शहरं
Join us  
Trending Stories
1
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
2
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
3
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
4
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
5
'नवरत्न' होण्याच्या दिशेने हिंदुस्तान कॉपरची मोठी झेप! 'हा' दर्जा मिळाल्यानंतर नेमकं काय होतं?
6
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
7
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
8
Gold Price Today: महिनाभरात सोन्याच्या दरात 26293 रुपयांची घट, चांदी 36393 रुपयांनी घसरली; पटापट चेक करा लेटेस्ट रेट
9
इराणपेक्षा हा अरब देशच जास्त होरपळतोय; वीज, पाणी अन् ऑईल डेपो, सरकारी इमारतीही नेस्तनाभूत...
10
देशात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; कोणकोणत्या राज्यांना हवामान खात्याने दिला अलर्ट?
11
भारतीय वायुसेना आणखी मजबूत होणार; १,००० किलो वजनी बॉम्ब खरेदी करण्यास सरकारची मंजुरी
12
पत्नीने पतीसोबत राहण्यास दिला नकार, उच्च न्यायालयाने प्रियकरासोबत राहण्याची दिली परवानगी
13
इराण युद्धाचा परिणाम! 'मूडीज'ने भारताचा विकास दर अंदाज घटवला; महागाई आणि व्याजदर वाढण्याचा धोका
14
इराणचा मोठा दावा! पायलटला शोधायला आलेले अमेरिकेचे C-130 विमान पाडले 
15
Middle East War: मध्य पूर्वेतील युद्ध भडकणार? अमेरिकेचं सर्वात घातक मिसाइल युद्धाच्या रणांगणात, इराणवर महासंकट!
16
मतदार यादीच्या कामाचा ‘शिक्षण-आरोग्य’वर ताण; ‘आरोग्य’चे ३ हजार, 'शिक्षण'च्या २ हजार कर्मचाऱ्यांचा समावेश
17
"या वेड्याला कसंही करून रोखा...!"; नोबेल विजेत्या माजी आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा एजन्सी प्रमुखांचंं खाडी देश अन् UN ला आवाहन
18
थारच्या वाळवंटातून कच्च तेल उत्पादनात विक्रमी वाढ; भारताचे आयातीवरील अवलंबित्व कमी होणार?
19
AI च्या नावाखाली layoff सुरू! Oracle, Amazon, Meta...२०२६ मध्ये हजारो कर्मचाऱ्यांना नारळ
20
मुंबई हादरवण्याचा कट उधळला, २५ सेकंदाच्या व्हिडिओनं पोलखोल; पाकिस्तानी नेटवर्कचा खेळ बिघडला
Daily Top 2Weekly Top 5

चुकीच्या उपचारामुळे रूग्णाचा मृत्यू; तीन बोगस डॉक्टरांवर कारवाई

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 5, 2019 02:35 IST

डॉ. दाऊद खान याची सर्व वैद्यकीय प्रमाणपत्रे बनावट असून, त्याने या पदव्या भिवंडीतून खरेदी केल्याचे उघड झाले आहे.

ठाणे : चुकीच्या उपचारांमुळे डायघर येथील अंकित पाटील याचा मृत्यू झाल्याची घटना २४ एप्रिल रोजी घडली होती. याप्रकरणी डॉ. दाऊद खान याला अटक केली असून, आणखी दोन बोगस डॉक्टरांवरही कारवाई केल्याची माहिती कळवा विभागाचे सहायक पोलीस आयुक्त रमेश धुमाळ यांनी दिली.डॉ. दाऊद खान याची सर्व वैद्यकीय प्रमाणपत्रे बनावट असून, त्याने या पदव्या भिवंडीतून खरेदी केल्याचे उघड झाले आहे. अंकित (२५) याला पोटदुखीचा त्रास झाल्याने तो शीळफाटा येथील डॉ. खान यांच्या बुरहानी क्लिनिकमध्ये २४ एप्रिल रोजी गेला होता. उपचारादरम्यान प्रकृती बिघडल्याने मित्राने त्यास काळसेकर रुग्णालयात उपचारासाठी नेले. मात्र, डॉक्टरांनी मृत घोषित केले. चुकीच्या उपचाराने त्याचा मृत्यू झाल्याचा आरोप करून डॉक्टर खान याच्याविरुद्ध तक्रार केली होती.बोगस पदवी विकणाऱ्या दोघांना भिवंडीतून अटकया गुन्ह्याच्या तपासाच्या अनुषंगाने जिल्हा शल्यचिकित्सक यांच्या अध्यक्षतेखाली नेमलेल्या चौकशी समितीने २१ जून २०१९ रोजी आपला अहवालही पोलिसांना दिला. डॉ. खान याच्याकडे बीयूएमएस ही वैद्यकीय पदवी होती. अ‍ॅलोपॅथीचे प्रमाणपत्र आणि ज्ञान नसूनही त्याने अंकितला जास्त क्षमतेचे इंजेक्शन दिले. त्याच इंजेक्शनची रिअ‍ॅक्शन होऊन अंकितची प्रकृती गंभीर झाली.ती गंभीर होत असतानाही त्याला त्याने स्वत:च्याच रुग्णालयात उपचार सुरू ठेवले. त्यास पुन्हा दुसरे इंजेक्शन दिल्यानंतर मात्र त्याचा मृत्यू ओढवल्याचे या अहवालात स्पष्ट केले आहे. हा अहवाल मिळताच २४ जून रोजी कथित डॉक्टर खानविरुद्ध डायघर पोलिसांनी गुन्हा दाखल करून त्यास अटक केली. त्याने त्याची वैद्यकीय पदवी भिवंडीतून अल्प किमतीमध्ये विकत घेतल्याचीही बाब उघड झाली.त्याला पदवी विकत देणाºया डॉ. महंमद फरहान महंमद शाहिद शेख (३६, रा. मुंब्रा) आणि डॉ. अब्दुल रेहमान खान (३६, रा. भिवंडी) या अन्य दोन डॉक्टरांनाही वरिष्ठ पोलीस निरीक्षक रविकांत मालेकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक सादीक बागवान, पोलीस निरीक्षक रामचंद्र मोहिते, सहायक पोलीस निरीक्षक प्रदीप सरफरे, उपनिरीक्षक विकास राठोड आणि सागर शिंदे यांनी अटक केली.बोगस पदव्यांचा वापर करून वैद्यकीय सराव आणि व्यवसाय करणाºया बोगस डॉक्टरांचीही माहिती डॉ. खान याच्या चौकशीतून पुढे आली आहे. त्यांच्याविरूद्ध कारवाईची प्रक्रिया सुरू असल्याचे धुमाळ यांनी सांगितले.

टॅग्स :doctorडॉक्टरCrime Newsगुन्हेगारी