शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

राज्यमंत्री खोतकरांच्या वक्तव्यावर दानवेंचे मौन

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 4, 2019 06:56 IST

शिवसेनेचे राज्यमंत्री अर्जुन खोतकर यांनी युती झाली तरी जालनामध्ये दानवे यांच्याविरोधात अपक्ष निवडणुक लढविन या त्यांनी केलेल्या वक्तव्यावर खासदार आणि भाजपाचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे मौन बाळगले.

डोंबिवली  - शिवसेनेचे राज्यमंत्री अर्जुन खोतकर यांनी युती झाली तरी जालनामध्ये दानवे यांच्याविरोधात अपक्ष निवडणुक लढविन या त्यांनी केलेल्या वक्तव्यावर खासदार आणि भाजपाचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे मौन बाळगले. रविवारी दानवे यांनी डोंबिवलीत पुर्वेकडील स वा जोशी विद्यालयाच्या पटांगणावर पार पडलेल्या असंघटीत व नाका कामगारांच्या महाराष्ट्र जनरल मजदूर संघटनेच्या सहाव्या वर्धापनदिनाच्या सोहळयाला उपस्थिती लावली होती. यावेळी पत्रकारांनी खोतकरांच्या विचारलेल्या मुद्यावर दानवे यांनी चुप्पी साधणे पसंत केले. यावेळी ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांच्या सुरू असलेल्या उपोषणाबाबत दानवे यांना विचारणा केली असता अण्णांचा आम्ही नेहमीच सन्मान करतो. त्यांची समजूत काढली जाईल असे ते म्हणाले.नवाब मलिकांनी अण्णांवर जे आरोप केले त्याबाबत मात्र दानवेंनी राष्ट्रवादीच्या भुमिकेवर टिका केली. अण्णांची आंदोलन केवळ आमच्याच सरकारच्या कालावधीत सुरू नाहीत तर काँग्रेसच्या सरकारमध्येही झाली. अण्णा हे जनतेचे प्रश्न मांडत असतात असे स्पष्ट करीत दानवेंनी अण्णांचे कौतुकच केले.वर्धापनदिनाच्या निमित्ताने दानवे यांनी केलेल्या भाषणात नाका कामगारांसाठीच्या योजनांबाबतची माहीती उपस्थितांना दिली. तर हे सुटाबुटातले काँग्रेसचे सरकार नाही तर तळागाळातील लोकांसाठी झटणारे माझे सरकार आहे असे म्हणत काँग्रेस सरकारच्या कार्यपध्दतीवर टिका केली. यावेळी राज्यमंत्री चव्हाण यांनी असंघटीत कामगारांनी कामगार आयुक्त कार्यालयात नोंदणी करण्याचे आवाहन केले.

टॅग्स :raosaheb danveरावसाहेब दानवेBJPभाजपा