नुकसान भरपाई देण्याची मागणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 3, 2021 04:37 IST2021-04-03T04:37:29+5:302021-04-03T04:37:29+5:30

भिवंडी : भिवंडी तालुक्यातील पडघा वडवली येथील शेतकरी रवींद्र वारघडे यांच्या शेतावर असलेले शेतघर पाच दिवसांपूर्वी शॉर्टसर्किटमुळे आग लागून ...

Demand for compensation | नुकसान भरपाई देण्याची मागणी

नुकसान भरपाई देण्याची मागणी

भिवंडी : भिवंडी तालुक्यातील पडघा वडवली येथील शेतकरी रवींद्र वारघडे यांच्या शेतावर असलेले शेतघर पाच दिवसांपूर्वी शॉर्टसर्किटमुळे आग लागून मोठे नुकसान झाले आहे. शेतघरात शेतीसाठी आवश्यक असणारी उपकरणे व एक पाण्याची मोटार खाक झाली. वारघडे हे टोरंट कंपनीकडे नवीन मीटर मिळावे यासाठी मागणी करत होते. मात्र कोणीही लक्ष दिले नसल्याने अखेर शॉर्टसर्किटने आग लागून शेतघर जळाल्याचा आरोप केला आहे. घराबरोबरच पिके करपल्याचा मानसिक धक्का वारघडे यांना बसला असल्याने त्यांना रुग्णालयात दाखल केले आहे. त्यांची प्रकृती गंभीर असून त्यांना टोरंट कंपनीकडून नुकसान भरपाई मिळावी अशी मागणी वडवलीच्या सरपंच करुणा वारघडे यांनी केली आहे. शुक्रवारी दुपारी टोरंट कंपनीचे कर्मचारी व अधिकारी यांनी घटनास्थळाची पाहणी करून पंचनामा केला आहे.

Web Title: Demand for compensation

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.