द्वारलीगावातील भाग्यलक्ष्मी ज्वलर्सवर भरदिवसा दरोडा, दोन जण जखमी, पोलीस घटनास्थळी
By सदानंद नाईक | Updated: December 6, 2022 18:21 IST2022-12-06T18:20:36+5:302022-12-06T18:21:34+5:30
हिललाईन पोलीस ठाण्याच्या हद्दीतील द्वारलीगावात भाग्यलक्ष्मी ज्वलर्स दुकानात मंगळवारी सकाळी ११ वाजता दरोडा पडला.

द्वारलीगावातील भाग्यलक्ष्मी ज्वलर्सवर भरदिवसा दरोडा, दोन जण जखमी, पोलीस घटनास्थळी
उल्हासनगर : हिललाईन पोलीस ठाण्याच्या हद्दीतील द्वारलीगावात भाग्यलक्ष्मी ज्वलर्स दुकानात मंगळवारी सकाळी ११ वाजता दरोडा पडला. हत्यारबंद असलेल्या पाच जणांच्या टोळक्यांनी दुकानाचे मालक असलेले विनेश व लोकेश कुमावत यांच्यावर चोपरने हल्ला करून जखमी केल्याची माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक रणजित ढेरे यांनी दिली.
उल्हासनगरातील हिललाईन पोलीस ठाण्याच्या हद्दीत द्वारलीगाव येत असून गावात कुमावत बंधू यांचे भाग्यलक्ष्मी नावाचे सोन्याचे दुकान आहे. दुकानदार विनेश व लोकेश कुमावत या भावानी नेहमीप्रमाणे मंगळवारी सकाळी दुकान उघडले. सकाळी ११ वाजण्याच्या दरम्यान पांढऱ्या गाडीतून पाच जणांचे टोळके उतरून थेट ज्वलर्सच्या दुकानात घुसले. त्यांच्या हातात रिव्हॉल्व्हर, तलवार, चौपर अशी हत्यारे होती.
टोळके दुकानात जातातच त्यांची दुकानदार बंधू विनेश व लोकेश कुमावत यांच्या सोबत हाणामारी होऊन आरडाओरडा झाली. दोन्ही भावावर चोपरने वार केल्याने, ते जखमी झाले. तर आरडाओरडा झाल्याच्या भीतीने, त्यांनी तेथून पळ काढला.
हिललाईन पोलिसांना घटनेची माहिती मिळताच त्यांची द्वारलीगावात जाऊन सोन्याच्या दुकानाची पाहणी केली. कुमावत बांधून आरडाओरडा करून दरोडेखोरांचा सामना केल्याने, दरोडेखोरांनी तेथून पळ काढला. त्यांचा दरोड्याचा प्रयत्न फसला असून दागिने चोरीला गेले नाही. अशी माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक रणजित ढेरे यांनी सांगितले. सीसीटीव्ही कॅमेरे यांच्या आधारे चोरट्यांचा शोध घेणार असल्याची माहिती पोलीस अधिकारी ढेरे यांनी दिली आहे.