शहरं
Join us  
Trending Stories
1
West Bengal Kanchenjunga Express Train Accident: बंगालमध्ये ट्रेनचा मोठा अपघात! कंचनजंगा एक्स्प्रेसला भरधाव मालगाडीची धडक, ५ जणांचा मृत्यू
2
देवेंद्र फडणवीसांनी मला संकटातून वाचवलं; खासदार नरेश म्हस्केंनी सांगितला किस्सा
3
धोक्याची घंटा! इंफेक्शनमुळे ४८ तासांत होतो रुग्णाचा मृत्यू; काय आहे Flesh-Eating Bacteria?
4
बापरे! महागाईचा सर्जिकल स्ट्राइक; पाकिस्तानात टोमॅटो २०० रुपये किलो
5
जगप्रसिद्ध बीबी का मकबराच्या चारही मिनारचे ‘तीन तेरा’
6
'खटा-खट खटा-खट रिटर्न'! ₹४०० चा शेअर पोहोचला १८०० पार; 'या' Energy शेअरनं केलं मालामाल
7
"बिकिनी घालणं सोपी गोष्ट नाही, त्यासाठी कष्ट लागतात", पर्ण पेठे स्पष्टच बोलली
8
लाईफ इन्शुरन्स धारकांसाठी खूशखबर! पॉलिसी मध्येच सरेंडर केल्यास मिळणार पूर्वीपेक्षा अधिक पैसे
9
बुडणार नाही तास, शाळेतच मिळणार पास; ‘एसटी’चे एक पाऊल पुढे
10
कंचनजंगा एक्स्प्रेसच्या अपघातात लोको पायलट, गार्डचा मृत्यू? रेल्वे मंत्रालय माहिती देताना म्हणाले...
11
NSE नं इन्स्टाग्राम, टेलिग्रामच्या 'या' हँडल्सबाबत दिला इशारा; फसवणूक करणारे नंबर्सही केले जारी
12
चाळिशीनंतर स्वत:ला जपा! महिलांना 'या' आजारांचा मोठा धोका; दुर्लक्ष करणं बेतेल जीवावर
13
अनंत अंबानी-राधिका मर्चंटचे प्री-वेडिंग शूट करणाऱ्या फोटोग्राफरचे मानधन किती? जाणून घ्या
14
सावधान! पावसाळ्यात समोसा, वडापाव खाणं पडू शकतं महागात; 'या' आजारांचा सर्वाधिक धोका
15
Market Cap: मुकेश अंबानींच्या रिलायन्सची हवा, LICची ही झाली मोठी कमाई; TCS सह 'या' कंपन्यांना नुकसान
16
Munjya Box Office Collection : बॉक्स ऑफिसवर 'मुंज्या'चं राज्य; १० दिवसात मोडला 'मैदान'चा लाइफटाइम कलेक्शनचा रेकॉर्ड
17
नागपुरात परत हिट ॲंड रन, फुटपाथवर झोपलेल्या आठ जणांना मद्यधुंद कारचालकाने चिरडले, दोघांचा मृत्यू
18
ईदनिमित्त दुर्गाडी देवीच्या दर्शनासाठी बंदी; शिवसेना शिंदे गट - ठाकरे गटाचे घंटानाद आंदोलन
19
"मी स्वत:च नकार दिला..."; मोदींच्या मंत्रिमंडळात स्थान न मिळताच भाजपा नेत्याचा मोठा खुलासा
20
Modi 3.0 Budget : पहिल्या अर्थसंकल्पात नोकऱ्यांवर भर देण्याची शक्यता; PLI स्कीम, लघु उद्योगांना मिळणार प्रोत्साहन

डी कंपनीच्या गांगरला बोरीवलीतून अटक, शस्त्र खरेदीसाठी मदत, महिन्याला १0-१५ लाखांचा हवाला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 29, 2017 2:49 AM

देशाच्या आर्थिक राजधानीवर पकड ठेवणा-या डी कंपनीने अलीकडच्या काही वर्षांमध्ये आपला मोर्चा मुंबईबाहेरही वळवला आहे.

ठाणे : देशाच्या आर्थिक राजधानीवर पकड ठेवणा-या डी कंपनीने अलीकडच्या काही वर्षांमध्ये आपला मोर्चा मुंबईबाहेरही वळवला आहे. कुख्यात डॉन दाऊद इब्राहिमचा भाऊ इक्बाल कासकरच्या चौकशीतून समोर आलेल्या माहितीनुसार खंडणी वसुलीचे जाळे मुंबई, नवी मुंबई आणि ठाण्यासह पुणे, नाशिक, दिल्ली तसेच लखनऊपर्यंत पसरल्याचे समजते. तर या प्रकरणात बोरीवलीतून मटकाकिंग पंकज गांगरला गुरुवारी अटक करण्यात आली.खंडणीच्या गुन्ह्यामध्ये ठाणे पोलिसांनी इक्बाल कासकरसह तिघांना १९ सप्टेंबर रोजी अटक केली होती. छोटा शकील या टोळीचा सूत्रधार असल्याचे स्पष्ट झाल्यानंतर पोलिसांनी त्यालाही आरोपी केले. पुणे, नाशिक, दिल्ली आणि लखनऊ या शहरांमधूनही डी कंपनीने खंडणी वसुली केल्याचा संशय पोलिसांना आहे.व्यापाºयांकडून खंडणी वसूल करण्यासाठी या डी कंपनीकडून परराज्यांतील गुंडांना पोसले जाते. खंडणीसाठी गोळीबार केल्याच्या घटना घडल्या असून, त्याविषयी माहिती मिळवण्याचा प्रयत्न केला जात असल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले.लकडावाला ताब्यातइक्बाल कासकरला फंडिंग करत असल्याच्या संशयातून बुधवारी रात्री ठाण्याच्या खंडणीविरोधी पथकाने नागपाड्यातून अस्लम हाजी लकडावालाला ताब्यात घेतले. लकडावाला हा कंत्राटदार आहे.जे.जे. मार्ग परिसरात सुरू असलेल्या एसबीयूटीकडून क्लस्टर डेव्हलपमेंट प्रकल्पांतर्गत काही इमारतींचे काम त्याने हाती घेतल्याचे समजते.गांगर पुरवायचा पैसाइक्बाल कासकर आणि छोटा शकील टोळीच्या आर्थिक व्यवहारांमध्ये गांगर गुंतलेला असल्याचे तपासामध्ये आढळले आहे. न्यायालयाने त्याला ५ आॅक्टोबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावली. बोरीवलीचा मटकाकिंग पंकज गांगर हा छोटा शकीलचा अर्थपुरवठादार असून, तो महिन्याकाठी १0 ते १५ लाख रुपयांचा हवाला करायचा, असे पोलीस सूत्रांनी सांगितले. याशिवाय तो शस्त्र खरेदीसाठीही टोळीला फायनान्स करायचा, असे पोलिसांनी न्यायालयासमोर सांगितले.

टॅग्स :Crimeगुन्हा