एमसीएचे केंद्र बदलापूरमध्ये सुरू करण्याची मागणी
By Admin | Updated: November 12, 2016 06:26 IST2016-11-12T06:26:45+5:302016-11-12T06:26:45+5:30
मुंबई क्रिकेट असोसिएशन अर्थात एमसीएचे केंद्र बदलापुरात सुरू करावे. या माध्यमातून बदलापूर शहरात भव्य सुसज्ज असे क्र ीडांगण निर्माण करण्यात यावे,

एमसीएचे केंद्र बदलापूरमध्ये सुरू करण्याची मागणी
बदलापूर : मुंबई क्रिकेट असोसिएशन अर्थात एमसीएचे केंद्र बदलापुरात सुरू करावे. या माध्यमातून बदलापूर शहरात भव्य सुसज्ज असे क्र ीडांगण निर्माण करण्यात यावे, अशी मागणी राष्ट्रवादीचे गटनेते आणि स्टार क्रिकेट क्लबचे प्रतिनिधी आशीष दामले यांनी एमसीएचे अध्यक्ष शरद पवार यांच्याकडे केली आहे. शरद पवार यांनीही या मागणीचा सकारात्मक दृष्टीने विचार करण्याचे आश्वासन दिले आहे.
मुंबई येथे एमसीएची सर्वसाधारण सभा झाली. या सभेच्या वेळी अध्यक्ष शरद पवार यांची प्रत्यक्ष भेट घेऊन निवेदनाद्वारे ही मागणी दामले यांनी केली आहे. ठाण्याच्या पलीकडे कर्जतपर्यंत मोठे आणि सुसज्ज असे क्रीडांगण नाही. या पट्ट्यात क्रि केट खेळणारे असंख्य खेळाडू आहेत. अशा सर्व उमद्या खेळाडूंसाठी जर बदलापूर शहरात एमसीएच्या मार्गदर्शनाखाली एक केंद्र सुरू केले, तर या परिसरातील उगवत्या खेळाडूंना चांगले प्रशिक्षण मिळून दर्जेदार खेळाडू तयार होतील, अशी अपेक्षा दामले यांनी व्यक्त केली आहे.
बदलापूर शहरात आंतरराष्ट्रीय दर्जाचे क्रीडांगण निर्माण करणे, ही काळाची गरज आहे. ही मागणी आजची नाही, तर विलासराव देशमुख हे एमसीएचे अध्यक्ष असताना त्यांच्याकडेसुद्धा ही मागणी केलेली होती. त्यांनीही ती तत्त्वत: मान्य केल्याचे दामले यांनी पवारांच्या निदर्शनास आणून दिले आहे. बदलापूर शहरात क्रि केटचा सराव करणाऱ्या संघटना आणि खेळाडू आहेत. शहरात अशा क्र ीडांगणासाठी जागा उपलब्ध असल्याने या मागणीचा विचार करण्याची आग्रही मागणी आपण केली असून शरद पवार यांनीदेखील या मागणीचा सकारात्मक विचार करण्याचे आश्वासन दिल्याचे दामले यांनी सांगितले. (प्रतिनिधी)