भिवंडीतील कुकसे परिसरातील विकासकामांचे लोकार्पण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 7, 2021 04:49 IST2021-07-07T04:49:54+5:302021-07-07T04:49:54+5:30

भिवंडी : तालुक्यातील कुरुंद पं.स. गणातील विद्यमान सदस्य एकनाथ पाटील यांच्या सेस फंड व त्यांच्या प्रयत्नातून कुकसे परिसरात सुमारे ...

Dedication of development works in Kukse area of Bhiwandi | भिवंडीतील कुकसे परिसरातील विकासकामांचे लोकार्पण

भिवंडीतील कुकसे परिसरातील विकासकामांचे लोकार्पण

भिवंडी : तालुक्यातील कुरुंद पं.स. गणातील विद्यमान सदस्य एकनाथ पाटील यांच्या सेस फंड व त्यांच्या प्रयत्नातून कुकसे परिसरात सुमारे २५ लाख खर्चून विविध विकासकामांचे लोकार्पण आमदार शांताराम मोरे यांच्या उपस्थितीत सोमवारी पार पडले. शासकीय अधिकाऱ्यांच्या सतत संपर्कात राहून विकासकामांचा पाठपुरावा केला पाहिजे, असा सल्ला यावेळी आमदारांनी कार्यकर्त्यांना दिला.

हनुमान मंदिर व गणेश घाट येथील हायमास्ट दिवे, सापे, कुकसे, वाशेरे, भोईरगाव, जांभूळ पाडा, जाणवळ येथील मंदिरासमोर भाविकांना बसण्यासाठी लाकडी बाकडे, कुकसे येथे शौचालय सुविधा, ठक्कर बाप्पा योजनेतून कुकसे येथील स्मशानभूमीपर्यंत व आदिवासीवाडी येथे सिमेंट काँक्रिट रस्ता आदी सुमारे २५ लाखांची कामे पूर्ण करून त्यांचे लोकार्पण करण्यात आले आहे. यावेळी पं.स. सभापती विद्या थळे, सरपंच भरत पाटील, उपसरपंच नीलम भोईर, ग्रामपंचायत सदस्य तसेच शिवसेना विभागप्रमुख रघुनाथ पाटील, शाखाप्रमुख दिलीप पाटील, विलास पाटील, नरेश पाटील, मनोहर भोईर, मधुकर भोईर, बाळाराम सांबरे, अतिष माघे, साईनाथ पाटील, बाळाराम माळी आदींसह परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Web Title: Dedication of development works in Kukse area of Bhiwandi