शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताचा मोठा निर्णय! पाकिस्तानातील १६ युट्यूब चॅनेल्सवर घातली बंदी, बघा संपूर्ण यादी
2
आपल्याच लोकांनी विश्वासघात केला! पहलगाम हल्ल्यात १५ काश्मिरींची ओळख पटली
3
पंतगराव कदम यांच्या कन्या भारती लाड यांचे निधन; पुण्यात घेतला अखेरचा श्वास
4
"हिंदी ऑडिशन क्रॅक करता येत नाहीयेत...", आस्ताद काळेने सांगितला अनुभव; म्हणाला...
5
अजब प्रेम की गजब कहाणी! आधी लैंगिक अत्याचाराच्या गुन्ह्यात अडकवलं; नंतर त्याच्यासोबत लग्न केलं
6
'माझ्या मतदारसंघात येऊन मला शहाणपणा शिकवायची गरज नाही', योगेश कदम यांनी नितेश राणेंना सुनावलं
7
AI मुळे आयटी क्षेत्रातील नोकऱ्यांना किती धोका? TCS च्या जागतिक अधिकाऱ्याने स्पष्टच सांगितलं
8
"स्वतःच लोकांना मारता, तासभर एकही सैनिक तिथे गेला नाही"; आफ्रिदीने पहलगाम हल्ल्यासाठी सैन्याला धरले जबाबदार
9
Post Office च्या कमालीच्या पाच सेव्हिंग स्कीम्स; गुंतवणूक करा, मिळेल FD पेक्षा अधिक व्याज
10
पाकिस्तानला तुर्कीची रसद! बायरकतार ड्रोनसह सहा विमाने भरून शस्त्रास्त्रे कराचीला पोहोचली
11
Mumbai: BEST बसचे तिकीट दरात दुप्पटीने महागणार! साध्या आणि एससी बसच्या प्रवासासाठी किती पैसे मोजावे लागणार?
12
ऐकावे ते नवलच! एक व्यक्ती मृत असतानाही सोलापुरातील निवडणुकीत झाले १०० टक्के मतदान
13
"कपडे काढून बस अन्...", साजिद खानने अभिनेत्रीकडे केली होती विचित्र मागणी; म्हणाली...
14
"....नाहीतर मी मेलो असतो"; केदार शिंदेंच्या आयुष्यात स्वामी समर्थ कसे आले?
15
Astro Tips: अचूक उत्तर मिळण्यासाठी ज्योतिषांकडे एखादा प्रश्न घेऊन कधी जायला हवे? जाणून घ्या!
16
सुनील मित्तल यांच्यानंतर मुकेश अंबानीही पुढे आले; चीनच्या 'या' कंपनीच्या मागे का पडलेत हे दिग्गज?
17
दहशतवाद्यांचा, हल्ल्यांचा आकडा ! गेल्या ३२ वर्षांत २३,३८६ दहशतवादी मारले; ६४१३ जवान शहीद झाले
18
इलेक्ट्रिक दुचाकी वाहनांना आता ४० नाही तर फक्त ५ दिवसात मिळणार अनुदान; कसा करायचा अर्ज?
19
१ मेपासून बदलणार पैशांशी निगडीत हे नियम; खिशावर होणार थेट परिणाम
20
"माझा विनयभंग झाला असता", अभिनेत्रीने सांगितला धक्कादायक प्रसंग; धोनीला अवॉर्ड दिल्यानंतर...

तीन दिवसांत उभारलेल्या भाईंदरच्या ऑक्सिजन उत्पादन प्रकल्पाचे एकनाथ शिंदेंच्या हस्ते लोकार्पण 

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 18, 2021 13:59 IST

तीन दिवसात उभारलेल्या भाईंदरच्या ऑक्सिजन उत्पादन प्रकल्पाचे एकनाथ शिंदेंच्या हस्ते लोकार्पण 

मीरारोड - भाईंदर येथे भारतरत्न पंडित भीमसेन जोशी रुग्णालयात उभारण्यात आलेल्या ऑक्सिजन (Oxygen) उत्पादन करणाऱ्या प्रकल्पाचे लोकार्पण नगरविकासमंत्री तथा ठाणे जिल्हा पालकमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या हस्ते सोमवारी करण्यात आले. यावेळी रुग्णालयातील लहान मुलांसाठीच्या कोरोना उपचार वॉर्डची पाहणी करून उपाय योजनांचा आढावा शिंदे यांनी घेतला. 

