शहरं
Join us  
Trending Stories
1
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
2
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
3
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
4
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
5
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
6
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
7
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
8
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
9
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
10
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
11
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
12
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
13
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
14
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
15
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
16
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
17
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
18
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
19
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
Daily Top 2Weekly Top 5

अपहरण केलेल्या दोन मुलींसह तिघांची सुटका, लग्नाचे आमिष दाखवून केली दिशाभूल

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 8, 2017 23:47 IST

अल्पवयीन मुलींना लग्नाचे आमिष दाखवून त्यांच्यासह तिघांचे अपहरण करणा-या दोघांना ठाणे गुन्हे अन्वेषण विभागाच्या युनिट-१ ने पनवेल (नवी मुंबई) मधून अटक केली आहे.

ठाणे : अल्पवयीन मुलींना लग्नाचे आमिष दाखवून त्यांच्यासह तिघांचे अपहरण करणा-या दोघांना ठाणे गुन्हे अन्वेषण विभागाच्या युनिट-१ ने पनवेल (नवी मुंबई) मधून अटक केली आहे. या तिन्ही मुलांना तसेच त्यांचे अपहरण करणाºया दोघांना अशा पाच जणांना बुधवारी उत्तर प्रदेश पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे.उत्तर प्रदेशातील गोरखपूर येथून दोन अल्पवयीन मुली आणि तीन मुलांचे अपहरण झाल्याचा गुन्हा ३१ आॅक्टोबर २०१७ रोजी दाखल झाला. ही मुले मुंबई परिसरात असल्याची माहिती कैम्पियरगंज (उत्तर प्रदेश) पोलीस ठाण्याचे उपनिरीक्षक मृत्युंजयकुमार पांडेय यांना मिळाली होती. याच माहितीच्या आधारे त्यांनी ठाण्याचे पोलीस आयुक्त परमवीर सिंग यांच्याकडे या अपहरण प्रकरणात मदतीची मागणी केली. त्यानुसार, गुन्हे अन्वेषण विभागाच्या युनिट-१ चे वरिष्ठ पोलीस निरीक्षक नितीन ठाकरे यांच्या पथकाला ही मदत करण्याचे आदेश पोलीस उपायुक्त अभिषेक त्रिमुखे यांनी दिले होते. आपल्या खब-यांच्या आधारे तसेच मोबाइल टॉवरच्या माध्यमातून ही मुले पनवेल, नवी मुंबई आणि ठाणे परिसरातील बांधकाम साइटवर असल्याची माहिती ठाणे पोलिसांना मिळाली. ते पनवेलच्या कच्छी मोहल्ला भागात असल्याची पक्की माहिती मिळाल्यानंतर या मुलांना ८ नोव्हेंबर रोजी ठाणे पोलिसांनी ताब्यात घेतले.त्यांच्यापैकी प्रद्युम्न ऊर्फ विद्यासागर मोहनलाल निषाद (२१) हा गेल्या तीन वर्षांपासून पनवेल येथे सेंट्रिंगचे काम करत होता. तो अधूनमधून त्याच्या सोनौरा (जि. गोरखपूर, उत्तर प्रदेश) या गावी जात होता. त्याच काळात त्याचे एका अल्पवयीन मुलीशी प्रेमसंबंध जुळले. तसेच त्याचा मित्र अखिलेश जनार्दन निषाद (१९) याचेही त्याच गावातील अन्य एका अल्पवयीन मुलीशी प्रेमसंबंध होते. प्रद्युम्न आणि अखिलेश यांनी आपसात संगनमत करून या गावातील दोन मुली आणि त्यांच्यापैकी एका मुलीचा १६ वर्षांचा भाऊ यांना लग्न करण्याचे आमिष दाखवून ३१ आॅक्टोबर रोजी त्यांचे अपहरण करून त्यांना पनवेलच्या कच्छी मोहल्ला भागातील एका अर्धवट बांधकाम झालेल्या इमारतीमध्ये आणून ठेवले. त्यांना ताब्यात घेऊन पुढील तपासासाठी कैम्पियरगंजचे उपनिरीक्षक मृत्युंजयकुमार पांडेय आणि त्यांच्या पथकाच्या ताब्यात या पाचही मुलांना बुधवारी दिले.

टॅग्स :Crimeगुन्हा