शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

ठाण्यात पाण्याच्या डबक्यात पडून ११ वर्षीय मुलाचा मृत्यु: सुरक्षा रक्षकाविरुद्ध गुन्हा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 15, 2018 21:22 IST

ढोकाळी येथील पाण्याच्या डबक्यात पडून सतिश शांताराम धोत्रे (१०) या मुलाचा बुडून मृत्यु झाल्याची घटना सोमवारी दुपारच्या सुमारास घडली. याप्रकरणी १४ फेब्रुवारी रोजी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

ठळक मुद्देबांधकामासाठी केली होती पाण्याची खदानआंघोळीसाठी गेलेल्या मुलांपैकी एकाचा मृत्युसोमवारच्या घटनेनंतर बुधवारी गुन्हा दाखल

ठाणे: बाळकुम येथील हायलंड पार्कयेथे एका बांधकाम सुरु असलेल्या इमारतीसाठी असलेल्या पाण्याच्या डबक्यात पडून सतिश शांताराम धोत्रे (१०) या मुलाचा बुडून मृत्यु झाल्याची घटना सोमवारी दुपारच्या सुमारास घडली. याप्रकरणी इमारतीच्या सुरक्षा रक्षकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती कापूरबावडी पोलिसांनी दिली.‘हायलँड गार्डन’ या बांधकाम व्यावसायिकाच्या नवीन इमारतीचे बांधकाम ढोकाळी भागात सुरु आहे. तिथे या बांधकामासाठी खड्डा खोदून पाणी साचविण्यात आले आहे. त्याठिकाणी झरे लागल्यामुळे याठिकाणी मोठया प्रमाणात पाणी साचले आहे. याच पाण्यात आंघोळीसाठी १२ फेब्रुवारी २०१८ रोजी दुपारी १. ४५ वाजण्याच्या सुमारास सतिश धोत्रे (रा. वडारवाडी, बाळकूम, ठाणे) याच्यासह सात ते आठ मुले उतरली. त्यावेळी पाण्यातील दगडामध्ये त्याचा पाय रुतल्याने तो जखमी होऊन तो पाण्यात अडकला. तो अडकल्याची माहिती मिळाल्यानंतर जखमी अवस्थेतच त्याला स्थानिक नागरिकांनी बाहेर काढून जवळच्याच एका खासगी रुग्णालयात दाखल केले. मात्र, उपचारादरम्यान त्याचा मृत्यु झाला. याप्रकरणी प्राथमिक चौकशीमध्ये या मुलांना पाण्यात जातांना न रोखल्याने तसेच कामात हलगर्जीपणा केल्याचा ठपका ठेवून या बांधकामाच्या साईटवरील ‘डेल्टा गार्ड’ या सुरक्षा रक्षक पुरविणा-या कंपनीचा सुरक्षा रक्षक शाहीद अहमद खलील अहमद सिद्धिकी (५०, रा. देवरी पाडा, मुंब्रा) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ज्या ठिकाणी मुलाचा मृत्यू झाला त्याठिकाणी मोकळी जागा असून त्याठिकाणी शाहिद याची निगराणी ठेवण्यासाठी नेमणूक करण्यात आली होती. यात त्याने हलगर्जीपणा तसेच कामचुकारपणा केल्याने त्याचा मृत्यु झाल्याचे प्रथमदर्शनी चौकशीत निष्पन्न झाल्याचे पोलिसांनी सांगितले. चौकशी सुरु असल्यामुळे अद्याप त्याला अटक केली नसल्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विजय दरेकर यांनी सांगितले.

टॅग्स :thaneठाणेCrimeगुन्हाWaterपाणी