शहरं
Join us  
Trending Stories
1
"प्रेक्षकांचा आवडता संघ नेहमी जिंकेलच असं नाही पण लोकशाहीत...", सचिनचं मतदारांना आवाहन
2
Video: धोनी मॅच संपल्यावर RCBच्या खेळाडूंशी जे वागला, त्यावर विश्वासच बसेना! नेटकऱ्यांनीही केली टीका
3
शेतातील ५० लाख झाडांवर कुऱ्हाड! अधिक पिकांसाठी जमीन हवी म्हणून तोडली झाडे - अहवाल 
4
तुमको मिरची लगी तो मैं क्या करू? ठाण्यासाठी ‘करो या मरो’च्या लढाईला सिद्ध व्हा - देवेंद्र फडणवीस 
5
१% ते १००% पर्यंतचा प्रवास! RCB ची गाडी सुस्साट; ५ खेळाडूंमुळे मिळाले प्ले ऑफचे तिकीट
6
नाशिकमध्ये निवडणुकीत कोणाला पाठिंबा देणार? मनोज जरांगे पाटलांनी स्पष्टच सांगितलं
7
नातू प्रज्वल रेवण्णावरील आरोपांवर माजी पंतप्रधान देवेगौडा यांनी मौन सोडले; म्हणाले, दोषी आढळला तर...
8
नॅचरल आईस्क्रीमचे संस्थापक रघुनंदन श्रीनिवास कामथ यांचे निधन; वयाच्या ७० व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास 
9
ते कुणालाच नको होते; एकनाथ शिंदेंच्या मुख्यमंत्रीपदाबाबत संजय राऊत यांचा नवा दावा
10
MS Dhoniचा मैदानाबाहेर मारलेला षटकार ठरला CSKच्या पराभवाचे कारण? RCBला मॅच जिंकण्यासाठी झाली मदत
11
पुण्यात आलिशान पोर्शे कारने दोघांना चिरडले; तरुण-तरुणी जागीच ठार
12
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते प्रतापराव भोसले यांचे निधन
13
४० कोटींची रोकड सापडली, मोजणी अजूनही पूर्ण नाही... बुटांच्या व्यापाऱ्यांची अफाट संपत्ती
14
राष्ट्रवादीकडे त्यावेळी मुख्यमंत्रीपदासाठी योग्य उमेदवार नव्हता; शरद पवारांनी सगळंच सांगितलं
15
भाजप आरएसएसला संपवायला निघालाय, उद्धव ठाकरे यांचा मुंबईत संयुक्त पत्रकार परिषदेत आरोप
16
मतदानाची टक्केवारी अचानक कशी वाढते? निवडणूक आयोगाने स्पष्ट केली बाजू
17
'छगन भुजबळांना मुख्यमंत्रिपद दिले असते तर पक्ष...'; शरद पवारांचा मोठा गौप्यस्फोट
18
पतंजलीची सोन पापडी गुणवत्ता चाचणीत फेल, सहाय्यक व्यवस्थापकासह तिघांवर कारवाई
19
आनंदवार्ता : यंदा धो-धो बरसणार; मान्सून आज अंदमानात तर ३१ मे रोजी केरळात धडकणार
20
गॅसच्या टँकरचा भीषण स्फोट, आगीत घरे व वाहने भक्ष्यस्थानी; शेलपिंपळगावातील घटना

पालिकेच्या निधीची नासाडी झाल्याने त्या बद्दल कारवाईची मागणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 23, 2018 11:42 PM

भाजपाचे पालिका निवडणुकीतील उमेदवार तथा माजी नगरसेवकाच्या पालिका नगरसेवक निधी मधुन बांधलेले सार्वजनिक वाचनालय भाजपाच्याच प्रभाग समिती सभापतीने तक्रार

मीरारोड - भाजपाचे पालिका निवडणुकीतील उमेदवार तथा माजी नगरसेवकाच्या पालिका नगरसेवक निधी मधुन बांधलेले सार्वजनिक वाचनालय भाजपाच्याच प्रभाग समिती सभापतीने तक्रार करुन तोडालया लावल्याचा प्रकार भार्इंदर पुर्व भागात घडलाय.  या मुळे भाजपातील अंतर्गत वाद चव्हाट्यावर आला असुन पदाचा वापर आपले राजकिय उट्टे काढण्यासाठी केले जात असल्याची चर्चा रंगली आहे. तर पालिकेच्या निधीची नासाडी झाल्याने त्या बद्दल कारवाईची मागणी होत आहे.  आॅगस्ट मध्ये झालेल्या पालिका निवडणुकीत भार्इंदर पुर्वेच्या प्रभाग ३ मधुन भाजपाचे गणेश शेट्टी हे निवडुन आले आहेत. याच प्रभागातुन भाजपाचे अन्य उमेदवार हंसुकुमार पांडेय, मनिषा पिसाळ आदी पराभुत झाले. तर सेनेचे दिनेश नलावडे, निलम ढवण व अर्चना कदम विजयी झाले. हंसुकुमार पांडेय हे पुर्वी काँग्रेसचे नगरसेवक होते. पालिका निवडणुकी आधी त्यांनी भाजपात प्रवेश केला होता. तर शेट्टी हे पुर्वी मनसेच्या तिकीटावर निवडुन आले होते. नंतर राष्ट्रवादी असा प्रवास करत ते देखील भाजपात डेरेदाखल झाले. पांडे व शेट्टी हे एकाच परिसरातील असल्याने दोघां मध्ये फारसं जमत नाही. नुकत्याच झालेल्या पालिका निवडणुकीत देखील पांडे यांना त्याचा फटका बसला व ते पराभूत झाले. नगरसेवक असताना पांडे यांनी २०१३-१४ च्या आपल्या नगरसेवक निधी मधुन प्रभागात दोन लाखाच्या खर्चातुन तीन ठिकाणी सार्वजनिक वाचनालयं बांधली होती. त्यातील स्वामी विवेकानंद मार्गावरील निर्मल पार्क येथे एक वाचनालय बांधले होते. सदर वाचनालया वर नियमीत पणे वृत्तपत्रं वाचण्यासाठी उपलबध्द केली जात होती. ज्येष्ठ नागरीक आवर्जुन वर्तमानपत्र वाचत बसत. परंतु सदर वाचनालयाची तक्रार प्रभाग समिती सभापती बनलेल्या भाजपाच्याच गणेश शेट्टी यांनी पालिके कडे केली होती.  शेट्टी यांच्या तक्रारी नंतर प्रभाग समिती ३ मधील पालिका पथकाने पांडे यांचे नगरसेवक निधीतुन बांधलेले वाचनालय काढुन टाकले.  सदर बाब हंसुकुमार पांडे यांना कळताच ते संतप्त झाले. त्यांनी या प्रकरणी थेट आमदार नरेंद्र मेहतां कडे तक्रार करत नाराजी व्यक्त केली. पांडे मात्र संतप्त झाले असुन पालिका निधीतुन झालेले वाचनालय काढलेच कसे ? असा सवाल त्यांनी केलाय. पालिकेने काढलेले वाचनालय उड्डाणपुला खाली अन्य भंगारात टाकण्यात आले आहे. एकीकडे परिसरात लॉज, बार व अन्य बांधकामां विरुध्द ठोस कारवाई ची गरज असताना त्याऐवजी शेट्टी यांनी आपल्याच पक्षाच्या हंसुकुमार पांडे यांचे पालिका निधीतले वाचनालय तोडायला लावल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे.