स्विमिंग असोसिएशन ऑफ महाराष्ट्रच्या अध्यक्षपदी दीपक मेजारी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 21, 2021 04:39 IST2021-03-21T04:39:52+5:302021-03-21T04:39:52+5:30
डोंबिवली : स्वीमिंग फेडरेशन ऑफ इंडिया आणि महाराष्ट्र ऑलिम्पिक असोसिएशन मान्यताप्राप्त संस्था असलेल्या स्वीमिंग असोसिएशन ऑफ महाराष्ट्राच्या अध्यक्षपदी ...

स्विमिंग असोसिएशन ऑफ महाराष्ट्रच्या अध्यक्षपदी दीपक मेजारी
डोंबिवली : स्वीमिंग फेडरेशन ऑफ इंडिया आणि महाराष्ट्र ऑलिम्पिक असोसिएशन मान्यताप्राप्त संस्था असलेल्या स्वीमिंग असोसिएशन ऑफ महाराष्ट्राच्या अध्यक्षपदी दीपक मेजारी यांची शनिवारी बहुमताने दोन वर्षांच्या कार्यकाळाकरता निवड करण्यात आली. पुण्यातील नीता तालवीलकर यांची सचिवपदी तर मुंबईतील किशोर शेट्टी यांची खजिनदार म्हणून निवड झाली आहे.
मेजारी यांनी व्यास यांच्याकडून अध्यक्षपदाची सूत्रे स्वीकारली. महाराष्ट्रात स्विमिंग अकादमी स्थापन करणार असल्याची घोषणा मेजारी यांनी केली. देशात केवळ बंगलोर आणि दिल्लीत अकादमी आहे. महाराष्ट्रात सुरु करण्यात येणाऱ्या अकादमी मार्फत स्विमिंग प्रशिक्षक आणि लाईफगार्ड प्रशिक्षण दिले जाईल ज्याद्वारे तरुणांना रोजगार उपलब्ध होईल. तसेच स्पर्धात्मक स्विमिंगला प्रोत्साहन मिळेल. दुर्लक्षित असलेल्या स्विमिंग डायव्हिंग, स्वीमिंग पोलो यासारख्या खेळाचे प्रशिक्षणही या माध्यमातून दिले जाणार असल्याचे मेजारी यांनी सांगितले.
------------------------
वाचली