शहरं
Join us  
Trending Stories
1
Priyanka Chaturvedi : "जवानांच्या रक्तापेक्षा पैसा महत्त्वाचा..."; भारत-पाकिस्तान मॅचवरून प्रियंका चतुर्वेदींचा हल्लाबोल
2
राज्यमंत्री मेघना बोर्डीकर पुन्हा वादात; भर सभेत ग्रामसेवकाला कानाखाली मारण्याची भाषा
3
पायी जाणाऱ्या दोघांना भरधाव कारने उडविले, दोघांचा जागीच मृत्यू; छत्रपती संभाजीनगरमधील घटना
4
भारतासोबत वाद ओढवून घेणे मोठी चूक, मोदी...; हात पोळलेल्या कॅनडाच्या बिझनेसमनचा ट्रम्पना इशारा...
5
खुशखबर! रक्षाबंधनपूर्वी RBI देणार मोठी भेट? कर्ज घेणाऱ्यांना दिलासा, तुमचा EMI होणार स्वस्त?
6
Ankita Lokhande : "ते आमच्या घराचा..."; अंकिता लोखंडेच्या हाऊस हेल्परची मुलगी बेपत्ता, पोलिसांत केली तक्रार
7
केंद्रीय मंत्री नितीन गडकरींचे नागपुरातील घर उडविण्याची धमकी, निनावी कॉलने सुरक्षायंत्रणांची धावपळ
8
सामाजिक न्याय विभागाचे ४१० कोटी लाडक्या बहिणींसाठी वळते : खोब्रागडे
9
मिड-डे मील भटक्या कुत्र्याने उष्टावले; तसेच मुलांना दिले, ७८ विद्यार्थ्यांना अँटी रेबिज लस टोचावी लागली...
10
हवामान विभागाची मोठी भविष्यवाणी! शेतकऱ्यांनो, सावधान... महाराष्ट्रात पुढील १५ दिवस पाऊस...
11
बलात्कार टाळायचा असेल तर घरीच थांबा; अहमदाबादमध्ये पोस्टर्सने वाद; पोलिसांच्या सूचनेमुळे नागरिकांमध्ये संताप
12
कमाल झाली..! कुणाच्या स्वप्नातही नाही आली; ती गोष्ट टीम इंडियातील या तिघांनी सत्यात उतरवली
13
मालेगाव २००८; बॉम्बस्फोटातील तपासात एटीएस आणि एनआयएचा विरोधाभास 
14
सात महिन्यांत अक्षय कुमारने ११० कोटींची मालमत्ता विकली, कुठे किती रुपयांना केली विक्री? जाणून घ्या
15
महिलांसाठी मोठी संधी! LIC ची नवी योजना, फक्त ‘हे’ काम करा आणि दरमहा ७,००० रुपये कमवा!
16
भारतीय शेतकरी चुकून गेला पाकिस्तानात; न्यायालयाने सुनावली तुरुंगवासाची शिक्षा, वडील म्हणतात....
17
सरकारचा पैसा आहे, आपल्या बापाचं काय जातंय? संजय शिरसाटांचे विधान; सुप्रिया सुळे म्हणाल्या, "इशारा देऊन पण..."
18
कुलगाममध्ये तिसऱ्या दिवशीही चकमक सुरू; आतापर्यंत तीन दहशतवादी ठार, या वर्षातील सर्वात मोठी कारवाई
19
पनवेलमध्ये राडा झाला...! राज ठाकरेंच्या इशाऱ्यानंतर पनवेलमधील लेडीज बारवर मनसेचा हल्ला 
20
भारतीय निवडणूक प्रणाली मृत, निवडणुकीत घोटाळे! विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांचा निवडणूक आयोगावर पुन्हा हल्लाबोल

माजी सरपंचाने विविध योजनासाठी केली शासनाची फसवणूक जिल्हाधिका-याकडे कारवाईची मागणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 23, 2018 23:22 IST

भिवंडी : तालुक्यातील ग्रुप ग्रामपंचायत सुपेगाव मधील माजी सरपंच रोहिदास रामचंद्र मढवी व सदस्य रोहिणी रोहिदास मढवी या दाम्पत्यांनी सरकारी योजनेचा लाभ घेण्यासाठी चुकीची कागदपत्रे सादर करून शासनाची फसवणूक केल्याप्रकरणी त्यांच्यावर दंडात्मक कारवाई करण्याची मागणी ग्रामपंचायत सदस्य अशोक लक्ष्मण राऊत यांनी जिल्हाधिका-यांकडे लेखी पत्राव्दारे केली आहे.शासनाच्या शहापूर येथील आदिवासी विकास ...

