रेल्वेच्या धडकेत दोघांचा मृत्यू
By Admin | Updated: February 20, 2017 00:07 IST2017-02-20T00:07:53+5:302017-02-20T00:07:53+5:30
वसई -दिवा या रेल्वेमार्गावरील डुंगे व खारबांवदरम्यान रेल्वेच्या धडकेत दोघांचा मृत्यू झाला.

रेल्वेच्या धडकेत दोघांचा मृत्यू
>भिवंडी दि.१९ - वसई -दिवा या रेल्वेमार्गावरील डुंगे व खारबांवदरम्यान रेल्वेच्या धडकेत दोघांचा मृत्यू झाला.
रुपेश हरिशचंद्र भगत ( 22 ) असे मृत तरुणाचे नाव असून, तो डुंगे येथे रहाणारा आहे. तो रेल्वेलाईन ओलांडात असताना त्यास दिवामार्गे आलेल्या प्रवासीगाडी ने ठोकर मारली. या अपघातात रूपेश याचा मृत्यू झाला.तर खारबाव रेल्वेस्थानकाजवळ रेल्वेलाईन ओलांडणाऱ्या जयनारायण नियाम निषाद (37) यांस वसईच्या बाजूने येणाऱ्या डीएमयू रेल्वे गाडीने धडक दिली असता त्याचा मृत्यू
झाला.या दोघांचा रेल्वेच्या धडकेने मृत्यू झाला तरी ही आत्महत्या असल्याची शंका व्यक्त केली जात आहे.या प्रकरणी डोंबिवली रेल्वे पुलिस स्टेशनमध्ये नोंद करण्यात आली असून, पोलिस हवालदार अरुण तांबे पुढील तपास करीत आहे.