भांडुपमध्ये शौचालय खचून दोघांचा मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 29, 2018 06:47 IST2018-04-29T06:47:05+5:302018-04-29T06:47:05+5:30

भांडुप पश्चिमेकडील पिंपळेश्वर कॉलनी येथील साई सदन चाळीमध्ये शनिवारी सकाळी सहाच्या सुमारास सार्वजनिक शौचालय कोसळून दोन जणांचा मृत्यू झाला

Death of both toilets in bridges | भांडुपमध्ये शौचालय खचून दोघांचा मृत्यू

भांडुपमध्ये शौचालय खचून दोघांचा मृत्यू

मुंबई : भांडुप पश्चिमेकडील पिंपळेश्वर कॉलनी येथील साई सदन चाळीमध्ये शनिवारी सकाळी सहाच्या सुमारास सार्वजनिक शौचालय कोसळून दोन जणांचा मृत्यू झाला. लोबाबेन धीरुभाई जेठवा (४२) आणि बाबूलाल झोमाजी देवासे (४५) अशी मृतांची नावे आहेत.
शनिवारी सकाळी सहाच्या सुमारास लोबाबेन जेठवा आणि बाबूलाल देवासे शौचास गेले असतानाच शौचालयाचा ढाचा कोसळला. यात दोघेही ढिगाऱ्याखाली अडकल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला. दुर्घटनेनंतर अग्निशमन दलाने तत्काळ घटनास्थळी धाव घेतली. तसेच घटनेचे गांभीर्य लक्षात घेत एनडीआरएफचे पथकही बोलावण्यात आले. पालिका कर्मचारी आणि महापालिका आपत्कालीन नियंत्रण कक्षाचीही बचावकार्याकरिता मदत घेण्यात आली. ढिगारा उपसण्याचे काम सुरू असतानाच लोबाबेन जेठवा आणि बाबूलाल देवासे यांचे मृतदेह बाहेर काढण्यात आले. स्थानिकांच्या म्हणण्यानुसार, हे सार्वजनिक शौचालय घुशींनी पोखरले होते. तर काही स्थानिकांच्या म्हणण्यानुसार, शौचालयाच्या टाकीतील गॅसमुळे स्फोट झाला असावा आणि त्यामुळे शौचालय खचले असावे.

Web Title: Death of both toilets in bridges