शहरं
Join us  
Trending Stories
1
मौलाना तौकीर रजा, पेट्रोल बॉम्ब, अवैध शस्त्रास्त्रं अन्...; FIR मध्ये पोलिसांनी केले मोठे खुलासे, तुम्हालाही धक्का बसेल!
2
“देवाभाऊ जाहिरातींचा खर्च पूरग्रस्तांना द्यायला हवा होता”; ठाकरे गटाचा भाजपावर पलटवार
3
अहिल्यानगर येथे रांगोळीवरून तणाव, CM फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “जाणीवपूर्वक...”
4
"राहुल गांधींच्या केसाला धक्का लावाल तर याद राखा’’, गोळ्या झाडण्याच्या धमकीनंतर काँग्रेसचा इशारा 
5
सलग ७ व्या दिवशी शेअर बाजारात पडझड! तरीही गुंतवणूकदारांनी कमावले १.१८ लाख कोटी! काय आहे कारण?
6
बैलाला साखळी घालतात तसे दिसते; अजित पवार ज्वेलरी शॉपच्या उद्घाटनाला गेले, गोल्डमॅन म्हणून वावरणाऱ्यांना फटकारले
7
ट्रम्प टॅरिफचा परिणाम नाही! 'या' मल्टीबॅगर स्टॉकला लागलं अपर सर्किट; १ वर्षात ११२१% चा रिटर्न
8
ऐश्वर्याला पाहताच चाहती भावुक झाली, रडायलाच लागली अन्...; अभिनेत्रीच्या कृतीचं होतंय कौतुक
9
खोल, अंधाऱ्या विहिरीत पडली महिला, तब्बल ५४ तास दिली मृत्यूशी झुंज, अखेरीस...  
10
"...तर विचारधारा बदलत नाही"; RSS च्या व्यासपीठावर जाण्यास कमलताईंचा नकार, पण मुलगा राजेंद्र गवईंची वेगळी भूमिका
11
पगार वाढला तरी महिनाअखेरीस खिसा रिकामाच? तुम्हीही 'पगार विरुद्ध जीवनशैली'च्या सापळ्यात अडकलात?
12
खळबळजनक! पोलीस अधिकारी बनून गरब्याला VIP एन्ट्री; आयोजकांना संशय येताच पोलखोल अन्...
13
Maruti ची ऐतिहासिक कामगिरी; फोर्ड आणि फॉक्सवॅगनरख्या दिग्गज कंपन्यांना मागे टाकले...
14
रॉकेट बनला हा स्मॉलकॅप शेअर, जपानच्या कंपनीसोबत डील; सचिन तेंडुलकरचीही आहे गुंतवणूक
15
विद्यार्थ्याला मारहाण अन् उलटे टांगल्या प्रकरणी मुख्याध्यापक, ड्रायव्हरला अटक; शाळा बंद केली
16
Dussehra 2025: मृत्युच्या शेवटच्या क्षणी रावणाने लक्ष्मणाला दिलेला कानमंत्र माहितीय का?
17
अहिल्यानगर: ज्या रांगोळीवरून वाढला तणााव, ती काढणाऱ्याला अटक; एफआरआयमध्ये काय?
18
टीम इंडियानं आशिया कप जिंकताच मोदींनी ऑपरेशन सिंदूरचा उल्लेख केला, विरोधकांनी असा टोला लगावला
19
“गुवाहाटीतून आणलेले पैसे दिले तर लोकांचा त्रास एका मिनिटात संपेल”; शिंदे गटाला कुणाचा टोला?
20
३ वर्षांत ₹२४१ कोटींची कमाई! एवढा पैसा कुठून आला? स्वतः प्रशांत किशोर यांनी केला खुलासा 

जेमतेम चार महिन्यांतच डांगे यांची झाली बदली

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 24, 2020 01:12 IST

लोकप्रतिनिधींनी केलेल्या तक्रारींमुळे मंगळवारी त्यांची तडकाफडकी बदली केली गेली, अशी चर्चा आहे. आयुक्तपदी सनदी अधिकारी डॉ. विजय राठोड यांची नियुक्ती केली आहे.

