विसर्जनासाठी बळजबरीने पैशांची मागणी

By Admin | Updated: September 13, 2016 02:12 IST2016-09-13T02:12:15+5:302016-09-13T02:12:15+5:30

गणेश विसर्जनासाठी कोट्यवधी रुपये खर्चून सर्व प्रकारची व्यवस्था केली जात असल्याचा दावा मीरा-भार्इंदर महापालिकेकडून केला जात आहे

The demand for money for immersion | विसर्जनासाठी बळजबरीने पैशांची मागणी

विसर्जनासाठी बळजबरीने पैशांची मागणी

मीरा रोड : गणेश विसर्जनासाठी कोट्यवधी रुपये खर्चून सर्व प्रकारची व्यवस्था केली जात असल्याचा दावा मीरा-भार्इंदर महापालिकेकडून केला जात आहे. मात्र, अनेक ठिकाणी गणेशभक्तांकडून मूर्ती विसर्जनासाठी बळजबरीने पैसे उकळले जात आहेत. या प्रकारामुळे संताप व्यक्त होत आहे.
मीरा-भार्इंदर महापालिकेने २२ ठिकाणी गणेश विसर्जनाची व्यवस्था केली आहे. त्यात १६ तलावांसह खाडी, समुद्र व नदीकिनाऱ्यांचा समावेश आहे. महापालिकेने तेथे विद्युत रोषणाई, मंडप, रस्ते, क्रेन, बोटी तसेच आरतीसाठी टेबलांची व्यवस्था केली आहे. त्यासाठी एक कोटी रुपयांपेक्षा जास्त खर्च पालिका करत असते. नगरसेवक व पदाधिकारी यांच्यासाठी स्वतंत्र स्टेज उभारले जातात. तसेच महापालिकेच्या बांधकाम, आरोग्य विभाग व अग्निशमन दलाचे अधिकारी, कर्मचारी तैनात केले जातात.
मीरा-भार्इंदर शहरांत १७ हजार लहानमोठ्या मूर्तींचे विसर्जन होते. तलाव, खाडी येथे विसर्जनासाठी बोटींवर तसेच पाण्यात उतरणारे पट्टीचे पोहणारे लागतात. यात पालिकेचे कंत्राटी सफाई कर्मचारी असले तरी मोठ्या संख्येने विसर्जनासाठी अनुभवी व पोहणाऱ्या तरुणांची उणीव भासते. (प्रतिनिधी)

Web Title: The demand for money for immersion

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.