संकल्प प्राथमिक आरोग्य केंद्राचे लोकार्पण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 21, 2021 04:26 IST2021-06-21T04:26:03+5:302021-06-21T04:26:03+5:30

प्रख्यात गायिका डॉक्टर सुमनताई माटे, आमदार किसन कथोरे, वामनराव गोळे व लीना वामन गोळे यांच्या प्रमुख उपस्थितीत हा लोकार्पण ...

Dedication of Sankalp Primary Health Center | संकल्प प्राथमिक आरोग्य केंद्राचे लोकार्पण

संकल्प प्राथमिक आरोग्य केंद्राचे लोकार्पण

प्रख्यात गायिका डॉक्टर सुमनताई माटे, आमदार किसन कथोरे, वामनराव गोळे व लीना वामन गोळे यांच्या प्रमुख उपस्थितीत हा लोकार्पण सोहळा कोरोनाच्या पार्श्वभूमीवर अत्यंत साधेपणाने करण्यात आले. काका गोळे फाउंडेशनचा हा अतिशय स्तुत्य उपक्रम असल्याचे गौरवोद्गार आमदार किसन कथोरे यांनी काढले. नागरिकांनी या संधीचा लाभ घेण्याचे आवाहन किसन कथोरे यांनी केले. बदलापूर शहरात काका गोळे फाउंडेशनचे मोठे कार्य आहे. सर्वसामान्य नागरिकांना परवडेल, अशी आरोग्यसेवा कुठेही मिळत नाही. ते देण्याचं काम काका गोळे फाउंडेशनच्या माध्यमातून आशिष गोळे आणि त्यांची टीम गेल्या अनेक वर्षांपासून करीत आहे. या सोहळ्यास भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष व गटनेते राजेंद्र घोरपडे, जिल्हा चिटणीस संभाजी शिंदे, माजी उपनगराध्यक्ष शरद तेली, माजी नगरसेवक किरण भोईर, विश्वनाथ पाटील, गौतम बचुटे आदी मान्यवर उपस्थित होते.

Web Title: Dedication of Sankalp Primary Health Center