डहाणू जनता बँकेचे एनपीए २९ टक्के
By Admin | Updated: August 9, 2016 02:10 IST2016-08-09T02:10:47+5:302016-08-09T02:10:47+5:30
बँके चे एनपीए २९ टक्के आहे. रिकव्हरी हा बॅकेचा आत्मा असून थकबाकीदारांशी चर्चा करुन सामोपचाराने वसुली करू, असे धोरण दि डहाणू रोड जनता को.आॅप. बँकेचे अध्यक्ष राजेश

डहाणू जनता बँकेचे एनपीए २९ टक्के
डहाणू : बँके चे एनपीए २९ टक्के आहे. रिकव्हरी हा बॅकेचा आत्मा असून थकबाकीदारांशी चर्चा करुन सामोपचाराने वसुली करू, असे धोरण दि डहाणू रोड जनता को.आॅप. बँकेचे अध्यक्ष राजेश पारेख यांनी पत्रकार परिषदेत जाहीर केले .
याशिवाय बँकेच्या सभासदांसाठी काही सुविधा असून हृदयविकार, मूत्रपिंडाचा विकार, कर्करोग, मेजर ब्रेन सर्जरी यासारख्या आजारांसाठी बँकेच्या निधीतून २५ हजार रु. पयांपर्यंतची वैद्यकीय मदत देण्यात येईल, अशी माहिती दिली. बँकेचे उपाध्यक्ष अॅड.रमेश नहार, सदस्य मिहीर शहा, उपस्थित होते. यावेळी सुवर्ण तारण कर्जात बँकेची फसवणूक टाळण्यासाठी दोन सुवर्णकारांकडून सोन्याची तपासणी व मूल्यमापन करण्याचे तसेच व्यवसाय कर्ज योजनेला प्रोत्साहन देण्याचे नव्या संचालक मंडळाने जाहीर केले. बँकेची पात सुधारण्यासाठी नव्या संचालक मंडळाचा भर असल्याचे माजी नगराध्यक्ष आणि संचालक मिहीर शहा यांनी सांगितले.
रिझर्व्ह बँकेच्या नियमानुसार एकूण रक्कमेच्या ६५ टक्के रक्कम कर्ज म्हणून द्यावयाचे असते मात्र मागील बँकेच्या संचालक मंडळाने ५० टक्के कर्ज वाटप केल्याने बँकेचे आर्थिक नुकसान झाल्याची बाब समोर आणली. सध्या डहाणू पूर्व, चारोटी, वाणगाव अशा बँकेच्या शाखा असून आणखी शाखा वाढविण्याचा विचार आहे. अशी माहिती देण्यात आली. सध्या सुमारे ३०० कर्जदारांकडे ४० कोटींची थक बाकी आहे. तसेच बँकेचे एनपीए २९ टक्के असल्याचेही त्यांनी सांगितले.
१४ आॅगस्ट, २०१६ पासून रविवारीही २ लाखापर्यंत एनईएफटी/आरटीजीसची सुविधाही सुरु करणार असल्याचे तसेच दिवाळीपासून एटीएमची सुविधासुरु करण्याचे आश्वासन दिले . चारोटी येथे असलेली बँकेची शाखा लवकरच कासा येथे हलविण्यात येणार आहे, तसेच कामगारांसाठी असलेली पीएफची सुविधा सुरळीत करणार असल्याची माहिती पारेख यांनी यावेळी दिली. बॅकेच्या सर्वसाधारण सभासद पाल्याला एस.एस.सी. परिक्षेत ८० टक्के गुण ,इ.१२ वी विज्ञान शाखेत ८५ गुण तसेच कॉमर्स, आर्टस शाखेत ६५ टक्के गुण संपादन केल्यास त्याला मागासवर्गीय पाल्यांनी अनुक्र मे ७५ टक्के, ७० टक्के व ६० टक्के असे गुण मिळविल्यास त्यांना पुरस्कृत केले जाईल. तसेच त्याने कोणत्याही शाखेतून इंजिनियरिंगमधून डिप्लोमा केल्यास बक्षीस दिले जाईल असे सांगितले.
(वार्ताहर)