कळवा स्थानकात महिलेची प्रसूती
By Admin | Updated: March 26, 2017 04:37 IST2017-03-26T04:37:40+5:302017-03-26T04:37:40+5:30
रुग्णालयात प्रसूतीसाठी चाललेल्या मुंब्य्रामधील एका महिलेने कळवा रेल्वे स्थानकातील फलाट क्रमांक-२ वर शुक्रवारी एका

कळवा स्थानकात महिलेची प्रसूती
ठाणे : रुग्णालयात प्रसूतीसाठी चाललेल्या मुंब्य्रामधील एका महिलेने कळवा रेल्वे स्थानकातील फलाट क्रमांक-२ वर शुक्रवारी एका बाळाला जन्म दिला. बाळ व बाळंतीण सुखरूप असून त्यांना कळवा रुग्णालयात दाखल केले आहे.
रेखा निशाद यांच्या पोटात दुखू लागल्याने पती व नातेवाईक त्यांना शुक्रवारी कळवा रुग्णालयात नेत होते. मुंब्य्राहून त्यांनी लोकल पकडली. त्या कळवा स्थानकात उतरताच त्यांना प्रसूतीच्या वेदना वाढू लागल्याने त्यांना त्रास होऊ लागला. याचदरम्यान, स्थानकातील महिला बुकिंग क्लार्क, महिला पोलीस, होमगार्ड यांनी धाव घेत त्यांची प्रसूती केली. रेखा यांनी मुलाला जन्म दिला आहे. (प्रतिनिधी)
एका महिलेला स्थानकात प्रसूतीच्या वेदना होत असल्याचे हेल्पलाइनवरून सांगण्यात आले. त्यानुसार, स्थानकातील महिलांनी तेथे धाव घेतली. स्थानिक व वृद्ध महिलांनी गरोदर महिलेची प्रसूती केली.
- पिंकी सोहल,बुकिंग हेडक्लार्क, कळवा स्थानक