शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

दहिसर येथील धाडीत १४ बारबालांसह २४ जणांना अटक, डायघर पोलिसांची कारवाई

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 20, 2019 03:33 IST

डायघर परिसरातील दहिसर येथील रॉयल गोल्ड बारमध्ये नियमांपेक्षा जास्त बारबाला लेडिज सर्व्हिसच्या नावाखाली अश्लील चाळे करून रात्री उशिरापर्यंत नृत्य करीत असल्याची माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक चंद्रकांत जाधव यांना मिळाली होती.

ठाणे : रात्री उशिरापर्यंत चालणाऱ्या पिंपरीनाका, दहिसर (डायघर) येथील एका बारवर डायघर पोलिसांनी रविवारी पहाटे १ वाजण्याच्या सुमारास छापा टाकून १४ बारबालांसह २४ जणांना अटक केली. या सर्वांची ठाणे न्यायालयाने वैयक्तिक जामिनावर सुटका केल्याची माहिती सूत्रांनी दिली.डायघर परिसरातील दहिसर येथील रॉयल गोल्ड बारमध्ये नियमांपेक्षा जास्त बारबाला लेडिज सर्व्हिसच्या नावाखाली अश्लील चाळे करून रात्री उशिरापर्यंत नृत्य करीत असल्याची माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक चंद्रकांत जाधव यांना मिळाली होती. या माहितीच्या आधारे ठाणे शहर परिमंडळाचे पोलीस उपायुक्त सुभाष बुरसे यांच्या मार्गदर्शनाखाली जाधव यांच्यासह सहायक पोलीस निरीक्षक नितीन पाटील आणि पोलीस उपनिरीक्षक सागर शिंदे आदींच्या पथकाने १८ आॅगस्ट रोजी पहाटेच्या सुमारास या बारवर छापा टाकून बारमालक इंद्रमणी त्रिपाठी (४२, रा. परेल, मुंबई), व्यवस्थापक सुरेश मोगवीरा (३८, रा. कोपरखैरणे, नवी मुंबई), डॅनिअल सरकार, प्रदीप मालिक, अमितकुमार कुमी, भागीरथ दास आणि पवन सिंह हे कर्मचारी तसेच चार गिºहाइके आणि १४ बारबाला आदी २४ जणांना अटक केली. सार्वजनिक ठिकाणी बीभत्स वर्तन केल्याप्रकरणी या बारबालांवर तसेच विहित वेळेपेक्षा जास्त वेळ बार सुरू ठेवून नियमांपेक्षा जास्त मुलींना रात्रीच्या वेळी कामावर ठेवल्याप्रकरणी बारमालक आणि व्यवस्थापक यांच्याविरुद्ध डायघर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या सर्व बारबालांसह बारमालक आणि व्यवस्थापक आदी २४ जणांची प्रत्येकी सहा हजार रुपयांप्रमाणे एक लाख ४४ हजार रुपयांच्या वैयक्तिक जामिनावर न्यायालयाने सुटका केली.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारी