फसवणूक करून व्यापारी पसार
By Admin | Updated: March 24, 2017 01:07 IST2017-03-24T01:07:15+5:302017-03-24T01:07:15+5:30
आदिवासी शेतकऱ्यांची फसवणूक करून पसार झालेल्या नवी मुंबईतील व्यापाऱ्याचा शोध सुरू आहे.

फसवणूक करून व्यापारी पसार
शेणवा : आदिवासी शेतकऱ्यांची फसवणूक करून पसार झालेल्या नवी मुंबईतील व्यापाऱ्याचा शोध सुरू आहे.
बेलकडी तसेच गांगणवाडी येथील आदिवासी शेतकरी मधुकर गावंडा, शरद गावंडा, महादू गावंडा आणि भाऊ गांगड यांनी शेतजमीन भाडेतत्त्वावर घेत काकडी लागवड केली. बेरोजगारीमुळे कुटुंबाचा उदरनिर्वाह करण्यासाठी त्यांनी हे पिक घेतले होते. या शेतकऱ्यांनी चांगले पिक यावे म्हणून दिवसरात्र मेहनत घेतली.
काकडीचे उत्पादन नवी मुंबईतील व्यापारी भरत शिंगोटे यांनी रक्कम न देता खरेदी करत तुर्भे बाजारात त्याची विक्री केली. काकडीचे उत्पादन संपुष्टात आल्यानंतर एकूण खरेदी काकडीची रक्कम शेतकऱ्यांना देण्याचे ठरले होते. त्यानुसार नोव्हेंबर, डिसेंबर, जानेवारीत व्यापाऱ्याने या शेतकऱ्यांकडून २ लाख ११ हजार ९४३ रुपयांची काकडी खरेदी केली. त्याच्या पावत्याही दिल्या आहेत.
काकडीचे उत्पादन महिनाभरापूर्वीच बंद झाले असूनही या व्यापाऱ्याने शेतकऱ्यांना पैसे दिलेले नाहीत. याबाबतची तक्र ार त्यांनी किन्हवली पोलिसात केली आहे.
दरम्यान, व्यापाऱ्यांकडून अशा प्रकारे शेतकऱ्यांची फसवणूक होत असेल तर व्यवसाय कसा करावा असा सवाल शेतकऱ्यांनी उपस्थित केला आहे. व्यापाऱ्याचा त्वरित शोध घेण्याची मागणी केली. (वार्ताहर)