शहरं
Join us  
Trending Stories
1
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
2
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
3
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
4
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
5
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
6
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
7
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
8
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
9
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
10
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
11
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
12
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
13
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
14
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
15
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
16
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
17
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
18
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
19
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
20
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
Daily Top 2Weekly Top 5

ठाण्यातील फॉरेस्ट कॉलनीतून वनपालाची रिवॉल्व्हर भरदिवसा चोरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 4, 2018 19:44 IST

ठाण्यातील कोपरी येथील फॉरेस्ट कॉलनीत वास्तव्याला असलेल्या एका वनपालाची खासगी रिवॉल्व्हर शनिवारी भरदिवसा चोरी झाली.

ठळक मुद्देरिवॉल्व्हर खासगीतक्रारदाराकडे रितसर परवानातपास सुरू

ठाणे : मुलुंड येथे कार्यरत असलेल्या एका वनपालाची खासगी रिवॉल्व्हर कोपरी येथून शनिवारी भरदिवसा चोरी झाली. कोपरी पोलीस या प्रकरणाचा तपास करीत आहेत.मुलुंड येथे वन विभागात वनपाल म्हणून कार्यरत असलेले संदीप तुकाराम चौरे (३३) हे कोपरी येथील फॉरेस्ट कॉलनीमध्ये राहतात. टाईप ३ च्या क्वार्टर क्रमांक २ मध्ये चौरे यांचे वास्तव्य असून, शनिवारी दुपारी १ वाजताच्या सुमारास ते कुटुंबासह दवाखान्यात गेले होते. दुपारी १ वाजून ५0 मिनिटांनी परत आले असता, त्यांना चोरी झाल्याचे लक्षात आले. अज्ञात चोरांनी चौरे यांच्या घराच्या मागील दरवाजाने प्रवेश करून कपाटातील लॉकर तोडले. या लॉकरमधील ८0 हजार रुपये किमतीचे भारतीय बनावटीचे रिवॉल्व्हर आणि ७0 हजार रुपयांची रोकड चोरांनी लंपास केली. चौरे यांच्याकडे या रिवॉल्व्हरचा परवाना असल्याची माहिती कोपरी पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक राम गोपाळ यांनी दिली. चौरे यांच्या घराजवळच असलेल्या आणखी एका खोलीचे काम काही दिवसांपूर्वी सुरू होते. त्यासाठी काही मजूर या कॉलनीमध्ये नियमित यायचे. त्यांनी चौरे यांच्या घरावर लक्ष ठेऊन चोरी केली असण्याची शक्यता पोलिसांनी वर्तविली. कोपरी पोलिसांनी शनिवारी सायंकाळी याप्रकरणी गुन्हा दाखल केला असून, पुढील तपास सुरू आहे.पोलिसांनी या परिसरात कुठे सीसी कॅमेर्‍याची व्यवस्था आहे का, याची चौकशी केली. मात्र जवळपासच्या परिसरात तशी व्यवस्था नसल्याचे समजले. त्यामुळे परिसरातील रहिवाशांकडे चौकशी करून तपास करण्याचा प्रयत्न सुरू असल्याचे सहायक पोलीस निरीक्षक राम गोपाळ यांनी सांगितले.

टॅग्स :thaneठाणेPoliceपोलिसforestजंगल