धीरज परब मीरा रोड : अवघ्या चार महिन्यांपूर्वी मीरा-भार्इंदर महापालिकेच्या आयुक्तपदी नियुक्ती झालेल्या चंद्रकांत डांगे यांच्या विरोधात काही लोकप्रतिनिधींनी केलेल्या तक्रारींमुळे मंगळवारी त्यांची तडकाफडकी बदली केली गेली, अशी चर्चा आहे. आयुक्तपदी सनदी अधिकारी डॉ. विजय राठोड यांची नियुक्ती केली आहे.मीरा-भार्इंदर महापालिकेत भाजपची एकहाती सत्ता आहे. राज्यात भाजप सत्तेत असताना तत्कालीन आ. नरेंद्र मेहता हे तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे आपल्या मर्जीतला आयुक्त मिळावा म्हणून शिफारस करीत. पण मर्जीतला आयुक्त मिळाला नाही की त्याच्या विरोधात मोहीम उघडत. डॉ. नरेश गीते यांनी दबाव झुगारल्याने त्यांना मेहता व स्थानिक भाजपचा विरोध सहन करावा लागला होता. तब्बल १६ महिने तग धरल्यावर गीतेंची बदली झाली व बी. जी. पवार आले. ते तीन महिनेही राहिले नाहीत. त्यांच्या जागी मेहतांच्या मर्जीतले बालाजी खतगावकर आले. परंतु मेहता आणि त्यांच्या कंपनीच्या वादांमुळे खतगावकर चांगलेच गोत्यात आले. भाजपची राज्यातील सत्ता गेल्यावर फेब्रुवारीमध्ये खतगावकरही गेले आणि १५ फेब्रुवारी रोजी डांगे यांची आयुक्तपदी नियुक्ती झाली. जिल्ह्यातील शिवसेनेच्या नेत्यांचे जवळचे आयुक्त म्हणून डांगे यांची चर्चा झाली.डांगे यांनी पालिकेत येताच मेहतांना धक्के देण्यास सुरुवात केली. झंकार कंपनी समोरील बेकायदा गाळे पाडायला लावल्यानंतर मेहतांच्या घर योजनेतील वाढीव बेकायदा बांधकामावरही कारवाईचा बडगा उगारला. पण न्यायालयाने स्थगिती दिल्याने कारवाई थांबली.पालिका कारभारातही डांगे हे मेहता व समर्थकांचा हस्तक्षेप खपवून घेत नव्हते. पालिकेतील सत्ताधारी भाजपशी दोन हात करताना डांगे यांना शिवसेना नेतृत्वाची व स्थानिक लोकप्रतिनिधींची साथ मिळवता आली नाही, अशी चर्चा आहे.आ. प्रताप सरनाईक यांनी डांगे यांच्यावर मनमानी कारभारासह लोकप्रतिनिधींना विश्वासात घेत नसल्याचे आरोप लेखी पत्राद्वारे केले होते.पालिकेतील आयुक्त आपल्या मर्जीतला हवा यावरुन शिवसेनेतील दोन दिग्गज नेत्यांमध्ये सुप्त स्पर्धा असल्याची चर्चा गेले काही दिवस राजकीय वर्तुळात सुरु होती. एका विकासकाला टीडीआर देण्याच्या प्रकरणावरुन वाद वाढल्याचेही बोलले जात होते.>‘अनलॉक १’ नंतर कोरोनाबाधितांची शहरात वाढली संख्याडांगे यांची फेब्रुवारीत नियुक्ती झाली व मार्चपासून कोरोनामुळे लॉकडाऊन सुरू झाला. सुरुवातीच्या काळात कोरोनाबाधितांची संख्या कमी होती. परंतु ‘अनलॉक १’नंतर कोरोना रुग्णांची संख्या वाढत आहे. लोकप्रतिनिधी व प्रशासन अपयशी ठरल्याची झोड उठू लागली.त्यातच मंगळवारी अचानक महापालिका आयुक्तपदी डॉ. विजय राठोड यांची नियुक्तीची घोषणा केली गेली. डॉ. राठोड यांना त्वरित आयुक्तपदाचा कार्यभार स्वीकारण्यास सांगितले आहे.डॉ. राठोड हे गडचिरोली जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारीपदी कार्यरत होते. ते थेट सनदी अधिकारी असून पालिका आयुक्तपदी झालेली ही त्यांची दुसरी नियुक्ती असल्याचे सांगण्यात आले.>चंद्रकांत डांगे यांच्या बदलीचा निर्णय सरकारने घेतला आहे. त्यांच्याबद्दल वाद नव्हता. सनदी अधिकारी द्या अशी मुख्यमंत्र्यांकडे मागणी केली होती. त्यांच्या बदलीशी संबंध नाही. कोरोनाच्या संसर्ग वाढल्याने बदली केली असावी. नवीन आयुक्तांनी लोकप्रतिनिधींना विश्वासात घेऊन कामकाज करावे. शहराला कोरोनापासून मुक्त करावे.- आ. प्रताप सरनाईक, शिवसेना

टॅग्स :Mira Bhayander Municipal Corporationमीरा-भाईंदर महापालिका निवडणुक