शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

पोलीस दिनानिमित्त देशभरातील शहीद पोलिसांना ठाण्यात मानवंदना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 21, 2018 22:34 IST

ठाणे शहर पोलीस आयुक्तालयातर्फे रविवारी सकाळी ठाणे ग्रामीण पोलीस कार्यालयाजवळील उद्यानात पोलीस स्मृती दिन साजरा झाला. वर्षभरामध्ये देशभरात शहीद झालेल्या ४२३ पोलिसांना यावेळी पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह पोलिसांनी आदरांजली वाहिली. यामध्ये महाराष्टÑाच्या हवालदार सुनिल कदम, सुरेश गावडे आणि सतिश मढवी यांचाही समावेश होता.

ठळक मुद्देदेशभरातील ४२३ शहीदांना आदरांजलीपालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली मानवंदनाशहीद पोलीस कुटूंबियांचीही उपस्थिती

ठाणे: पोलीस दिनानिमित्त देशभरातील ४२३ शहीद पोलिसांना ‘स्मृती स्तंभाला’ पुष्पचक्र वाहून ठाण्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी रविवारी सकाळी मानवंदना दिली. सकाळी ८ ते ८.२० या दरम्यान झालेल्या या कार्यक्रमास जिल्हयातील शहीद पोलीस कुटूंबियांसह अनेक वरिष्ठ अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.लडाखमधील भारताच्या बर्फाच्छादित सीमेवरील हॉटस्प्रिंग याठिकाणी २१ आॅक्टोबर १९५९ रोजी १० पोलीस जवान गस्त घालत होते. त्यावेळी दबा धरुन बसलेल्या चिनी सैनिकांनी त्यांच्यावर भ्याड हल्ला केला. या हल्ल्याला भारतीय जवानांनीही जशास तसे उत्तर देत अखेरच्या क्षणापर्यंत झुंज दिली. या हल्ल्यात दहा जवान शहीद झाले. या घटनेचा संपूर्ण देशात तीव्र निषेध व्यक्त करण्यात आला होता. भारतीय जवानांच्या अतुलनीय शौर्यापासून इतरांना प्रेरणा मिळावी, कर्तव्याची आणि राष्टÑनिष्ठेची जाणीव व्हावी, म्हणून हा दिवस पोलीस हुतात्मा दिन म्हणून पाळला जातो.ठाणे शहर पोलीस आयुक्तालयातर्फे रविवारी सकाळी ठाणे ग्रामीण पोलीस कार्यालयाजवळील स्व. निर्मलादेवी चिंतामणी दिघे उद्यानात पोलीस स्मृती दिन साजरा झाला. वर्षभरामध्ये देशभरात शहीद झालेल्या ४२३ पोलिसांच्या नावांचे वाचन आर्थिक गुन्हे शाखेचे पोलीस उपायुक्त संजय जाधव यांनी केले. पालकमंत्री शिंदे यांनी शहीद स्तंभाला पुष्पचक्र वाहून मानवंदना दिल्यानंतर ठाण्याचे खासदार राजन विचारे, पोलीस आयुक्त विवेक फणसळकर, सह पोलीस आयुक्त मधुकर पांडेय, कोकण विभागाचे विशेष पोलीस महानिरीक्षक नवल बजाज, ठाण्याचे अतिरिक्त पोलीस आयुक्त प्रविण पवार (गुन्हे शाखा), केशव पाटील (प्रशासन),प्रताप दिघावकर (पूर्व प्रादेशिक विभाग) तसेच ठाणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक शिवाजी राठोड, लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे अधीक्षक महेश पाटील, पोलीस उपायुक्त डी. एस. स्वामी (ठाणे), संजय शिंदे (कल्याण), प्रमोद शेवाळे (उल्हासनगर), अविनाश अंबुरे (वागळे इस्टेट), दिपक देवराज (गुन्हे शाखा), अमित काळे (वाहतूक नियंत्रण शाखा) आणि मुख्यालयाचे संदीप पालवे आदींसह शहीद पोलिसांच्या कुटूंबियांनीही स्मृतीस्तंभाला पुष्पचक्र अर्पण करुन आदरांजली वाहिली.ठाण्यात रविवारी मान्यवरांनी पोलीस स्मृती स्तंभास मानवंदना दिल्यानंतर मुख्यालयातील जवानांनी हवेत फैरी झाडून शहीद पोलिसांना मानवंदना दिली...................४२३ शहिदांमध्ये महाराष्टÑातील तिघेगेल्या वर्षभरामध्ये देशभरात ४२३ पोलीस अधिकारी कर्मचारी शहीद झाले. यामध्ये महाराष्टÑाच्या मुंबई पोलीस दलातील हवालदार सुनिल कदम, गडचिरोलीचे हवालदार सुरेश गावडे आणि अमरावती ग्रामीणच्या सतिश मढवी यांचा उल्लेख यावेळी करण्यात आला.

टॅग्स :thaneठाणेCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिस