शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

पालिकेच्या आरक्षित भूखंडावर बार?, कारवाईसाठी शिवसेना शाखाप्रमुखाचे एकदिवसीय धरणे आंदोलन

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 21, 2017 17:03 IST

 मीरा-भार्इंदर महापालिकेचे हाटकेश परिसरात उद्यानाचे आरक्षण क्रमांक ३०५ असलेल्या भूखंडावर एका अनधिकृत बांधकाम माफीयाकडून बेकायदेशीरपणे बार व रेस्टॉरन्टचे बांधकाम सुरु आहे.

भार्इंदर :  मीरा-भार्इंदर महापालिकेचे हाटकेश परिसरात उद्यानाचे आरक्षण क्रमांक ३०५ असलेल्या भूखंडावर एका अनधिकृत बांधकाम माफीयाकडून बेकायदेशीरपणे बार व रेस्टॉरन्टचे बांधकाम सुरु आहे. ही बाब उजेडात आल्याने ते बांधकाम त्वरीत हटवून त्या भूखंडावर नागरी सुविधायुक्त विकासकामे करा. या मागणीसाठी स्थानिक शिवसेना शाखाप्रमुख महेश शिंदे यांच्या नेतृत्वाखाली पालिका मुख्यालय प्रवेशद्वाराजवळ मंगळवारी एकदिवसीय धरणे आंदोलन छेडण्यात आले.पालिकेची बहुतांशी आरक्षित नागरी सुविधा भूखंडांवर मोठ्याप्रमाणात अतिक्रमण झाले असले तरी त्यावरील कारवाई अनेकदा अर्थपूर्ण तडजोडीमुळे गुंडाळली जाते. यामुळे आरक्षणांची जागा तेथील अतिक्रमणांमुळे पूर्णपणे पालिकेच्या ताब्यात येत नसल्याने त्यावरील विकासकामांस मोठा विलंब लागतो. अशाच एका मीरारोड येथील प्रभाग १३ अंतर्गत तसेच प्रभाग समिती ६ अंतर्गत असलेल्या आरक्षण क्रमांक ३०५ हा नागरी सुविधा भुखंड उद्यानासाठी आरक्षित आहे. गेल्या काही दिवसांपासून या जागेभोवती लोखंडी पत्र्यांचे कुंपण घालण्यात आले आल्याने स्थानिकांनी त्यावर विकासकाम होत असल्याचा अंदाज बांधला. परंतु, सुरु असलेले बांधकाम पुत्रण नामक एका स्थानिक अनधिकृत बांधकाम माफीयामार्फत सुरु असुन तेथे बार व रेस्टॉरन्ट सुरु होणार असल्याची माहिती स्थानिकांना मिळाली. हा बांधकाम माफीया सत्ताधारी भाजपाचा समर्थक असल्यानेच त्या आरक्षणावरील बेकायदेशीर बांधकामाला प्रशासनाकडून अभय दिले जात असल्याची बाब उजेडात येताच त्याची माहिती स्थानिकांनी सेनेचे शाखाप्रमुख महेश शिंदे यांना दिली. हे बांधकाम त्वरीत हटविण्यासाठी शिंदे यांनी तत्कालिन वादग्रस्त प्रभाग अधिकारी अविनाश जाधव यांच्याकडे अनेकदा तक्रारी केल्या. परंतु, त्यावर कोणतीही कारवाई न करता त्याला जाधव यांनी अभय दिल्याचा आरोप शिंदे यांनी केला. प्रशासनाच्या या अपादर्शक कारभाराविरोधात शिंदे यांच्या नेतृत्वाखाली मंगळवारी पालिका मुख्यालयाच्या प्रवेशद्वाराजवळच एक दिवसीय धरणे आंदोलन छेडण्यात आले. त्याचे निवेदन त्यांनी उपायुक्त दिपक पुजारी यांना दिले. त्यात त्या नागरी सुविधा भूखंडावरील बेकायदा बारचे बांधकाम त्वरीत हटवून त्यावर स्थानिकांसाठी उद्यान, जॉगर्स पार्क, बालवाडी, आदी लोकाभिमुख विकास करावा, अशी मागणी केली आहे. यावर सध्याचे प्रभाग अधिकारी प्रकाश कुळकर्णी यांनी शिंदे यांना मागील घटना विसरुन यापुढे कार्यवाही केली जाईल, असे प्रशासकीय भाषेतील आश्वासन दिले. परंतु, शिंदे हे बांधकाम हटविण्यावर ठाम राहिले. प्रशासनाने ते बांधकाम एका आठवड्यात न हटविल्यास सेनेकडून ते हटविले जाईल, असा दम प्रशासनाला भरला. आंदोलनात उपविभागप्रमुख राजेंद्र पडवळ, सुनिल पाटील, उपशाखाप्रमुख मंगश मोरे, उदय लाड, शंकर यादव, प्रकाश निवाते, कन्हैया कामत यांच्यासह नगरसेवक, नगरसेविका, पदाधिका-यांनी सहभाग घेतला होता.

टॅग्स :Mira Bhayanderमीरा-भाईंदर