ठळक मुद्देआदिवासींच्या सामुहिक विवाहामध्ये कन्यादान योजनेच्या लाभासाठी भाऊ-बहिणीचा दोनदा विवाहयोजनेच्या लाभासाठी दुस-यांदा लग्नाचा फार्ससुपेगाव तत्कालिन सरपंचाच्या भ्रष्ट कामांत सदस्य बहिणीचा सहभाग

भिवंडी : तालुक्यातील ग्रुप ग्रामपंचायत सुपेगाव मधील माजी सरपंच रोहिदास रामचंद्र मढवी व सदस्य रोहिणी रोहिदास मढवी या दाम्पत्यांनी सरकारी योजनेचा लाभ घेण्यासाठी चुकीची कागदपत्रे सादर करून शासनाची फसवणूक केल्याप्रकरणी त्यांच्यावर दंडात्मक कारवाई करण्याची मागणी ग्रामपंचायत सदस्य अशोक लक्ष्मण राऊत यांनी जिल्हाधिका-यांकडे लेखी पत्राव्दारे केली आहे.शासनाच्या शहापूर येथील आदिवासी विकास प्रकल्प कार्यालया मार्फत आदिवासींच्या सामुहिक विवाहामध्ये कन्यादान योजना राबविली जाते. सुपेगाव ग्रुप ग्रामपंचायतीचे माजी सरपंच रोहिदास रामचंद्र मढवी आणि ग्रामपंचायत सदस्या रोहिणी रोहिदास मढवी हे पतीपत्नी असुन यांचे लग्न ३ फेब्रुवारी २००४ मध्ये झाले आहे.त्यांच्या विवाहाची ही नोंद सुपेगाव ग्रामपंचायतीतील रजीस्टर मध्ये केली आहे.तसेच त्यांना कुमार नयन व कुमारी हर्षाली असे दोन आपत्य देखील आहेत. तरी देखील या दाम्पत्याने या कन्यादान योजनेचा लाभ घेण्यासाठी २१ मार्च २०१२मध्ये सामुहिक सोहळ्यात सहभागी होऊन याच दिवशी लग्न झाल्याचे कागदोपत्री सत्यप्रतिज्ञापत्र (अ‍ॅफिडेव्हीट) प्रकल्प अधिका-यांकडे सादर केले आणि या योजनेमार्फत मिळणारा आर्थिक लाभ घेतला. तसेच माजी सरपंच रोहिदास मढवी यांची बहिण तथा माजी ग्रामपंचायत सदस्या कलावती रामचंद्र मढवी यांचे लग्न पुंडासच्या स्वप्नील गोपाळ भाईर यांच्या बरोबर २००७ मध्ये झाला.त्याची नोंद सुपेगाव ग्रामपंचायत रजीस्टरमध्ये आॅक्टोबर २०११ मध्ये करण्यात आली आहे. तसेच त्यांनी १८ मे २०१२ रोजी सामुहिक सोहळ्यात सहभागी होऊन या दिवशी लग्न झाल्याचे प्रतिज्ञापत्र (अ‍ॅफिडेव्हीट) कन्यादान योजनेचा आर्थिक लाभ मिळण्यासाठी शहापूर प्रकल्प अधिका-यांकडे सादर करून लाभ घेतला आहे. या प्रकरणाची गंभीरपणे दखल घेऊन या दाम्पत्यांनी सत्यप्रतिज्ञापत्रात लिहून दिल्याप्रमाणे दंडनीय कारवाई करावी,अशी लेखी मागणी अशोक राऊत यांनी जिल्हाधिका-यांकडे केली आहे.त्याचप्रमाणे हे सामुहिक कुटूंब असुन त्यांची शिधापत्रीका एकत्र आहे. असे असताना शासनाच्या स्वच्छ भारत मिशन ग्रामिण योजनेंतर्गत वैयक्तीक शौचालयासाठी तत्कालीन सरपंच रोहिदास रामचंद्र मढवी याने कागदपत्रे रंगविली. तसेच सरपंच पदाचा गैरफायदा घेऊन खोटी कागदपत्रे सादर करून शासनाची फसवणूक करून शासनाचा निधी हडप केला,असा आरोप देखील अशोक राऊत यांनी जिल्हाधिकाºयांकडे केलेल्या आपल्या पत्रात केला आहे.या घटनेने परिसरांत खळबळ माजली असुन जिल्हाधिका-यांकडून होणा-या कारवाईकडे ग्रामस्थांचे लक्ष लागले आहे.

टॅग्स :Bhiwandiभिवंडीcrimeगुन्हे