डोंबिवलीत भाजपकडून दहीहंडी साजरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 2, 2021 05:26 IST2021-09-02T05:26:31+5:302021-09-02T05:26:31+5:30

डोंबिवली : दरवर्षीप्रमाणे भाजपतर्फे आमदार रवींद्र चव्हाण यांची डोंबिवलीकर दहीहंडी मंगळवारी बाजीप्रभू चौकात फोडण्यात आली. त्यापूर्वी पारंपरिक पद्धतीने पूजन ...

Dahihandi celebration by BJP in Dombivali | डोंबिवलीत भाजपकडून दहीहंडी साजरी

डोंबिवलीत भाजपकडून दहीहंडी साजरी

डोंबिवली : दरवर्षीप्रमाणे भाजपतर्फे आमदार रवींद्र चव्हाण यांची डोंबिवलीकर दहीहंडी मंगळवारी बाजीप्रभू चौकात फोडण्यात आली. त्यापूर्वी पारंपरिक पद्धतीने पूजन करण्यात आले.

यावेळी चव्हाण म्हणाले की, सर्व हिंदू सणांवर निर्बंध लादण्याचे काम सातत्याने केल जाते आहे. परंतु, सातत्याने हिंदू सणांवर निर्बंध लादायचे आणि इतर सणांना मात्र खुलेआम सूट द्यायची, महाआघाडी सरकारचे हे धोरण दुटप्पी असून हिंदूंवर अन्याय करणारे आहे. या हिंदूविरोधी धोरणाचा भाजप जाहीर निषेध करते.

यावेळी पक्षाचे कल्याण जिल्हाध्यक्ष शशिकांत कांबळे, पूर्व मंडल अध्यक्ष नंदू जोशी, युवा मोर्चा जिल्हाध्यक्ष मिहिर देसाई, साउथ इंडियन सेलचे मोहन नायर, महिला मोर्चा अध्यक्ष पूनम पाटील, मनीषा राणे, मयुरेश शिर्के, युवा मोर्चा अध्यक्ष मितेश पेणकर आणि भाजप पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते. देसाई यांच्या हस्ते हंडी फोडून उत्सव साजरा करण्यात आला.

--------

Web Title: Dahihandi celebration by BJP in Dombivali