भिवंडीतील दोघांचा मृत्यू
By Admin | Updated: February 29, 2016 04:34 IST2016-02-29T04:34:25+5:302016-02-29T04:34:25+5:30
या हत्याकांडात भिवंडी तालुक्यातील तीन जणांचा समावेश आहे. त्यापैकी दोन जणांचा मृत्यू झाला असून, एक महिला ठाण्यातील खाजगी रुग्णालयात मृत्यूशी झुंज देत आहे.

भिवंडीतील दोघांचा मृत्यू
पंढरीनाथ कुंभार, भिवंडी
या हत्याकांडात भिवंडी तालुक्यातील तीन जणांचा समावेश आहे. त्यापैकी दोन जणांचा मृत्यू झाला असून, एक महिला ठाण्यातील खाजगी रुग्णालयात मृत्यूशी झुंज देत आहे.
तालुक्यातील म्हापोली येथे राहणाऱ्या सोजब नुरा भरमल याच्याबरोबर कासारवडवली येथील वरेकर कुटुंबातील सुबीयाशी दोन वर्षांपूर्वी लग्न झाले असून, त्यांना अरसीया नावाची ४ महिन्यांची मुलगी होती. सोजब याच्या कुटुंबाचे शहरातील वंजारपाटी नाक्यावर फुलांचे दुकान तसेच म्हापोली गावात मोबाइलचे दुकान आहे. सोजबचे वडील वारले असून आई, चार भाऊ व दोन बहिणी असा त्याचा परिवार आहे. सोजब व सुबीया यांचा मुलीसह सुखाचा संसार सुरू होता. शनिवारी रात्री ८ वाजता सुबीयाचा भाऊ तथा हत्याकांडातील मारेकरी हुसनैन अन्वर वरेकर हा म्हापोली येथे सोजब भरमल याच्या घरी आला. त्याने कासारवडवली येथील घरात दावत ठेवली असून तुला घेण्यास आलो आहे, असे सांगून सोबत आणलेल्या गाडीत बहीण सुबीया व तिची ४ वर्षांची मुलगी अरसीया हिला घेऊन गेला. त्यानंतर, रात्री २ ते ३ च्या दरम्यान ही घटना झाल्याचे सोजब यास समजले. तेव्हा त्याच्या कुटुंबीयांनी ठाण्यात धाव घेतली.
लहान मुलगी अरसीया हिचा गळा चिरल्याने मृत्यू झाल्याचे त्यास समजले. तर, पत्नी सुबीया हिचा गळा चिरल्याने ती गंभीररीत्या जखमी असून, मृत्यूशी झुंज देत असल्याची माहिती सोजबला मिळाली. सध्या तिच्यावर ठाण्यातील टायटन रुग्णालयात उपचार सुरू आहेत. सोजब भरमाल याने मयत मुलगी अरसीया हिचे पार्थिव रविवारी दुपारी दीड वाजता म्हापोली येथे आणल्यानंतर सायंकाळी ५ वाजता दफनविधी करण्यात आला.