कोपरीतून बेपत्ता वृद्धाचा खाडीत बुडून गूढ मृत्यू

By जितेंद्र कालेकर | Updated: July 10, 2024 20:51 IST2024-07-10T20:51:08+5:302024-07-10T20:51:32+5:30

कोळी हे ७ जुलै २०२४ रोजी सकाळी ९ वाजण्याच्या सुमारास त्यांच्या चेंदणी कोळी वाडयातील घरातून अचानक निघून गेले होते.

death of an old man missing from the corner drowned in the creek | कोपरीतून बेपत्ता वृद्धाचा खाडीत बुडून गूढ मृत्यू

कोपरीतून बेपत्ता वृद्धाचा खाडीत बुडून गूढ मृत्यू


ठाणे: गेल्या चार दिवसांपासून बेपत्ता असलेल्या अशोक बाळकृष्ण कोळी (८०) या वृद्धाचा कोपरीतील खाडीत बुडून मृत्यू झाल्याची घटना बुधवारी दुपारी ४ वाजताच्या सुमारास निदर्शनास आली आहे. त्यांनी आत्महत्या केली की त्यांचा खाडीच्या पाण्यात बुडून मृत्यू झाला, याचा तपास करण्यात येत असल्याचे पोलिसांनी सांगितले.

कोळी हे ७ जुलै २०२४ रोजी सकाळी ९ वाजण्याच्या सुमारास त्यांच्या चेंदणी कोळी वाडयातील घरातून अचानक निघून गेले होते. ते त्यानंतर घरी परतलेच नव्हते. त्यांचा परिसरात शोध घेतल्यानंतर त्यांचा मुलगा पंकज कोळी (४६) याने ते बेपत्ता असल्याची तक्रार कोपरी पोलिस ठाण्यात ८ जुलै रोजी दाखल केली होती. पोलिस आणि नातेवाईकांकडून शोध सुरु असतांनाच त्यांचा मृतदेह कोपरीतील स्वामी समर्थ मठाजवळील खाडीमध्ये मिळाल्याची माहिती वरिष्ठ पोलिस निरीक्षक रणजित ढेरे यांनी दिली.

 

Web Title: death of an old man missing from the corner drowned in the creek