जिल्ह्यात दत्त जयंती उत्साहात

By Admin | Updated: December 25, 2015 02:24 IST2015-12-25T02:24:57+5:302015-12-25T02:24:57+5:30

दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा’ या नामस्मरणात जिल्ह्यात गुरुवारी दत्तजयंती साजरी झाली. सद्गुरु श्री चैतन्य जाधवबाबा यांच्या आशीर्वादाने जय जलालबाबा

Datta jayanti excited in the district | जिल्ह्यात दत्त जयंती उत्साहात

जिल्ह्यात दत्त जयंती उत्साहात

कोळसेवाडी : ‘दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा’ या नामस्मरणात जिल्ह्यात गुरुवारी दत्तजयंती साजरी झाली. सद्गुरु श्री चैतन्य जाधवबाबा यांच्या आशीर्वादाने जय जलालबाबा ऊर्फ गोरक्षनाथ गादी, नेतिवली येथे भक्तिभावाने श्री गुरुदत्त जन्मोत्सव दुपारी संपन्न झाला. शिवसेना गटनेते रमेश जाधव, माजी नगरसेवक भाई दीक्षित, वसंतराव सूर्यवंशी, वंडार पाटील, सुधीर पाटील, विजय मिश्रा, फकिला चौधरी, कबीर घरत आदी मान्यवर उपस्थित होते.
महामंडलेश्वर अध्यक्ष स्वामी श्री प्रकाशानंदजी गिरी (माताजी) यांच्या मार्गदर्शनाखाली श्री अंबिकामातेच्या मंदिरात दुपारी श्री दत्तजन्मोत्सव सोहळा भावपूर्ण वातावरणात संपन्न झाला. तत्प्रसंगी माजी सभापती वंडार पाटील, सुधीर पाटील, दादासाहेब ठोकळे आदी मान्यवर उपस्थित होते.
कोळेसेवाडी येथील स्वामी समर्थ मंदिराच्यावतीने १८ डिसेंबरपासून श्री दत्त जन्मोत्सवानिमित्त श्री गणेशयाग श्री गीताई याग, श्रीचंडी याग, श्री स्वामी याग, २४ डिसें. रोजी रुद्र याग व उद्या २५ डिसें. रोजी श्री दत्त जन्मोत्सव दु. १२.३९ वा. संपन्न होणार आहे. शिवसेना रामबाग विभागाच्या वतीने श्री दत्त जयंती निमित्त १८ डिसेंबरपासून धार्मिक कार्यक्रम सुरु असून श्री गणेश गाय, श्री शक्ती याग, श्री दत्त याग, दि. २४ डिसें. रोजी दुपारी जन्मोत्सव व जन्मोत्सव कीर्तन संपन्न झाले. (लोकमत टीम)

Web Title: Datta jayanti excited in the district