पंचधातूच्या मूर्तीचा एक कोटीमध्ये सौदा

By Admin | Updated: September 29, 2015 23:45 IST2015-09-29T23:45:24+5:302015-09-29T23:45:24+5:30

आठव्या शतकातील पंचधातूंची भगवान महावीरांची पुरातन मूर्तीची एक कोटींमध्ये तस्करी करण्यासाठी आलेल्या मंगेश साळवी (५०) आणि कमलेश अजमेरा (४६) या डोंबिवलीतील दोघांना ठाणे

Deal of five-star idol in one crore | पंचधातूच्या मूर्तीचा एक कोटीमध्ये सौदा

पंचधातूच्या मूर्तीचा एक कोटीमध्ये सौदा

ठाणे : आठव्या शतकातील पंचधातूंची भगवान महावीरांची पुरातन मूर्तीची एक कोटींमध्ये तस्करी करण्यासाठी आलेल्या मंगेश साळवी (५०) आणि कमलेश अजमेरा (४६) या डोंबिवलीतील दोघांना ठाणे गुन्हे अन्वेषण विभागाने अटक केली आहे. त्यांच्याकडून अ‍ॅक्रेलिक बॉक्समध्ये साडे तीन किलोची ही मूर्तीही पोलिसांनी हस्तगत केली.
या मूर्तीच्या विक्रीसाठी हे दोघे कळवा नाका येथे येणार असल्याची माहिती युनिट एकचे वरीष्ठ पोलीस निरीक्षक नितिन ठाकरे आणि उपनिरीक्षक अभिजित भुजबळ यांना मिळाली होती. याच माहितीच्या अनुषंगाने त्यांना २५ सप्टेंबर रोजी मूर्तीसह सापळा रचून ताब्यात घेण्यात आले. ती आठ ते दहाव्या शतकातील असल्याची माहिती इतिहास संशोधकांकडून पोलिसांना मिळाली. तिची एक कोटींमध्ये विक्री केली जाणार होती, अशी माहिती तपासात उघड झाली. ही मूर्ती नेमकी किती वर्ष पुरातन आहे, ती कोणत्या मिश्र धातूंची बनलेली आहे. याबाबतची माहिती पुरातत्व विभागाकडून घेण्यात येत असल्याचे ठाकरे यांनी सांगितले. ती कोणत्या मंदीरातून अथवा वस्तू संग्रहालमयातून चोरीस गेली आहे किंवा एखाद्या उत्खननातून मिळाली का? याबबातचाही तपास सुरु आहे. पोलीस आयुक्त परमवीर सिंग, सह पोलीस आयुक्त लक्ष्मीनारायण, अपर पोलीस आयुक्त शिवाजी बोडखे, उपायुक्त पराग मणेरे आणि सहाय्यक पोलीस आयुक्त नागेश लोहार आदींच्या मार्गदर्शनाखाली युनिट एकचे पथक याचा तपास करीत आहेत. यातील साळवी आणि अजमेरा या दोघांनाही ३० सप्टेंबरपर्यंत पोलीस कोठडी मिळाली आहे. (प्रतिनिधी)

Web Title: Deal of five-star idol in one crore

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.