शहरं
Join us  
Trending Stories
1
रिझर्व्ह बँकेचा 100, 200 रुपयांच्या नोटांबद्दल महत्त्वाचा निर्णय, सर्वसामान्यांना मिळणार दिलासा
2
परप्रांतीय प्रियकराच्या मदतीनं पतीचा काढला काटा; हत्येनंतर अपघाताचा रचला बनाव, पण...
3
‘पीओके’मधील दहशतवादी नेटवर्कवर भारत करणार प्रहार; उच्चस्तरीय विचारविनिमय सुरू; ४२ सक्रिय दहशतवादी तळ केंद्राच्या रडारवर
4
आजचे राशीभविष्य, २९ एप्रिल २०२५: सार्वजनिक क्षेत्रात मानहानी होण्याची शक्यता
5
तीन देशांत एकाच वेळी वीज गायब; सर्व काही थांबले; देशभरातील वाहतूक सिग्नलवर परिणाम
6
१६ पाकिस्तानी यूट्युब चॅनेलवर सरकारची बंदी; केंद्रीय गृहमंत्रालयाच्या शिफारशींनुसार बंदी
7
त्यांची जबाबदारी माझ्यावर होती, मी माफी कशी मागू, शब्द नाहीत; मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी दिली कबुली
8
नौदलाच्या ताफ्यात येणार फ्रान्सची २६ राफेल विमाने; ६४ हजार कोटींच्या खरेदी करारावर देशांच्या स्वाक्षऱ्या
9
गूढ कायम.. खरं, खोट्याचा होईना उलगडा; डॉ. वळसंगकरांच्या आत्महत्येला दहा दिवस ओलांडले
10
‘म्हाडा’चे ५ हजार घरांचे दिवाळी गिफ्ट; जुन्या इमारतीचाही पुनर्विकास होणार
11
१९ चाळींचा पुनर्विकास एमएमआरडीए करणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण निर्णय
12
‘लिव्ह इन’, उत्तराखंड आणि समान नागरी संहिता
13
बुलेट ट्रेन २०२८ अखेरीस मुंबईतून धावणार सुसाट, नवी मुंबई विमानतळ गेम चेंजर ; मुख्यमंत्री फडणवीस
14
मुलांचा ताबा देताना धर्म विचारात घेतला जाऊ शकत नाही : हायकोर्ट
15
कान टोचले, बरे झाले ! केंद्राने विशेष पत्रक काढून माध्यमांना काही मार्गदर्शक सूचना दिल्या
16
पाण्यासाठी भारत-पाक युद्ध पेटण्याची वेळ येऊन ठेपली ?
17
मोठमोठे रस्ते बांधत आहात, इकडे लाेकांचा जीव जाताेय; जखमींवर कॅशलेस उपचारांवरून सर्वाेच्च न्यायालयाने केंद्राला फटकारले
18
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!

ठाणे शहर पोलिसांच्या नव्या संकेतस्थळाचे लोकार्पण

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 12, 2021 00:15 IST

अंध व्यक्तींनाही स्क्रीम रिडर या सॉफ्टवेअरच्या मदतीने हे संकेतस्थळ सहजपणे हाताळता येणार आहे. हरविले आणि सापडले या अंतर्गत अगदी टॅबवरुनही अति महत्वाच्या वस्तू हरविल्याची आणि सापडल्याची माहितीही पोलिसांना घरबसल्या तात्काळ देता येणार आहे.

ठळक मुद्दे इंग्रजीबरोबर मराठी भाषेतही माहितीअंध व्यक्तींनाही हाताळता येणार

लोकमत न्यूज नेटवर्कठाणे: एखादी तक्रार करण्यासाठी थेट पोलीस ठाण्यात जाण्याऐवजी अगदी घरबसल्याही आता मोबाईलद्वारे ठाणेपोलिसांच्या नविन संकेतस्थळावरुन तक्रार करता येणार आहे. इंग्रजी बरोबरच मराठीचाही वापर असलेल्या अद्ययावत अशा ठाणे शहर पोलिसांच्या नविन संकेतस्थळाचे लोकार्पण पोलीस उपायुक्त लक्ष्मीकांत पाटील यांनी नुकतेच केले आहे.डब्ल्यू डब्ल्यू डॉट ठाणेपोलीस डॉट जीओव्ही डॉट इन हे संकेतस्थळ आधुनिक तंत्रज्ञान वापरुन तयार केले आहे. ते मोबाईल, टॅब, आयपॅडसारख्या उपकरणांमध्येही सहजपणे चालू करता येणार आहे. यामध्ये सायबर सुरक्षेवर विशेष भर दिलेला आहे. यामध्ये माहितीचा अधिकार, पोलीस भरतीविषयक माहिती, पोलीस विभागांच्या विविध उपक्रमांच्या माहितीचाही त्यामध्ये समावेश आहे. या संकेतस्थळाद्वारे नागरिकांना तक्रार, गोपनीय माहिती देण्याचीही सुविधा उपलब्ध केल्याची माहिती सूत्रांनी दिली. याशिवाय, यामध्ये सिटीजन अलर्ट वॉलवर पोलिसांनी टाकलेली माहितीही नागरिकांना सहज पाहता येणार आहे. नव्या वेबसाईटवर ठाणे शहर पोलीस आयुक्तालयाचे वरिष्ठ पोलीस अधिकारी, कार्यालय तसेच पोलीस ठाण्यांच्या संपर्क क्रमांकासह जवळच्या पोलीस ठाण्याची माहितीही तात्काळ उपलब्ध होणार आहे.* अंध व्यक्तींनाही स्क्रीम रिडर या सॉफ्टवेअरच्या मदतीने हे संकेतस्थळ सहजपणे हाताळता येणार आहे. हरविले आणि सापडले या अंतर्गत अगदी टॅबवरुनही अति महत्वाच्या वस्तू हरविल्याची आणि सापडल्याची माहितीही पोलिसांना घरबसल्या तात्काळ देता येणार आहे.‘‘ ठाणे शहर पोलिसांच्या या वेबसाईटवर आवश्यक अशी सर्व सुविधा उपलब्ध करुन देण्यासाठी ही नूतणीकरण केलेली वेबसाईट निश्चितच उपयोगी ठरणार आहे. त्यामुळे नागरिकांनी पोलीस संबंधी कामकाजासाठी या संकेतस्थळाचा वापर करावा.’’लक्ष्मीकांत पाटील, पोलीस उपायुक्त, गुन्हे अन्वेषण विभाग, ठाणे शहर

टॅग्स :thaneठाणेPoliceपोलिस