शहरं
Join us  
Trending Stories
1
केंद्र सरकारने अचानक जातीय जनगणनेचा निर्णय का घेतला? काँग्रेसचा सवाल...
2
“शेतकऱ्यांना विमा कवच आवश्यक, नवा पॅटर्न अन्यायकारक, योजना पहिल्यासारखी सुरु ठेवा”: सपकाळ
3
केवळ अजित पवारच नव्हे, शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडूनही मोदी सरकारच्या निर्णयाचं स्वागत
4
'फक्त एकाला मारणार, जो लाखांच्या...!'; लॉरेंस बिश्नोई गँगची पाकला धमकी, कुणावर निशाणा?
5
गुरुवारी विनायक चतुर्थी: ५ मिनिटे लागतील, स्वामी-बाप्पा कृपा करतील; ‘हे’ मंत्र-श्लोक म्हणाच
6
BREAKING: देशात जातिनिहाय जनगणना होणार; केंद्रातील मोदी सरकारचा मोठा निर्णय
7
'या' स्फूर्तिदायी काव्यरचनांमधून द्या महाराष्ट्र दिनाच्या शुभेच्छा आणि शेअर करा आकर्षक शुभेच्छा पत्रं!
8
"CSKला धोनीची गरज नाही, संघाच्या भविष्यासाठी..."; MSD ज्याला आदर्श मानतो, त्यानेच मांडलं रोखठोक मत
9
विनायक चतुर्थी: गणपती पूजनात ‘या’ गोष्टी हव्यातच, कसे कराल व्रत? पाहा, सोपी पद्धत अन् मान्यता
10
विनायक चतुर्थी: ६ राशींना अनुकूल, अडकलेले पैसे मिळतील; नोकरीत पदोन्नती, बाप्पा चांगलेच करेल!
11
"PM मोदींना लष्कराला फ्री हॅन्ड देण्याचा अधिकारच नाही, तो तर..."; प्रकाश आंबेडकरांचं थेट कायद्यावर बोट
12
IPL 2025 : कुलदीप-रिंकू यांच्यात नेमकं काय घडलं? खरी गोष्ट आली समोर (VIDEO)
13
मैत्रिणीचे लग्न आटोपून घरी येताना अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार, ९ जणांना अटक
14
जातिनिहाय जनगणना होणार, मोदींनी राहुल गांधींच्या हातून मोठा मुद्दा हिसकावला, असे आहेत फायदे तोटे  
15
"सुप्रीम कोर्टाच्या आदेशाने गुन्हा दाखल झालेल्या मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांचा राजीनामा कधी घेणार?’’ काँग्रेसचा सवाल 
16
IPL 2025: रोबोट कुत्र्यामुळे BCCI अडचणीत, उच्च न्यायालयाकडून मिळाली नोटीस, पण कशासाठी?
17
देवेंद्र फडणवीसांच्या लेकीला दहावीत 92 टक्के; 'वर्षा'मध्ये गृहप्रवेश केल्यावर अमृता फडणवीसांनी दिली आनंदाची बातमी
18
'अब तो नाम पूछना ही पडेगा...'; भोपाळमध्ये विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलानं लावले पोस्टर!
19
काय सांगता? 'असं' चालाल तर नक्कीच लवकर वजन कमी कराल; होतील फायदेच फायदे

दाऊद के आदमी तेरा गेम बजा देंगे... खंडणीसाठी बिल्डरला धमकी, दाऊदसह अनिसवरही गुन्हा दाखल

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 4, 2017 22:36 IST

दाऊदचा भाऊ इक्बाल आणि त्याच्या साथीदारांविरूद्ध खंडणीचा तिसरा गुन्हा मंगळवारी ठाणोनगर पोलीस ठाण्यात दाखल झाला. या प्रकरणातील फिर्यादी हा ठाण्यातील भाईंदर येथील बिल्डर आहे.

ठाणे - दाऊदचा भाऊ इक्बाल आणि त्याच्या साथीदारांविरूद्ध खंडणीचा तिसरा गुन्हा मंगळवारी ठाणोनगर पोलीस ठाण्यात दाखल झाला. या प्रकरणातील फिर्यादी हा ठाण्यातील भाईंदर येथील बिल्डर आहे. खार येथील एका व्यावसायिकाची गोराई येथे 38 एकर जमीन होती. या जमिनीचा सौदा भाईंदर येथील बिल्डरने केला होता. त्यासाठी बिल्डरने व्यावसायिकास 2 कोटी रुपये अग्रिम दिले होते. खरेदीचा व्यवहार पूर्ण होण्यापूर्वी जमिनीचे भाव वाढले. त्यामुळे व्यावसायिकाने भाव वाढवून मागितल्याने वाद झाला. जमिनीचा ताबा मिळत नसल्याने बिल्डरने मुंबई उच्च न्यायालयात दावा दाखल केला. हे प्रकरण न्यायप्रविष्ट असून, दरम्यानच्या काळात बिल्डरच्या भागिदाराच्या नातेवाईकाने जमिनीचा वाद मिटविण्याकरीता चर्चेसाठी बोलविले. फिर्यादी बिल्डर चर्चेसाठी गेला असता तिथे त्याच्या भागिदाराच्या नातेवाईकासह आणखी तीन अनोळखी इसम होते. दोन दिवसांनी त्यांनी बिल्डरला पुन्हा ठाण्यातील टेंभी नाक्यावरील एका हॉटेलमध्ये भेटीसाठी बोलविले. त्यावेळी त्यापैकी एकाच्या मोबाईल फोनवर इक्बाल कासकरने बिल्डरला धमकावले. दाऊद इब्राहिम आणि अनिस इब्राहिम यांनी ही जागा घेतली असल्याचे सांगून, या व्यवहारातून बाजुला होण्यास कासकरने बिल्डरला बजावले. त्यानंतर कासकरने बिल्डरला भेटीसाठी बोलावून जमिनीची संपूर्ण माहिती त्याच्याकडून घेतली. 2012-13 साली बिल्डरला वेळोवेळी परदेशातून धमकीचे फोन आले. जुलै 2016 मध्ये फिर्यादी बिल्डर ठाणो न्यायालयात असताना त्याला परदेशातून प्रायव्हेट नंबरवरून फोन आला. दाऊद इब्राहिमचा भाऊ अनिस बोलत त्याने बिल्डरला सांगितले. जमिन मालकास दिलेले 2 कोटी रुपये मी घेतले असून, तुला जिवंत राहायचे असेल या व्यवहारातून बाजुला हो आणि 1 कोटी रुपये इक्बाल कासकरकडे एक आठवडय़ाच्या आत पाठव, असे त्याने बिल्डरला धमकावले. न्यायालयात दाखल केलेला दावा मागे घेतला नाही तर दाऊदची माणसं तुला संपवतील अशी धमकी अनिस इब्राहिमने यावेळी बिल्डरला दिली. बिल्डरने याप्रकरणी दिलेल्या तक्रारीनुसार ठाणोनगर पोलिसांनी दाऊद इब्राहिम, अनिस इब्राहिम आणि इक्बाल कासकरसह सहा जणांविरूद्ध मंगळवारी गुन्हा दाखल केला. 

टॅग्स :Dawood Ibrahimदाऊद इब्राहिमthaneठाणे