ठाण्यातील पार्कींग प्लाझा कोविड केअर सेंटरमध्ये १० दिवसांत ऑक्सिजन उत्पादन प्रकल्प उभारणाऱ्या एअर सिप कंपनीने यावेळी भाईंदरमध्ये अवघ्या तीन दिवसांत हा प्रकल्प उभारला आहे. ह्या प्रकल्पातून दररोज १७५ जंबो सिलेंडर क्षमतेचा ऑक्सिजन तयार होईल. तो रोज ११० रुग्णांना थेट पाईपलाईन द्वारे पुरवला जाईल. ह्या प्रकल्पातून वातावरणातून हवा शोषून घेऊन त्यामधून नायट्रोजन बाहेर काढून ९३ टक्के शुद्ध ऑक्सिजन तयार केला जाणार असल्याची माहिती शिंदे यांनी यावेळी बोलताना दिली.

यावेळी खासदार राजन विचारे, पोलीस आयुक्त सदानंद दाते, आमदार गीता जैन, महापौर ज्योत्स्ना हसनाळे, आयुक्त दिलीप ढोले, उपायुक्त संभाजी वाघमारे, सभागृह नेते प्रशांत दळवी, विरोधीपक्ष नेते प्रवीण पाटील, उपजिल्हाप्रमुख शंकर वीरकर , नगरसेवक राजू भोईर, जोशी रुग्णालयाचे अधीक्षक डॉ. अशोक गीते आदी उपस्थित होते.   

संभाव्य तिसऱ्या लाटेत लहान मुलांना सर्वाधिक संसर्ग होण्याच्या पार्श्वभूमीवर विशेष टास्क फोर्सची स्थापना करण्यात आली आहे. यामध्ये बालरोगतज्ज्ञ आणि वैद्यकीय अधिकाऱ्यांचा समावेश आहे. जोशी रुग्णालयात कोरोना बाधित लहान मुलांसाठी विशेष वॉर्ड तयार करण्यात आला आहे. कोरोना विषाणूची सध्यस्थिती पाहता प्रशासनाच्या वतीने विविध उपाययोजना करण्यात येत आहेत. यासोबतच, पावसाळ्यात होणाऱ्या साथीच्या आजारांकडे दुर्लक्ष करता येणार नसून त्यासाठी सर्व यंत्रणांना सज्ज राहण्याचे शिंदे यांनी निर्देश दिले. 

जोशी रुग्णालयात २१० ऑक्सिजन खाटा व ४० आयसीयू खाटा आहेत. सद्यस्थितीत ६ केएल क्षमतेचा लिक्विड मेडिकल ऑक्सिजन टॅंक व ३५२ जम्बो सिलेंडरद्वारे ऑक्सिजन पुरवठा करण्यात येत आहे. सदर प्लांट हा स्वयंचलित असल्याने यासाठी मनुष्यबळाचा वापर अगदी कमी होतो. तसेच, मेडिकल लिक्विड ऑक्सिजन टॅंक रिफिलिंग करताना व जम्बो सिलेंडर्स हाताळणी करताना होणारे अपघात या प्लांटमध्ये होत नाहीत, अशी माहिती आयुक्त ढोले यांनी दिली. 

'म्युकर मायकोसिस' चा प्रादुर्भाव कोरोना रूग्णांमध्ये वाढत असल्याने या त्यासाठीचा औषधसाठा तसेच तज्ञ डॉक्टरांशी सल्लामसलत करून आवश्यक तयारी केली आहे. म्युकरमायकोसिसाठी लागणाऱ्या औषधांचा पुरवठा जिल्हाधिकाऱ्यांमार्फत होईल. महानगरपालिकेच्या सर्व ८ कोविड रुग्णालयांचे ऑक्सिजन, फायर, स्ट्रक्चरल आणि इलेक्ट्रिकल ऑडिट पूर्ण झाले आहे . तर खाजगी ४७ रुग्णालयांचे फायर व थर्ड पार्टी ऑक्सिजन ऑडिटचे काम पूर्ण झाले असल्याची माहिती आयुक्त ढोले यांनी पालकमंत्र्यांना दिली. 

टॅग्स :Eknath Shindeएकनाथ शिंदेShiv Senaशिवसेनाcorona virusकोरोना वायरस बातम्याOxygen Cylinderऑक्सिजन